मी असेपर्यत येत रहा...

मी असेपर्यत येत रहा...
बाप.....
☺️☺️

अगदी काळजात धस्स करणार वाक्य.....

     *ऊभ्या आयुष्यात,  कधीही न झुकलेला, न थकलेला, हारजीत,  उन पाऊस सगळ धिरानं पचवलेला, माझा बाप आज बेडवरुन ऊठु शकत नाही.

     सुन मुलगा करतात सगळं पण त्याला नाईलाजाची किनार आहे की कर्तव्य की प्रेम माहीत नाही.  
आणि सासरी गेलेल्या लेकी, 
त्यांच्या जगात व्यस्त आहेत.  
नाही म्हणायला पाच सहा दिवसांतुन व्हिडीओकॉल करतात.  आणि बाबा म्हणतात,

*"मी असेपर्यत येत रहा"* 
डोळ्यातुन गंगा यमुना वहातात. 

अगदी जन्म झाल्यापासुन, दवाखान्यातुन घरी आणणारा रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप,
 शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप, 
सायकल शिकवताना,
 
*"हो जमतय जमतय, बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ"*  

म्हणुन अचानक हात सोडुन आत्मविश्वास दुणावणारा बाबा,
 कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, 
परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारा बाप,
स्वतःसाठी फाटके बुट,
बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा, 
बाहेरची घोंघावणारी वादळे थोपवुन धरतोय दरवाजातच बाजीप्रभु सारखा.  
आपल्याला नेहमी हसताना दिसतो.

*जखमा, वार, अपमान, कढ, हुंदके, कुठल्यातरी फाटक्या शेल्यात गुंडाळतो.*

नोकरी, छोकरी आपल्याला मिळते पण आभाळाएवढं कौतुक त्याला असत. 

*आपल्या पहिल्या पगारातुन आपण त्याला घेतलेला शर्ट, घड्याळ, साऱ्या जगाला भाबडेपणाने दाखवत बोलतच राहतो. कौतुक करतच राहतो.*

आई रागावली की बाबा बुलेटप्रुफ जँकेट सारखा बचाव करायला उभा असतो.

*"करु दे ग तिला तिच्या मनासारखं"*

अस म्हणतो खर पण आतुन साफ घाबरलेला, काळजीत असतो.  
पण त्यात लेकीची काळजीच असते . 

*मुलीच मुलाचं लग्न ठरल की तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो.* 

जणु तिसऱ्या अंकाची नांदी. 

*"काही चुकल तर पोरीला संभाळुन घ्या "*
अस हात जोडुन सांगणारा बाप,

*मुलीला सासरी कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मुलीच्या सासरच्या सर्व मंडळींना मान-सन्मान देणारा, मने सांभाळणारा बाप...*

सगळ्यांनाच माहीती आहे.  
पण त्याच वेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आई वडिलांना, 

*" काळजी करु नका, आता ती माझी मुलगी आहे"*

अस भरभरुन आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा ही बाप च असतो. 

तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो. 
म्हणुनच,

*"बाबांच काही नाही गं, उलट खुप आधार वाटतो त्यांचा"* 

अस गॉसिपींग करणाऱ्या सुना घरोघरी दिसतात. पण सुन आणि सासऱ्यात ठिणगी स्पर्धा, अस्तित्व आणि स्थान ह्यासाठीचा संघर्ष कधीच नसतो.  
असो 

आणि 
*समजा पत्नी अगोदर गेली तर आतुन तुटलेला पण बाहेरुन अजुन अँडजेस्टेबल झालेला बाप बघायला मिळतो.*  

*मग नातवांना पाढे कविता श्लोक, गीता  शिकवण्यात रमतो.*

*आणि त्यांच्याकडुन स्मार्ट फोनची फीचर्स शिकत असतो.*  

कधी तर सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायला सांगतो.

मागे सुटलेले, विस्कटलेले, बिघडलेले नाते सोडुन नव्याने नाती बांधतो. 

कधी कधी सकाळी आठ साडेआठलाच पिक अवर ला फोन करतो,

 *"काही नाही बर आहे ना सगळं, सहजच फोन केला गं"*

म्हणुन खुप काही सांगायच राहु देतो. 

मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई, मनात आणि मानात कुठेही वर खाली, पार्शलिटी न करणारा बाबा..... 

आजार बळावला, अंथरुण धरले तरी बाबांच विठुरायाचे भजन, रामरक्षा, अथर्वशीर्ष जप सुरुच असत.

*घर कस सुरक्षित आधाराखाली आहे वाटत रहात.*  
*त्यांच केवळ असण खुप बळ देणारं असत.*  

आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाप.....  

*बाप गेला की माहेर संपल्याची काळीज चिरणारी यातना होते.* 

*पण ती सल, ती उणीव, ते खालीपण कुठेतरी आत जाणवत रहाते.*
 
*सुरकुतलेल्या हातांवरुन, परतीच्या चाहुलीने सैरभैर झालेल्या, एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या.*

सांगा,

*"हो बाबा मी तुम्ही असेपर्यत आणि नसल्यावरही सगळं संभाळेल"* 

तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरुन पावल्याचं समाधान दिसेल. 

*"मी असेपर्यत येत रहा"*

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट