◾बोधकथा :- रफू...

              रफू...              

एक मित्र भेटला परवा... खूप जुना... बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... म्हणाला, "मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. 
विचारलं मी त्याला 'अचानक ऊपरती होण्यामागचं कारण...' चेहऱ्यावर शक्य तेव्हढा 'आलासच ना अखेरीस' हा माज ठेऊन. 

तो मला म्हणाला, "दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली... काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास... ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं... आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता... वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली...

त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच... मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन... तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'... ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी...नाही शिवू शकलो मी ते भोक... नाही करु शकलो रफू...नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छीद्र...
_माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...!_ 
गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत... 'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात... 
म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे... 
आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला... यावेळी तू आपलं नातं 'रफू' केलेलं पहायला... त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला".

सुन्न होऊन ऐकत होतो मी... 
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला... 'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो' चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता. 
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. 
'तो' त्याने नकळत केलेल्या 'पापातून'... अन् 'मी' नकळत दिलेल्या 'शापातून' ऊतराई होऊ बघत होतो... मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो... 
दोघं मिळून एक नातं,
नव्याने 'रफू' करू पाहत होतो!

🔅तात्पर्य :-

मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावणेचा सदैव प्रयत्न झाला पाहीजे, त्यासाठी सर्व नातेसंबंधांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही,आपल्या आचरणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच "रफू" करायला विसरू नका.... 

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट