पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

◾बोधकथा :- रफू...

इमेज
              रफू...               एक मित्र भेटला परवा... खूप जुना... बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... म्हणाला, "मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय." सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला.  विचारलं मी त्याला 'अचानक ऊपरती होण्यामागचं कारण...' चेहऱ्यावर शक्य तेव्हढा 'आलासच ना अखेरीस ' हा माज ठेऊन.  तो मला म्हणाला, "दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली... काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास... ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं... आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता... वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली.

◾परिचय :- ओटो हान... | Otto Hahn

इमेज
परिचय शास्त्रज्ञांचा... ओटो हान  (Otto Hahn) संस्कारदीपवर विज्ञान वार्ता... नाव : ओटो हान  (Otto Hahn) जन्म : ८ मार्च १८७९ मृत्यू : २८ जुलै १९६८ ओटो हान हे जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अणुकेंद्रकाचे विखंडन या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी किरणोत्सार आणि किरणोत्सारी रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन केले.  रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन करून थोरियम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच थोरियम-२२७ चा समस्थानिक, थोरियम सी म्हणजेच पोलोनियम-२१२, रेडियम डी म्हणजेच शिसे - २१० या समस्थानिकांचा  शोध लावला. हान यांचा जन्म फ्रँकफुर्ट येथे झाला. त्यांनी प्रथम रसायनशास्त्र आणि खनिजशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर मारबुर्ग विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्रात पीच्.डी. पदवी मिळवली (१९०१). त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक थेओडॉर झिंके यांचे सहाय्यक म्हणून ऑटो हान यांनी त्याच विद्यापीठात दोन वर्षे काम केले. त्यांनी लंडन विद्यापीठात सर विल्यम रॅम्झी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून किरणोत्सारी थोरियम  या मूलद्रव्याचा शोध लावला (१९०४).  प्रथम त्यांना वाटले की हे नवीन मू

◾विशेष लेख :- संत गाडगे महाराज आणि त्याची किर्तने...

इमेज
गा डगेबाबा हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयाञा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. स्वच्छता, करुणा आणि शिक्षण विवेकनिष्ठ मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य केले. बाबांचे काही वैचारिक किर्तने..   किर्तन १                                       बाबा :-   देव किती?   श्रोते :-   एक. बाबा :-   तुमच्या गावी खंडोबा आहे का?  श्रोते :-   आहे  बाबा :- मग देव किती झाले श्रोते :- दोन  बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का?  श्रोते :- आहे  बाबा :- मग आता देव किती झाले?  श्रोते :-  तीन  बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का?  श्रोते :- आहे  बाबा :- मग देव किती झाले  श्रोते :- चार  बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।  किर्तन २                                       बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड?  श्रोते :- श्रीखंड  बाबा :-  बासुंदी चांगली का बोकड?  श्रोते :- बासुंदी  बाबा :- दूध चांगले का बोकड?  श्रोते :- दूध  बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती मारवाडी कधी

◾बोधकथा :- आनंदी राहण्याचे गुपित...

इमेज
ए कदा एका व्यापाऱ्यांनी आपल्या मुलाला सांगितले कि, तू जगातल्या सगळ्यांत हुशार ( हुशारातला हुशार ) व्यक्तीकडे जाऊन "आनंदी राहण्याचे गुपित" माहित करून ये.  तो मुलगा वाळवंटात... सलग ४० दिवस व्यक्तीचा शोध घेत राहिला आणि ४० दिवसानंतर एका भव्यदिव्य राजवाड्यात पोहोचला जिथे तो हुशार व्यक्ती राहत होता. मुलाला त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली. जेव्हा मुलगा त्या हुशार व्यक्तीला भेटला आणि सांगू लागला कि... तो कशासाठी इथे आला आहे.  तेव्हा हुशार व्यक्ती म्हणाली,  "माझ्याकडे सध्या तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी वेळ नाहीये. तोपर्यंत तू एक काम कर पुढचे १-२ तास तू ह्या किल्ल्याचा फेरफटका मारून ये. पण.... येथे फेरफटका मारतांना तुला एक काम करायचं आहे. हा घे चमचा आणि ह्यात दोन तेलाचे थेंब मी टाकलेले आहेत. तू पाहिजे तिकडे फिर फक्त लक्षात ठेव ह्या चमच्यातून तेलाचे थेंब खाली पडता कामा नये.." "मुलगा राजवाडा फिरायला सुरु करतो. दरम्यान तो अनेक जिन्यावरून चढतो खाली उतरतो. परंतु त्याचे लक्ष फक्त हातात असलेल्या चमच्यावर असते जेणेकरून त्यातले तेल खाली पडू नये...

◾विशेष लेख :- कोरोना कसा जाईल ते श्रीकृष्णाने सांगितले आहे...

इमेज
कोरोना कसा जाईल ते श्रीकृष्णाने सांगुन ठेवले वाचा संपुर्ण  एकदा श्रीकृष्ण , बलराम आणि सुदामा शेजारच्या गावात एका गृहस्थाकडे जेवायला गेले होते. त्यांना तिथून निघायला उशीर झाला आणि परतीच्या वाटेत एक जंगल होत. गावातल्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितले की रात्री या जंगलात एक मोठ्ठा राक्षस येतो आणि तो लोकांना मारून टाकतो. अंधार झाला आणि हे तिन्ही जण जंगलात अडकले, रस्ता सुचत नसल्याने तिघांनी जंगलातच रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला आणि तिघांनी ठरवले की 2 जण झोपतील आणि 1 जण राक्षसाशी लढेल. त्याप्रमाणे बालरामाने लढायला सुरुवात केली आणि सुदामा व श्रीकृष्ण झोपले. त्या राक्षसाच एक वैशिष्ट्य होत, त्याच्यावर जेवढे वार केले जायचे तेवढाच तो मोठा व्हायचा त्यामुळे बलरामाने लढायला सुरुवात केल्यावर सामान्य मनुष्य एवढा असलेला तो राक्षस प्रत्येक वारामुळे मोठा होऊ लागला आणि काही वेळाने त्या भल्या मोठ्या रक्षासाशी लढायला आपण असमर्थ आहोत हे बलरामाच्या लक्षात आलं म्हणून त्याने सुदामाला उठवलं आणि बलराम झोपला सुदामाने वार केल्यावर तो काही वेळातच गगनभेदी झाला. त्यामुळे त्याला घाबरून सुदामाने श्रीकृष्णाला उठवल

◾विशेष लेख :- एकनाथांचे सहस्त्रभोजन ...

इमेज
एकनाथांचे सहस्त्रभोजन पै ठणात एक वृद्ध स्त्री रहात होती. नवरा हयात असताना त्या स्त्रीने सहस्त्रभोजनाचा संकल्प सोडला होता. परंतु काही कारणाने तो पूर्ण होऊ शकला नाही. तिच्या मनाला मोठी रुखरुख लागून राहिली होती. ती दररोज नाथांचे वाड्यात प्रवचन ऐकावयाला येत असे. एक दिवस प्रवचनात नाथ बोलून गेले की एका विद्वान पंडीतास जेवू घातले तर सहस्त्र भोजनाचे पुण्य लाभते. ते वाक्य तिच्या लक्षात राहिले आणि तिला तिच्या संकल्पाची आठवण झाली. एके दिवशी नाथांचे प्रवचन संपल्यावर ती वृद्ध स्त्री नाथांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाली, "आपण माझे घरी भोजनास यावे अशी विनंती करायला मी आले आहे, महाराज मी सहस्त्र भोजनाचा संकल्प केला होता, पण यजमान नाहीत त्यामुळे तो आता काही पूर्ण होईल असे मला वाटत नाही.'  नाथ म्हणाले आपण शुद्ध मनाने निर्हेतुक पणे संकल्प सोडला असेल तर त्याची काळजी श्रीहरिला ! मी येईन बरे ! आपल्या मदतीसाठी मी माझ्या मुलास - हरिपंडीतास पाठवून देतो. त्या वृद्ध स्त्रीने नाथांना  आमंत्रण दिले कारण नाथ विद्वान होते, पंडीत होते, ब्रह्मवेत्ते होते. नाथांनी भोजनाचे आमंत्रण स्वीकारले आणि रात्र

◾आरोग्य :- ताण आणि आरोग्य...

इमेज
ताण आणि आरोग्य..        माझा स्वताचा अनुभव शेअर करतेय.. शेअर यासाठी करतेय की तुम्हाला याचा उपयोग व्हावा.. माझा स्वभाव म्हणजे डोंगर कोसळला तरीही मी कायमच सुखी आणि आनंदी असते..कोणीही विचारले How are yu sonal..माझं उत्तर असतं I am as usual Happy.. कायम मी आनंदी आणि समाधानी राहायचा प्रयत्न करते आणि दुसऱ्याला जितका आनंद देता येइल तेवढा देते..         गेले काही दिवसांपासून घरी एक टेंशन होतं.. पाच मिनीटाच्या वर मी तणावाखाली रहात नाही .. टेंशन आलं की निसर्गाच्या सान्निध्यात जाते आणि मजेत घरी येते.. पण त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं गेलं आणि त्याचा परिणाम माझ्या तब्बेतीवर झाला.. शरीरात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली  परिणामी युरिन आग होणे.. चेहऱ्यावर लाल चट्टे. हातापायाची आग.. घरगुती सगळे उपाय केले.. धने जीरे पाणी..ताक.गार दुध..नारळ पाणी या सगळ्याचा प्रचंड मारा केला तरीही उष्णता कमी होइना.. काही डॉक्टर मित्रांशी बोलले त्यांचं म्हणणं प्रीमेनोपॉज असेल.. शेवटी गायनॅकॉलॉजीस्ट कडे गेले.. २५०० ला चुना लावुन गोळ्या घेउन घरी आले.. दोन दिवस औषध घेउन पण काही फरक पडेना.. खूपच त्रास होत होता आणि अचानक घरचं टेंशन

◾बोधकथा :- नुसते विचार करण्यापेक्षा कृतीला महत्त्व

इमेज
एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन ! कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अश्या व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी ! घोषणा ऐकून राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ? मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता.  गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ?? शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला माग

◾विशेष लेख :- जोकर

इमेज
“ जोकर “ ©️ क्षितिज दाते , ठाणे त्याला “जोकर” हे नाव शाळेत असतानाच पडलं..  . कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो  ... आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं .. आणि तो सुद्धा ते नेहमीच सार्थ ठरवायचा .. अभ्यासात फार काही चमकदार नसला तरी सुस्वभावी आणि निरुपद्रवी होता ..किंबहुना कोणाला काही मदत हवी असली तर लगेच करायला जायचा ....पण मित्र त्याला फार काही जवळ करायचे नाहीत .. चिडवायचे ,हसायचे त्याला  ..... त्यामुळे मित्रांच्या अनेक ग्रुपपैकी कुठल्याच विशिष्ट अशा ग्रुपचा भाग नव्हता तो कधीच .. अगदी अलिप्त नसला तरी शक्यतो आपला आपलाच असायचा ..  तरीही प्रसंगी कोणाच्यातही मिसळू शकेल असा मनमिळाऊ  होता .. मुळात कोणाचा त्याच्यावर राग, द्वेष  वगैरे नव्हता पण शाळे

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...