पोस्ट्स

◾विशेष लेख :- टर्निंग पॅाईंट..

इमेज
‘टर्निंग पॅाईंट..!’             १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला.डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा. किती मेहनतीने,हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.खूप सारी स्वप्न घेऊन! ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती. अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्रीया करावीच लागली. रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा.  मनातून  तर जवळ जवळ संपलो होतो मी.दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची  अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवू...

◾विशेष लेख :- प्रवास... आयुष्याचा

इमेज
आयुष्याच्या वळणावर अशी कही माणसे भेटतात, जी आपल्याला जगायचं कसं हे शिकवून जातात. मग शिकवणारे फक्त शिक्षक नसतात. तर आयुष्य जगताना जे अनुभव येतात, ते शिक्षणापेक्षा जास्त मौल्यवान असतात. आज इस्लामपुरला चाललेलो, काही कामा निमित्त. एक वृद्ध, वयस्कर आजोबांनी हात केला, खुप थकलेला चेहरा होता. मी गाड़ी थांबवली, तर आजोबांनी विचारलं साखर कारखान्यावर सोडनार का? मी हो बोललो. आणि त्यांना गाड़ीवर निट बसता येईल का, याची खात्री केली. ते हो बोलले, आणि एक अनुभवी प्रवास आमचा सुरु झाला. मी सहज विचारलं, "आजोबा राहता कुठे?" तर आजोबानी सांगितलं पैसे नाहीत म्हणून असं हात करून जातो मी. कदाचित त्यांना मी विचारलेला प्रश्न निट ऐकता आला नसावा. मी पुन्हा विचारलं, "आजोबा राहता कुठे?" उत्तर आलं, येडे गावात. मग ना राहून विचारलं, कुठे जाताय तुम्ही? तर साखर कारखान्यावर एका माणसाला भेटायला. मग आजोबाना विचारलं, त्यांची ती अवस्था बघून, की तुम्ही जे बोलला पैसे नाहीत. तर आजोबा तुम्हाला मूल नाहीत का? आजोबा बोलले "दोन बोकड आहेत."  मला नाही समजलं. मी पुन्हा विचारलं, "तुम्हाला मूलं नाहीत का?"...

◾विशेष लेख :- सोबत

इमेज
आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे. ज्याची पाठ फिरेल, त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना.... की नको वाटतं....! इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?  ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते, ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.' ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं, आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता... कधीतरी अशी वेळ येते की, तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते. प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं, ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना "स्वतःला काय हवं आहे?" हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही. मग अशा वेळी प्रश्न पडतो  "हे सगळं ...

◾कविता :- एक फोन कर...

इमेज
एक फोन कर... खरचं यार बोललं की बरं वाटतं, *खरचं आपलं कोणी आहे हे खरं वाटतं,* *तुझं - माझं त्याचं याची होते चौकशी*  *समजते सारी मंडळी आहेत कशी* *फार नसतात हो लोकांच्या अपेक्षा,*  *आपले कोणी आहे*  *त्यांनी बोलावं मन भरून*  *इतकीच असते इच्छा*  *काहीही करतो फाॕरवर्ड आपण*  *नसतो कधी काही संबंध*  *त्यापेक्षा थेट फोन करून बोलावं ना,* *अधिक जुळून येतील बंध*  *कुठे माहिती आहे आपल्याला,* *कोणी असेल एकटं*  *भरून आलं असेल मन त्याचं*  *बोलावं त्याला वाटतं*  *नुसतेच लाईक कमेंंट*  *या पलिकडे जोडलीत आपण नाती*  *मैत्र जपलं पाहिजे*  *त्यासाठी उजळल्या पाहिजेत ज्योती*  *गेली कुणाची आई,* *भाऊ गेला कुणाचा,* *यार सखा, गेला मित्र,*  *कुणाचे गेले असेल छत्र,* *आपणही केवळ आहोत जिवंत*  *त्यांच्या शिवाय नाही जगणे*  *चल यार एक फोन करुया*  *नाही बरे असे तुटक वागणे* *संकटे येतील संकटे जातील*  *धीर द्यायला हवा,* *एकटेपणा काय असतो* *कधी अनुभवून पहा* *आपण लाकडी, लोखंडी* *नाही आपण पुतळे,* *आणि नाहीच आपण काळीज नसणारे केवळ मा...

◾बोधकथा :- मासा आणि हंस

एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राक...

◾बोधकथा :- लालसा

इमेज
एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि झाडाला बांधून घातले. मग गावकरी विचार करू लागले याला काय शिक्षा द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले कि मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची. सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यास गेले. काही वेळ गेल्यावर त्या रस्त्याने एक मेंढपाळ जात होता, त्याने त्या चोराला झाडाला बांधलेले पाहिले, त्याला उत्सुकता वाटली त्याने त्या चोराला विचारले,"तू कोण आहेस? तुला असे कोणी बांधून ठेवले आहे? तू काय गुन्हा केला आहेस?" चोराने विचार केला हि सुटायची चांगली संधी चालून आली आहे. चोर म्हणाला, "अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर ! इथे काही चोर आले होते. लोकांची लुट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन दान करतात.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता. ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेतच नव्हते. अशातच त्यांनी त्यांनी मला दान घ्यावे म्हंटले पण मी नकार द...

◾विशेष लेख :- हे सुदंर जीवन... Marathi Audiobook mp3 Marathi Audiostory

इमेज
हे सुदंर जीवन संजय धनगव्हाळ ******************* नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच माणसाच्या आयुष्यालाही दोन बाजू आहेत,जसे जीवन,मरण या दोन बाजू असल्याशिवाय माणसाचे आयुष्य पुर्ण होत नाही.अगदी तसेच  माणसाच्या जगण्यालाही सुख दुःखाची किनार असल्याशिवाय  आयुष्याला अर्थ येत नाही.कारण काय की माणसाचे जीवन हे ऊन सावली सारखे असल्याने सुखा सोबत दुःखही असणारचं आहे म्हणूनतर जगण्याचा प्रवास विविध अनुभवातून होत असतो.जसे जेवणात लोणचे नसेल तर जेवणाला मजा येत नाही  तसेच,आयुष्यात दुःख नसेल तर जगणं कळत नाही.जगण्याला निट समजून घेण्यासाठीच सुखाच्या पाठीशी दुःख उभे असते आणि दुःख असल्याशिवाय आयुष्यही कळणार कसे तेव्हा जगणं आणि आयुष्य हे दोघही समजले तर दुःख पचवणे अथवा दुःखाचा सामना करणे अवघड जात नाही.जेव्हा जीवन जगताना जगण्यातच आनंद शोधला पाहिजे आनंद असेल तर सहाजिकच सुखालाही मग जवळकी करावीशी वाटतेचं.खरतर माणूस हा पुर्णतः सुखात नसतोच कुठेतरी माणसीकरित्या दुखावलेला असतोच दुःखाच वेटोळे त्याच्या अवतीभोवती घुटमळत असल्यामुळे माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नसतो,अशावेळी पावलोपावली अपयशाचाही समना करावा...

◾सुविचार :- १५१ नवीन मराठी सुविचार

इमेज
  जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•               *पिंजरे में रहने का* दर्द क्या होता है, आज तू भी जान ले ए इंसान...! आजाद कर दे अब भी उन परिंदों को जिनका छीना है तूने आसमान...!_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•                 _*वैसे दुनिया में सलाह देने वाले लाखो मिल जाएंगे, लेकिन मुसीबत के वक्त आपका खास ही आपके साथ होता है, जो आपको दिल से चाहता है..! आज कोरोना के मुसीबत की घडी में आप जिनके साथ हो, वो ही हमारे अपने है उन्हें कभी ना भूलें...!*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•             _*जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पहा.*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•                 _*मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ...

◾बोधकथा :- किस्सा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा

इमेज
नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्‍मजात हुशार होते. त्‍यांच्‍या वडील वकिलांची इच्‍छा होती की, मुलाने आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी सुभाषबाबू इंग्‍लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.  परंतु त्‍यांचा इंग्रजांच्‍या गुलामीला विरोध होता. त्‍यांच्‍यात राष्‍ट्रसेवेची प्रबळ इच्‍छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्‍च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्‍यागमय मार्ग होता. याचे त्‍यांच्‍या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्‍यांनी घेतला. त्‍यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्‍यू यांच्‍याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्‍यांच्‍या वडिलांचे मित्र विल्‍यम ड्युक यांनी त्‍यांचा राजीनामा आपल्‍याजवळ ठेवून त्‍यांच्‍या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्‍या या कार्याकडे गौरव म्‍हणून पाहतोय. मी त्‍याची ही अट मान्‍य करण्‍यासाठी त्‍याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्‍यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्‍यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन...

◾BY विश्वास नांगरे पाटील - वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर..

इमेज
त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._  हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.  1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.  धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये. 2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता क...

◾थोडं मनातलं :- गावाकडचं पत्र...

इमेज
📮 गावाकडचं पत्र  !!  📬 तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय? अवो, काई न्हाई, चुलीच्या धुरानं पाणी आलंय जरा, न तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय ? आगं, वावधान उठलं न फुफाटा डोळ्यात गेलायं बघ. दोघांनी एकमेकाला खोटंच सांगितलेलं. तालुक्याला शिकणाऱ्या पोराचं पत्र आलेलं. खुशाली कळवली, अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितलं... त्याचा दोघांना आनंद झालेला. पत्र आलेलं डालडाच्या पत्र्याच्या डब्यात, भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं. त्याला भाकरीचा, लोणच्याचा गंध लागलेला. सकाळी आईन पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडलान लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेलं. "पाऊस बराय, गहू काढणीला आलायं, गाईला कालवड झालीय, तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईनं, तुझ्या मित्रांना पण दे, बाकी खुशाल, सुट्टीत आल्यावर बोलू, काळजी घे." घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडीलानं लिहिलेलं पत्र. पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलनं लिहिलेल्या. पण त्या अक्षरांना गंध असायचा, मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा, भाजीचा, चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध. हजारो पत्र्याचे डबे रोज एसटीने अशी आईबापाची खुशा...

◾बोधकथा :- सत्कारणी दान

एका गावात शिमक नावाचा एक धनवान माणूस राहत असे. फार विचारपूर्वक तो आपला पैसा खर्च करत असे. त्याने कधीही पैशाचा दुरूपयोग केला नाही. त्यामुळेच त्याला लोक 'कंजुष' म्हणत असत. लोक काय म्हणतील याचा त्याने कधीच विचार न करता आपला पैसा जोडून ठेवला होता.          एकदा त्याला खूप ताप आला. त्याच्या मुलांनी व नातवांनी त्याच्यावर उपचार करण्याचे सुचविले असता शिमक म्हणाला,'' औषधांनी केवळ तापाचा प्रभाव कमी होईल पण रोग समूळ नष्ट होणार नाही. निसर्गनियमानुसार ताप आपोआप कमी होऊन जाईल व मी बरा होईन''           शिमकच्या या गोष्टीचीही लोकांनी कंजुषपणातच गणना केली. शिमकने सर्वाचे म्हणणे ऐकले पण तो आपल्या मनाला येईल तेच योग्य याप्रमाणे वागत राहिला. त्याच्या नगरातील एक विद्वान आचार्य महिधरांनी वेदांवर काही ग्रंथ लिहीलेले शिमकच्या कानी आले. पण आचार्यांचयाकडे ते ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी पुरेसे धन उपलब्ध नव्हते. शिमकला ही माहिती मिळताक्षणी तो आचार्यांकडे गेला व म्‍हणाला, ''आचार्य, ज्ञान हे प्रवाही असावे. ज्ञानाचा प्रभाव हा समाजकारणासाठी झाला पाहिजे. ज्ञान वाटूनच ...

◾विशेष लेख :- व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

✨✨व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?✨✨ प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. बहुतेकवेळा ज्या विशेषतांमुळे आपले नुकसान होते त्यांच्या प्रती आपण जागृत असतो, संवेदनशील असतो. मग त्यांच्यामुळे आपल्यात न्यूनगंड येतो. पण आपण हे जाणतो कि येथे प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे, बस गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. इथेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रिया मदत करणे सुरु करतात. व्यक्तिमत्व विकासामुळे आळस आणि, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागने शिकतो, आनंदी राहणे शिकतो आणि हे सर्व अधिक उत्साहाने आणि चैतन्याने करतो. व्यक्तिमत्व विकासासाठी  उपाय |  Personality Development Tips ✨प्रोटॉन सारखे सकारात...

◾बोधकथा :- संस्कार...

अनेक वर्षांपूर्वी बकुमार नावाचा कुख्यात दरोडेखार होऊन गेला. सिंधुराज राजाच्या राज्यात त्याने लोकांचे जगणे मुश्किल करून टाकले होते. तो श्रीमंतांना तर लुटत असेच, परंतु गरिबांनाही सोडत नसे. गोरगरीब शेतकरी, कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून कमावलेले चार पैसे हडप करण्यास तो जराही संकोच बाळगत नसे. लोक त्याला हात जोडून विनवण्या करत असतं. परंतु त्याला तो मुळीच भीक घालंत नसे. अत्यंत निर्दयीपणे त्याचा लूटमारीचा धंदा सुरूच होता व त्याचे क्रौर्य दिवसेंदिवस वाढत होते. हजारो निरपराध लोकांच्या त्याने हत्या केल्या. जो कुणी त्याला विरोध करील, त्याला क्षमा करणे तर दूरच, त्यांना तो जिवंत सोडत नसे. सिंधुराज राजासमोर नागरिकांनी एकत्रितरीत्या बकुमारविरोधात तक्रार केली. त्यानंतर राजाने सगळी सेना त्या दरोडेखोराच्या मागावर सोडली. बकुमार अनेक महिने सैन्याला चकवा देऊन धुमाकूळ घालतच राहिला. परंतु त्याला पकडण्यात सैनिकांना एके दिवशी यश आलेच. त्याला राजासमोर हजर करण्यात आले. राजाने त्याला ताबडतोब फासावर लटकवण्याची आज्ञा दिली. बकुमारला झालेली शिक्षा ऐकून त्याचे अनेक नातेवाईकही त्याला येऊन भेटायला आले. त्याची आईदेखील त्य...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण