नाती अती महत्त्वाची ...

काही
नाती अती महत्त्वाची

एका सोनाराच्या मृत्यूनंतर  *त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते*. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या *मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा* आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला *काही पैसे* द्या."

मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि *म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव* मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”

दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज *दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची*, ते  शिकू लागला.

थोड्याच दिवसात, तो *हिऱ्यांचा मोठा पारखी झाला*. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.

एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, *तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की* आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."

आईकडून तो हार घेऊन, *त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले*. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: *हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत*... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?
  
मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.

काकांनी विचारले, "अरे *तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे*... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"

तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू *पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे* असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, *म्हणून काका मला असं सांगत आहेत*.

पण आज *जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे*. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, *नातं सांभाळणं*, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."

*सत्य हे आहे की या जगात, खर्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे*. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून *आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं*.

ज्या *अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण, हे प्रेम* आणि विश्वासावर होत असते.

"नात्यात निर्माण झालेल्या *थोड्याशा दुराव्यामुळे, कोणाचीही साथ सोडू नका... नाहीतर* लोकांना *आपलेसे करण्यात* आयुष्य खर्ची करावे लागते."

                  ♾
                     
*सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे इतरांमधे प्रेम निर्माण होईल.*
*🙏🙏
*।। जय जय रघुविर समर्थ ।।*
*।। जय श्रीराम ।।*

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट