किर्तनात सांगितलेला दृष्टांत...

किर्तनात सांगितलेला दृष्टांत...

एक गरिब ९२ वर्षाचा म्हातारा वारकरी गुडघ्या पर्यँत,धोतर, गळ्यात पविञ तुळशीची माळ,डोक्याला
फेटा, बांधलेला आणि कपाळाला गोपी चंदना टिळा.
त्या म्हाताऱ्या बाबाची भगवान पांडुरंगावरती निस्वार्थ श्रद्धा पण भक्तिच. गर्व अजिबात नाहि.असे हे म्हातारे बाबा रस्त्याने जात असताना एक राजा मोठया थाटात देवीची पुजा करत होता. सगळी जनता समोर बसलेली होती. भालदार, चोपदार, बाजुला उभे होते.तेवढयात हे वारकरी बाबा तिथे आले, आणि नित्यनेमाप्रमाणे म्हाताऱ्या वारकरी बाबाने वाकुन राजाला नमस्कार केला.
*"रामराम मायबाप"*
राजाने वर पाहिलं आणि म्हटला,..
"रामराम, *पंढरीचे वारकरी* का तुम्हि"..? 
बाबा म्हटले,"होय मायबाप"
राजा म्हटला,"काय आहे रे तुमच्या देवाजवळ, *एक पितांबर अन तुळशीची माळ* 
अन त्याचे तुमी दरिद्री भक्त , आमची देवी बघ पायापासुन डोक्यापर्यँत कशी सोन्याची आहे.".....
म्हाताऱ्या बाबाला पांडुरंगाचा केलेला अपमान सहन नाही झाला. आणि राजाला म्हटले, "ये राजा, आम्हि ज्याचे भक्त आहे ना त्याच नगर सोन्याच आहे अन ज्या देवीची तु बढाई सांगतोस ती देवी माझ्या पांडुरंगाच्या दरबारात झाडपुस करायला आहे." राजा एकदम चकित झाला अन म्हणाला "म्हातारे बाबा, जर का नगर सोन्याच अन देवी झाडपुस करायला नसली तर भर सभेत तुमच मुंडक उडवल्या जाईल." आणि वारकरी बाबा म्हटले "जर का नगर सोन्याच अन देवी झाडपुस करायला असली तर तु काय करशिल राजा." राजान उत्तर दिले,
*"आयुष्यभर पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी करीन."* 🚩

आणि मग राजा आणि वारकरी बाबा निघाले पंढरपुरला....
वारकरी बाबा भगवंताला विनवनी करु लागले,....
"पांडुरंगा १० वर्षाचा होतो, तेव्हापासुन न चुकता तुझी वारी करतो,आयुष्यात सुतळिचा तोळा सुद्धा नाही मागितला रे... तुला पण आज राजाने मला दुःखी केलय त्याच्याकरिता फक्त ह्या दोन गोष्टी पंढरपुरात तयार ठेव. एक नगर सोन्याच अन, दोन देवी झाडु घेऊन उभी ठेव." 
आणि ईकडे राजाच्य मनात कुजबुज चालू.....
*"कस असेल पंढरपुर."*
पाहता पाहता पंढरपुर जवळ आल. आणि वारकरी बाबा म्हटले...
"राजा हे जे दिसते ना हेच पंढरपुर."
राजाने टाचा उंच करुन बघितल काय दिसल राजाला....
*झळझळित सोनसळा ।* *कळस दिसतो सोज्वळा ।।*
*बरवे बरवे पंढरपुर ।* *विठोबारायाचे नगर ।।*
*माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचे ।।*

आणि राजा म्हटला... "खर आहे बाबा तुमच नगर सोन्याच आहे."आणि मग पुढे चंद्रभागेतुन आंघोळ करुन नामदेव पायरी जवळ आले. राजाने वर पाहायच्या आत महाद्वारात झाडू घेऊन उभ्या असलेल्या देविनेच विचार "राजा ईकडे कुठ रे" ?
राजा म्हटला...
"आई तु ईकडे कुठ" ?
"अरे राजा हि झाडपुस करायची सेवा रोज माझ्याकडे आहे."....
आणि वारकरी बाबाच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागल.
राजा म्हटला....
"वारकरी बाबा तुमच म्हणन खर झाल तरी तुमी का रडता?"
वारकरी बाबा म्हटले...
"राजा , ..८२ वर्ष झालेत पंढरीची न चुकता वारी करतो पण अजुनही मी नगर सोन्याच अन देवी झाडु घेऊन उभी पाहली नाहि. पण आज या भक्ताची लाज राखण्याकरता माझ्या पांडुरंगाने या दोन्ही गोष्टी ईथ तयार ठेवल्या.म्हणुन रडतो."

*माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणची देव होय गुरु ।।*

*पढिये देहभाव पुरवी वासना । अंती ते आपणापाशी न्यावे ।।*

*तात्पर्य:*
 भक्ती करा पण त्या भक्तिचा अहंकार करु नका. आणि समोरच्या व्यक्तिच्या श्रद्धेत असलेल्या देवतेचा अपमान व त्या श्रद्धेपोटी असलेल्या त्याच्या मनातील भावना कदापी दुखऊ नका. 

       *राम कृष्ण हरी*🙏🏻🚩

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...