खंबीर मनाच्या दहा सवयी.
खंबीर मनाच्या दहा सवयी.
आयुष्यात बरयाच वेळा कठीण प्रसंग येतात.
प्रत्येकाची मनाची ताकद वेगवेगळी असते.
काही लोक सटपटुन जातात. घाबरुन जातात.
काही लोक घाबरुन जीव देण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण संकटाच अवलोकन करतात. नीट विचार करतात आणि संकटाचा सामना करुन त्यावर काबु मिळवतात. ही लोक खंबीर आणि कणखर मनाची असतात. डगमगत नाहीत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ज्याची मनाची ताकद जास्ती तो निवांत आयुष्य तरुन जातो.
काही वर्षांपुर्वी अमेरिका इराक युद्धामध्ये इराकने तेलविहीरींना आग लावुन ठेवल्या होत्या. त्या आगी कुणाला विझवता येईनात. त्याची विशीष्ट पध्दत होती. कारण धाडसी व्यक्तीचं हे काम होत. आगीशी खेळ होता. क्षणार्धात जीव जाऊ शकत
होता. जगामध्ये अमेरिकेतील 'काऊ बाॅईज' हे ह्या कामासाठी उत्कृष्ट मानले जातात. खंबीर आणि ताकदवान मनाच्या 'काऊ बाॅईज' ची एकाग्रता जास्त असते. ते क्षणार्धात निर्णय घेतात. पुढं येणारया प्रसंगाला डगमगत नाहीत.
भुकंप, वादळ, वारा, पुर वगैरे घटना घडल्यानंतर जी लोकं परत आयुष्य उभ करतात तेही खंबीर मनोवृत्तीचच लक्षण आहे.
खंबीर व कणखर मनाची काही लक्षण आहेत.
१. त्यांना आवडते त्याच गोष्टी ते करतात.
२. प्रत्येक वेळेस नफा तोट्याचा हिशोब डोक्यात असतो. प्रत्येक गोष्टीतील नफा तेवढा उचलतात.
३. मनानं कमजोर व्यक्ती लगेच हेरतात.
४. मन अस्वस्थ होऊ देत नाहीत. झालं तरी लगेच शांत होतात.
५. कितीही दु:खाचा प्रसंग आला तरी ते तेवढ्या
पुरताच त्याचा विचार करतात. त्यातुन लगेच बाहेर पडतात.
६. सहज एखाद्याला माफ करतात. पण हिशोब डोक्यात घोळत असतो.
७. परिस्थीती प्रमाणे स्वत:त आणि राहणीमानात
बदल करतात.
८. सगळे बदल स्विकारतात पण पाहिजे ते मिळवतात.
९. आनंदाने बेहोश होत नाहीत की दु:खान गळुन पडत नाहीत.
१०. सतत सकारात्मक विचार करतात. कितीही टोकाला प्रसंग गेला तरी त्यातुन मार्ग काढायचा प्रयत्न करतात.
११. प्रसंगी दोन हात करायची तयारी ठेवतात.
अशी लोकं मृत्यू चा तसेच नुकसानीचा आधीच
विचार करतात त्यामुळे न भिता संकटाला आणि प्रश्नांना सामोरे जातात.
हे कणखर मन प्रत्येकाकड का नाही तर त्यात
थोडा अनुवांशिकतेचा भाग आहे. पण ते अगदी
पक्कं आहे असं म्हणता येणार नाही.
सतत आनंदी वातावरणात राहुन मन खंबीर होत. सकारात्मक विचारांनी हळुहळु मन खंबीर होत.
तुमच्या भोवताली सतत असणार्या लोकांच्या
वावरामुळे मन खंबीर होत.
पत्रकार नितीन रेळेकर.
पत्रकार नितीन रेळेकर.
__________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
छान लेख
उत्तर द्याहटवाThanks for your lovely review
हटवा