बोलणं कस असाव ? कोणी लिहिले माहीत नाही,पण फार आवडले म्हणून पोस्ट करतो आहें 'बोलण्याची शक्ती' हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केलीत की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, भाव, समोरच्याबद्दलचा आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत! हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही. 'आहे हे असं आहे', 'माझा आवाजच मोठा आहे' 'मला अशीच सवय आहे' असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो. बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. 'कौन बनेगा करोडपती' मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. *शब्दोच्चार, आवाजाचा चढ - उतार शिकायचं असेल, तर हा आवाज अभ्यासायलाच हवा, आवाजाची, बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन ! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की ...