◾बोधकथा :- सत्कारणी दान

एका गावात शिमक नावाचा एक धनवान माणूस राहत असे. फार विचारपूर्वक तो आपला पैसा खर्च करत असे. त्याने कधीही पैशाचा दुरूपयोग केला नाही. त्यामुळेच त्याला लोक 'कंजुष' म्हणत असत. लोक काय म्हणतील याचा त्याने कधीच विचार न करता आपला पैसा जोडून ठेवला होता.

         एकदा त्याला खूप ताप आला. त्याच्या मुलांनी व नातवांनी त्याच्यावर उपचार करण्याचे सुचविले असता शिमक म्हणाला,'' औषधांनी केवळ तापाचा प्रभाव कमी होईल पण रोग समूळ नष्ट होणार नाही. निसर्गनियमानुसार ताप आपोआप कमी होऊन जाईल व मी बरा होईन'' 

         शिमकच्या या गोष्टीचीही लोकांनी कंजुषपणातच गणना केली. शिमकने सर्वाचे म्हणणे ऐकले पण तो आपल्या मनाला येईल तेच योग्य याप्रमाणे वागत राहिला. त्याच्या नगरातील एक विद्वान आचार्य महिधरांनी वेदांवर काही ग्रंथ लिहीलेले शिमकच्या कानी आले. पण आचार्यांचयाकडे ते ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी पुरेसे धन उपलब्ध नव्हते. शिमकला ही माहिती मिळताक्षणी तो आचार्यांकडे गेला व म्‍हणाला, ''आचार्य, ज्ञान हे प्रवाही असावे. ज्ञानाचा प्रभाव हा समाजकारणासाठी झाला पाहिजे. ज्ञान वाटूनच समाजातील अनेक दुष्प्रभाव कमी करता येतील. या ग्रंथ प्रकाशनासाठी आपणास जितके धन हवे आहे तितके धन मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण ग्रंथ प्रकाशन करून तुम्ही समाजाला शिक्षित करावे ही माझी विनंती.'' 

         आचार्य महिधरांनी शिमककडून योग्य तेवढे धन घेऊन ग्रंथांचे प्रकाशन केले व शिमकला त्या ग्रंथप्रकाशनास बोलावले तेव्‍हा शिमकला मोठी धन्यता वाटली. लोकांनी शिमकच्या या उदारपणाचे कौतुक केले तेव्हा शिमक म्हणाला,'' माझ्याकडे असणा-या संपत्तीतून जर माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी जर काही धन खर्च झाले असते तर त्यात विशेष असे काहीच नव्हते पण समाजासाठी मी काही धन देऊ शकलो याचा मला आनंद आहे.''

🔅तात्पर्य :~

अपार संपत्ती जवळ आहे म्हणून तिचा मनमुक्तपणे उपभोग घेणे किंवा उधळपट्टी करणे यात शहाणपणा नसून त्‍या संपत्तीतून काही विधायक कार्य कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.

___________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...