📮 गावाकडचं पत्र !! 📬 तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय? अवो, काई न्हाई, चुलीच्या धुरानं पाणी आलंय जरा, न तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय ? आगं, वावधान उठलं न फुफाटा डोळ्यात गेलायं बघ. दोघांनी एकमेकाला खोटंच सांगितलेलं. तालुक्याला शिकणाऱ्या पोराचं पत्र आलेलं. खुशाली कळवली, अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितलं... त्याचा दोघांना आनंद झालेला. पत्र आलेलं डालडाच्या पत्र्याच्या डब्यात, भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं. त्याला भाकरीचा, लोणच्याचा गंध लागलेला. सकाळी आईन पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडलान लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेलं. "पाऊस बराय, गहू काढणीला आलायं, गाईला कालवड झालीय, तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईनं, तुझ्या मित्रांना पण दे, बाकी खुशाल, सुट्टीत आल्यावर बोलू, काळजी घे." घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडीलानं लिहिलेलं पत्र. पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलनं लिहिलेल्या. पण त्या अक्षरांना गंध असायचा, मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा, भाजीचा, चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध. हजारो पत्र्याचे डबे रोज एसटीने अशी आईबापाची खुशा...