◾बोधकथा :- आनंदी राहण्याचे गुपित...

कदा एका व्यापाऱ्यांनी आपल्या मुलाला सांगितले कि, तू जगातल्या सगळ्यांत हुशार ( हुशारातला हुशार ) व्यक्तीकडे जाऊन "आनंदी राहण्याचे गुपित" माहित करून ये. 

तो मुलगा वाळवंटात... सलग ४० दिवस व्यक्तीचा शोध घेत राहिला आणि ४० दिवसानंतर एका भव्यदिव्य राजवाड्यात पोहोचला जिथे तो हुशार व्यक्ती राहत होता.

मुलाला त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली. जेव्हा मुलगा त्या हुशार व्यक्तीला भेटला आणि सांगू लागला कि... तो कशासाठी इथे आला आहे. 
तेव्हा हुशार व्यक्ती म्हणाली,
 "माझ्याकडे सध्या तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी वेळ नाहीये. तोपर्यंत तू एक काम कर पुढचे १-२ तास तू ह्या किल्ल्याचा फेरफटका मारून ये. पण.... येथे फेरफटका मारतांना तुला एक काम करायचं आहे. हा घे चमचा आणि ह्यात दोन तेलाचे थेंब मी टाकलेले आहेत. तू पाहिजे तिकडे फिर फक्त लक्षात ठेव ह्या चमच्यातून तेलाचे थेंब खाली पडता कामा नये.."

"मुलगा राजवाडा फिरायला सुरु करतो. दरम्यान तो अनेक जिन्यावरून चढतो खाली उतरतो. परंतु त्याचे लक्ष फक्त हातात असलेल्या चमच्यावर असते जेणेकरून त्यातले तेल खाली पडू नये... दोन तासांनी जेव्हा तो त्या हुशार व्यक्तीच्या खोलीत पोहोचतो तेव्हा तो हुशार व्यक्ती म्हणतो…"

"वेल, तू पाहिलेस का माझ्या जेवणाच्या खोलीत पर्शियन नक्षीकाम आहे? तू ती बाग पाहिलीस का ज्याला बनवायला १० वर्ष लागलीत? तुला माझ्या ग्रंथालयात ठेवलेले सुंदर चर्मपत्र दिसले का???"

मुलगा थोडा ओशाळला आणि सांगू लागला कि... त्याने काहीच पाहिले नाही कारण त्याचे सगळे लक्ष हातात असलेल्या चमच्यावर आणि त्या तेलावर होते.

तेव्हा तो हुशार व्यक्ती म्हणाला —
"मग तू परत जा आणि सगळे नीट निरीक्षण करून पहा, त्यांचा आनंद घे… ज्या व्यक्तीचे घर तू नीट पाहिले नाहीस त्या व्यक्तीवर तू विश्वास कसा ठेवशील ??"

मुलगा आनंदी झाला. हातात तेलाचा चमचा घेऊन तो परत राजवाडा पाहायला निघाला. ह्यावेळेस त्याने सगळ्या गोष्टींचे बारीक निरीक्षण केले. त्याने सुंदर बाग पाहिली - उंच उंच डोंगर पाहिले - सुंदर फुलं पाहिली… हे सगळे पाहून आनंदी होऊन मुलगा परत त्या हुशार व्यक्तीकडे आला आणि त्याने जे काही निरीक्षण केले ते सांगून दाखविले.

पण हे सगळे ऐकल्यावर तो हुशार व्यक्ती म्हणाला, "पण मी तुला चमच्यात दिलेलं तेल कुठे आहे??"

मुलाने खाली मान करून हातात असलेल्या चमच्याकडे पाहिले तर त्यातील तेल कधीचे सांडले गेले होते…

"तो हुशार व्यक्ती बोलला, "वेल, मी तुला फक्त एकच सल्ला देऊ शकतो."

नेहमी आनंदी राहण्याचे गुपित हे आहे कि... माणसाने ह्या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा परंतु तो आनंद घेता घेता जवळ असलेल्या तेलाचा विसर माणसाला पडता कामा नये!!"
🔅 तात्पर्य :-

सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा परंतु आपल्याजवळ असलेल्या सगळ्यांत जास्त महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्यापण खाली पडू देऊ नये. माणसाने सृष्टीचा उपभोग नक्कीच घ्यावा ते घेणे गरजेच आहेच परंतु असे करतांना हृदयाचे ऐकणे सोडू नये — ध्येय सोडू नये !!!

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
         
टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट