मनातलं शब्दात

सहजच
मनातलं शब्दात 

"उसी रिश्ते की उम्र बड़ी होती हैं, जहां लोग एक-दूसरे को समझते हैं, परखते नहीं ।" •••

            अनिता आणि अजय. एक मस्त जोडी . अगदी छान पटत दोघांचे. दोघे एकमेकांना पूरक . मनातलं बोलून आपल्या सर्व अडचणी वेळेवर सोडवतात .इथे तिथे बोलण्यापेक्षा आपापसात बोलायचे हे 'agreement ' लग्नानंतर ठरवले होते दोघांनी . त्यामुळे दोघांच्या मनावर दडपण नसते . खूप साठवून एके दिवशी त्याचा स्फोट व्हायला नको , म्हणून ते दोघेही काळजी घेतात .खरंच किती साधा , सरळ ,सोप्पा उपाय आहे एकमेकांना समजायचा ,वेळेवर आधार द्यायचा , सावरायचा. नाही का ??? म्हणजे लग्नानंतर ठरवून ' made for each other ' झालेली ही जोडी आहे .असं म्हणावं लागेल .••••••
                   आई बाबा पण खूप खुश असतात .घर ,आई बाबा , स्वयंपाक, छोटी "राधा " सर्वांना सांभाळून अनिता गणिताच्या ट्युशन घेते . सर्व व्यवस्थित चालू असतं. सर्व एकमेकांना जसं जमेल तशी मदत करत असतात . ट्युशन च्या वेळेस आई राधाला सांभाळतात .म्हणजे एक छान आदर्श कुटुंब म्हणता येईल तसं हे कुटुंब . भरपूर संवाद असतो त्यांच्यात. हेच या आनंदी कुटुंबाचे रहस्य असावे बहुतेक .•••••
           'अनघा 'म्हणजे अजयची मोठी बहीण .दहा वर्षाने मोठी . काही निमित्ताने , सणावारी तिचे माहेरी येणे होते .ती येणार म्हंटल तर सर्व आनंदात असतात . साहजिकच आहे . मस्त छान बेत ठरतो. सणावाराच्या हिशोबाने ,अनघाची आवड लक्षात घेऊन ,तिचा व्यवस्थित मानपान होतो . बरोबर जावई 'अभिषेक 'असेल तर ,तर मग दुधात साखरच . अभिषेक खूप समजदार. 'जावयाचा' अजिबात मान लागत नाही त्याला. अजय व त्यांचे छान जमते .आई बाबा सर्वांचा मान ठेवून त्याचे वागणे असते . अनिता ला लहान बहिणीसारखे वागवतो तो . येताना अनिता साठी काही तरी खास आणतोच . अनिता ही त्याला मोठ्या भावाचा मान देते . ••••
             अनघा घरची मोठी म्हणून तिच्या वागण्या बोलण्यात तसे दिसून येते . अनितालाही अनघा बद्दल आदर आहे .तिचा आधार आहे. हेही ती जाणून आहे .एकच बहिण व ती पण दहा वर्षांनी मोठी म्हणजे नक्कीच अनुभवाने श्रीमंत . व लहान भावावर हक्क पण तेवढाच . अजूनही अजयला लहानच समजते. खूप लाड करते , कौतुक करते .•••
 अनिता व अनघा दोघींचे वेगवेगळे interests आहेत .दोघी आपापल्या क्षेत्रात उत्तम आहेत .•••••
     वयात अंतर म्हणजे जनरेशन गॅप भरपूर आहे . त्यात प्रत्त्येक व्यक्तिमत्त्व वेगळं असतं ,आवड, interests , क्षमता, लाइफ मधे प्रत्येकाच्या Priorities वेगळ्या असतात . अनिता व अनघाचेही तसेच आहे . बरे असो ,•••••
      अनिताला मागच्या वर्षीची दिवाळी आठवली . फराळाचे बरेच पदार्थ तिने विकतच आणले होते . दाराबाहेर रांगोळी काढली नव्हती . घर अपेक्षेप्रमाणे स्वच्छ नव्हते . अशा अनेक गोष्टी अनघा ताईंनी तिला बोलून दाखविल्या होत्या . अनिताला ते आवडले नव्हते . तिने अजयला विचारले होते,••••• तुलाही असंच वाटतं का ?? तेंव्हा अजय म्हणाला होता,•••• अग! तुला जे आवडतं ते कर .माझं काहीच म्हणणं नाही .किंवा आग्रहही नाही .पण मी ताईला याबाबतीत काही उत्तर देणार नाही .••••
      बस ,अनिता ला अजयकडून एवढंच ऐकायचं होतं . तिला पण अनघा ताईंचा मान ठेवायचाच होता.नात जपायच होत . फक्त अजयचा 'support ' हवा होता . ••••
       मागच्याच वर्षीची गोष्ट,. दिवाळी नंतर अभिषेक ने अनघाला याच बाबतीत समजाविले होते . अनिताच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी पण आहेत , त्याकडे लक्ष दे .आपला दृष्टिकोन बदल. आपला मान स्वतः ठेवायचा असतो . उगीच तुलनेत पडू नकोस . तुम्ही दोघीही चांगल्या अहात . छोट्या छोट्या गोष्टींवरून मनात अढी निर्माण व्हायला नको . अनिताला टोकत जाऊ नको . माहेरी जाऊन मानाने रहा ,तेथे मधेमधे करू नको .•••••
 बरोबर आहे ,••••
  "एकवेळ पाय घसरला तर सांभाळून पुन्हा उभे राहता येत.•• पण जीभ घसरली तर, बोललेले शब्द परत घेता येत नाही .मनावर नेहमी करिता चरे पडतात . "••••
  म्हणतात ना ,•••
  
     " जिंदगी आसान हो जाती हैं,जब परखने वाले नहीं समझने वाले मिल जाते हैं।"••••
     
                 आता यावर्षी पण सर्व तसेच होणार का ?? या विचारातच होती अनिता ?? 
            आज दिवाळीचा दिवस , यावर्षी अनिताने सुंदर आकाश कंदील बनविला होता .अनघा अभिषेक ला खूप आवडला . भरपूर गप्पा झाल्या . तेंव्हाच घरी काम करणाऱ्या मावशींचा फोन आला . त्यांच्या मुलीची अॅडमिशन झाल्याचे सांगितले .काल शेवटचा दिवस होता , अनिताने तिची फी on Line भरली होती.••••
        संध्याकाळी पणत्या लावल्या . अनिता वरच्या पाटील आजोबांकडे जाऊन पणत्या लावून आली , फराळाचे पॅकेट देऊन आली .••••
         "आजोबा खालीच जेवायला या".••••
    असं सांगुन आली. यावर्षी काही कारणाने पाटील आजोबांचा मुलगा ' परागला ' अमेरिकेहून येणे जमले नाही . त्यामुळे पाटील आजोबा एकटेच आहेत. हे तिला माहीत होते.•••
        अनघाने आई बाबां व पाटील आजोबांसाठी स्वेटर आणले . अभिषेक दादाला पूढच्या महिन्यात जपानला टूरवर जायचे आहे, म्हणून त्याच्या साठी पासपोर्ट , ठेवायला छान लेदर बॅग आणली . बाकी अनघा ताईंचा अहेर तर होताच .••••
        यावेळेस सर्व आनंदात पार पडलं . हा पूर्ण घटनाक्रम म्हणजे "मागच्या दिवाळी ते या दिवाळी पर्यंत" बघीतला तर , असं लक्षात येतं की , प्रत्त्येक जण सांभाळून वागला. प्रत्त्येकाने दुसऱ्याला आधार दिला . चूकीच्या मार्गाने जात असणाऱ्या अनघाला , अभिषेक ने वेळेवर सतर्क केले , अनिता अजय ने संयम ठेवला .म्हणून खूप संभाव्य गोष्टी घडल्याचं नाही .•••••
 अनघा आणि अनिता दोघींही आपल्या कर्तव्यात चोख . दोघींनी एकमेकींचा मान राखला .•••••
 असंच असावं . प्रत्त्येकाने आपल्या आवडीनुसार जगावे . ••••
 कोणत्याही नात्यात तुलना नकोच . बंधन नको .फराळ घरी करणे किंवा बाहेरून विकत आणणे , रांगोळी काढता येणे किंवा न येणे. घरी जेवायला बोलवायचे की बाहेर हॉटेलमध्ये, हे ज्याचे त्याने ठरवावे . प्रत्येकाच्या निर्णयाचा मान ठेवावा . त्यावर काही चर्चा करणे, काही अनुमान लावणे, निष्कर्ष काढणे , आपल्या मता प्रमाणे ठप्पा मारणे चूकच. या अशा गोष्टी कोणाला चांगल - वाईट, बरोबर -चूक , ठरवायचा मापदंड असूच शकत नाही .हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न असतो , त्यावरून मार्क्स कमी जास्त होत नाही .कोणी 'पास 'किंवा 'नापास ' होत नाही . अशा अनेक गोष्टींमधे आपण खूप वेळ व शक्ति वाया घालवतो .••••
 "मला जर कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही , लुडबुड ,मधे मधे करणे आवडत नाही .मग हेच सर्व दुसऱ्या ला कसं काय आवडेल ??" याचा विचार करावा .••••
       अनघा चे नक्कीच कौतुक . आपली संस्कृती जपणे तिला छान जमते .ती जुन्या परंपरेचे प्रतिनिधित्व करते. पण मग अनिताला मार्क्स कमी मिळावे का ?? दिवाळी मध्ये ती पाटील आजोबांना विसरली नाही .तिने घरी चकल्या तळल्या नाही ,पण छान आकाश कंदील तयार केला .एका विद्यार्थ्याचे शिक्षण चालू रहावे ,म्हणून वेळेवर फी भरायला विसरली नाही ती .हे सर्व पण कौतुकास्पदच आहे . नाही का ?? ••••
     " She coloured our minds with new ideas ."••••
" आपला दृष्टिकोन सरळ ठेवला तर, सर्व सरळ, स्वच्छ व छान दिसत .मन जुळतात. संबंध चांगले राहतात .••••
आधुनिक जगाच्या सुंदर ,सुधारक नवीन संकल्पना आणि आपली पारंपरिक संस्कृति दोन्ही आपल्या जीवनात आवश्यक आहे . दोन्हींच्या संगतीत आपण श्रीमंत होतो .••••

 फेसबुक वर हजारो मित्र , पंचवीस what's app गृप , काही ही असू दे , शेवटी घरचे घरचेच असतात .•••••
 
 म्हणतात ना ,••• 
  "जर तुमच्या दृष्टीने दुसऱ्या कोणाचे एखादे काम / शब्द तुम्हाला चूकीचा वाटतं असेल, तरी त्या कडे दुर्लक्ष करून बाकी हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, नात्यात कधीच दूरावा येणार नाही ." ••••
  

संध्या बेडेकर ••••



______________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...