◾बोधकथा :- संस्कार...

अनेक वर्षांपूर्वी बकुमार नावाचा कुख्यात दरोडेखार होऊन गेला. सिंधुराज राजाच्या राज्यात त्याने लोकांचे जगणे मुश्किल करून टाकले होते. तो श्रीमंतांना तर लुटत असेच, परंतु गरिबांनाही सोडत नसे. गोरगरीब शेतकरी, कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून कमावलेले चार पैसे हडप करण्यास तो जराही संकोच बाळगत नसे. लोक त्याला हात जोडून विनवण्या करत असतं. परंतु त्याला तो मुळीच भीक घालंत नसे. अत्यंत निर्दयीपणे त्याचा लूटमारीचा धंदा सुरूच होता व त्याचे क्रौर्य दिवसेंदिवस वाढत होते. हजारो निरपराध लोकांच्या त्याने हत्या केल्या. जो कुणी त्याला विरोध करील, त्याला क्षमा करणे तर दूरच, त्यांना तो जिवंत सोडत नसे.

सिंधुराज राजासमोर नागरिकांनी एकत्रितरीत्या बकुमारविरोधात तक्रार केली. त्यानंतर राजाने सगळी सेना त्या दरोडेखोराच्या मागावर सोडली. बकुमार अनेक महिने सैन्याला चकवा देऊन धुमाकूळ घालतच राहिला. परंतु त्याला पकडण्यात सैनिकांना एके दिवशी यश आलेच. त्याला राजासमोर हजर करण्यात आले. राजाने त्याला ताबडतोब फासावर लटकवण्याची आज्ञा दिली.

बकुमारला झालेली शिक्षा ऐकून त्याचे अनेक नातेवाईकही त्याला येऊन भेटायला आले. त्याची आईदेखील त्याला भेटण्यास आली. परंतु आई सोडून तो सर्वांना भेटला. आईला मात्र त्याने भेट नाकारली. याचे कारण विचारले असता तो म्हणाला, ‘लहानपणी मी सर्वप्रथम एक सुवर्णमुद्रा चोरली होती. ही चोरलेली मुद्रा मी आईला नेऊन दिली. त्या वेळी तिने माझी प्रशंसा केली, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. जर तिने मला त्याच दिवशी फटकारले असते, चापट मारली असती तर हे दिवस पाहावे लागले नसते व मी दरोडेखोरही झालो नसतो.’

🔅तात्पर्य :~

पाया मजबूत आहे की ठिसूळ यावरच इमारत किती मजबूत असेल हे ठरत असते. तशाच प्रकारे मुलांवर लहानपणीच चांगले संस्कार केले गेले तर त्याच्या चांगल्या चारित्र्याचा पाया रचला जातो. वाईट संस्कार माणसाला अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतो.

✧═══❁❁═══✧✧═══❁❁═══✧

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट