पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक होतं गाव. "महाराष्ट्र" त्याचं नाव....

इमेज
मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोचवा एक होतं गाव.  "महाराष्ट्र" त्याचं नाव.  गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते.  "मराठी" भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं  नांदत होते.  त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं.  वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.  आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग.  "मुंबई" त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव...!"  या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. "अतिथी"  जास्त आणि "यजमान" कमी झाले. मुंबई  कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्न ?मोठा गहन होता,पण माण...

नवीन विश्वाच्या शोधात...Skyflyer

इमेज
पृथ्वी जागोजागी जळत होती , पृथ्वीचे तापमान खूप वाढले आहे आणि  पाण्याची जलाशय मधील पाणी बाष्प होऊन उडून जाता आहे त्यामुळे हळूहळू पृथ्वीवरील पाणी संपत आहे, पृथ्वीवरील हिमागरे आणि हिम पर्वत वितळत आहेत आणि समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे, त्या मुळे समुद्र कटाची शहरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत आणि असे जर चालत राहिले तर हळूहळू सर्व पृथ्वी पाण्यात बुडून जाईल... पिटर हे सर्व आपल्या स्पेस स्टेशन मधून विश्वाचा हळूहळू होणारा र्हास पाहत असतो फोन वाजतो आणि त्याचे लक्ष तिकडे जातं . त्याच्या सिइओ चा आवाज तिकडून येतो  सर सर्व लिडर आली आहेत ती अवनी वर आपली वाट पाहतात.. ( पृथ्वी जवळील दुसरं मोठं स्पेस स्टेशन जिथं emergency साठी बनवलेलं स्टेशन पृथ्वीवर जलद मदत पाठविण्याच्या उद्देशाने पीटरच्या दुरदृष्टी ने बनवलं होतं

कविता : स्पेशल भेळ | संतराम नाना पाटील | आयुष्य

इमेज
दुनिया आहे गोल  खर्याला नाही मोल  भावा खोटं सारं  बोल  पण जरा रेटूनच बोल ...  खोट्यासंग खरं जळत  वाळक्या संग ओल जळत  खरं फासावर लटकताच  खोटं खोटं कळकळत .... सत्य राही उपाशी  असत्य खातो तुपाशी  ही आहे दुनियादारी  जाईल तिथे उधारी .... म्हणे दुनिया आहे गोल  असत्याचे वाढले मोल  सगळे विषय आहेत खोल  माणूस झाला माती मोल .... मग बोलण्याच्या बढाया  आपपसात होती लढाया  मिळकत होतेय कमी कमी  कर्जे लागलीत वाढाया ....    ...... म्हणून ...... दुनियादारी नुसता खेळ  खर्या खोट्याचा नाही मेळ  बरी नाही कुणाचीच वेळ  जगणं झालय स्पेशल भेळ.... रचना  संतराम नाना पाटील मो.नं. 9096769554

एलियन आणि मानव युद्ध...

इमेज
वेळ होती रात्री च्या ९:३० ची अर्जुन झोपेतून उठला नाष्टा केला आपला पिसी चालू करून परत थोडी प्लॅन वर नजर फिरवली आणि आपल्या गॅरेजकडे निघाला. गॅरेज मधून त्याने आपल्या फ्लाईंग object ला चेक केले आणि ती चालू करून आपला विशेष ड्रेस घालून आपली सर्व शस्त्र घेऊन तो तिच्या वर आरुढ झाला आणि सोबत आपली बॅग पण घेतली आणि तो निघाला . तो कुठे जाते आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. त्याच्या ठिकाणापासून शहर दोनशे किमीच्या अंतरावर होते अर्जुनच्या स्मार्ट यानामध्ये खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे हे यान ताशी 400 किमीच्या साधारण वेग व जास्तीत जास्त ताशी सातशे किमीच्या वेगाने धावू शकते. अर्जुन चे यान मुंबई च्या जवळ समुद्र किनार्यापाशी असलेल्या एका बिल्डिंग च्या दूर माडाच्या झाडामागे थांबते, अर्जुन यानाला एका ठिकाणी स्थिर करतो आणि आपल्या बॅगेतून आपले स्मार्ट ड्रोन काढतो.ते ड्रोन अर्जुन सर्व बिल्डिंग च्या चौफेर फिरवतो त्यावेळेस घड्याळामधे १२:३४ झाले होते . बंगल्या मध्ये एक कोणीतरी जागे होते व बंगल्याच्या गेटवर २ गार्ड  बोलत खुर्चीवर बसली होती. बंगला तसा खूप मोठा पसरलेला होता . कारणही तसंच होतं कारण तो महाराष्ट्...

भीम शिळा, केदारनाथ धाम, उत्तराखंड

इमेज
भीम शिळा, केदारनाथ धाम, उत्तराखंड. मला इथेच कोणीतरी या भीम शिळेचा फोटो असेल तर दाखवता का असं विचारलं होतं. त्यांनी केदारनाथला २०१३ च्या महाप्रलयापूर्वी भेट दिली होती, त्यामुळे त्या घटनेत ते मंदिर वाचवणाऱ्या शिळेत त्यांना विशेष रस होता. त्यामुळे म्हटलं, या शिळेवर एक लेख लिहुया...  २०१३ च्या त्या भयंकर प्रलयाच्या वेळी या शिळेमुळे हे मंदिर सुरक्षित राहिलं आणि या घटनेने देव न मानणारेही बुचकळ्यात पडले. काही ना काहीतरी तिकडे नक्कीच घडून गेले आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दैवी शक्तीचा चमत्कार, यावर या लोकांचा विश्वास नसतो पण जेव्हा मुद्दा या शिळेचा निघतो तेव्हा या लोकांकडे विरोधाला मुद्दा नसतो.  १६ जून २०१३ ला काय घडलं हे मी वेगळं लिहिण्याची गरज नाही. केदारनाथ मंदिर सगळ्या प्रकारच्या अतिक्रमणाने, व्यावसायिकीकरणाने वेढलं गेलं होतं आणि आता बघा, मंदिर मोकळा श्वास घेत आहे.  सगळं काही वाहून गेलं पण केदारनाथ मंदिर मात्र जसं होतं तसंच राहिलं. कारण, ही भीम शिळा. या मंदिराला वाचवणारी शिळा म्हणून आज भाविक तिची पूजा करतात.  त्यावेळी नक्की काय घडलं, याबद्दल त्यावेळी तिथे उपस्थित असणार्‍...

मी मोठा झालो....

इमेज
मी मोठा झालो..... संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला.. "गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय! "थांब जरा," मी म्हणालो. आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं, "या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही... जी मुलं शेतात काम करतात, गुरं सांभाळायला जातात, त्यांनी आपल्या पालकांना सांगायचं, 'या वर्षी आम्हाला काम सांगायचं नाही, आम्ही फक्त अभ्यास करणार,' दहावीचा कोणताही विद्यार्थी आम्हाला इकडे-तिकडे भटकताना दिसला, तर त्याचं काही खरं नाही, कळलं! "हो" सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडले. भटकणाऱ्या मुलांचं सर काय करणार, हे न सांगितल्यान जरा जास्त काळजी वाटत होती. सरांचं सुद्धा बरोबर होतं, बरीच वर्ष गावात फक्त सातवी पर्यंत शाळा. सातवी नंतर बारा किलोमीटर दूर असलेल्या गावात जावं लागायचं, त्यामुळे सातवी नंतर बऱ्याच मुलांची...

कविता : हो तर म्हण नाही तरी म्हण | पद्माकर बसवंते | Marathi Poem...

इमेज
रूप पाहून तुझे झालो मी बेभान  तुझ्या आठवणीत आहे मी परेशान!!  डोळे तुझे मर्गनयनी ओठांवर गुलाबां सारखी वाणी.  केश तुझे वाऱ्यावर म्हणतात ग गाणी!!  एक दिवस जात नाही तुझ्या आठवणी वाचूनी बघत असतात पोर तुझ्या कडे जीव जातो खचूनी !!  रात्रन दिवस तुझ्याच जप करतो  तुला बोलताना मी घाबरतो!! तू हो पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही  दुई धार जगणाऱ्याचं काहीच खरं नाही!!  आता मात्र एकच छंद लागला  तुझ्या आठवणीत जीव येडा पिसा झाला  पदमाकर च गाऱ्हाणं येऊदे तुझ्या कानी!!  आणि रंगू दे आपल्या प्रेमाची कहाणी!!!! - Padmakar Baswante ____________________________________

'स्व'चा शोध...

👇👇👇🙏 अतिशय वाचनीय लेख 👇👇👇 'स्व'चा शोध.. 👆👆👆 सत्य सांगण्याची आणि सत्य स्वीकारण्याची शक्ती असेल तरच सत्य बोलावे. अन्यथा हे जग बेईमान लोकांची जत्रा आहे! पृथ्वीतलावरील करोडो लोकांनी फक्त २४ तासांसाठी ठरविले की, मला जे कुणाबद्दलही काहीही जे वाटते ते त्याला जाऊन सांगावे, तर या जगात मुश्किलीने एखाद्या माणसाची दोस्ती टिकेल..  सत्य फक्त कडवट नसते तर ते दाहक आणि धोकादायक सुद्धा असते. सत्य ऐकण्याच्या मनस्थितीत कोण आहे?आणि सत्य सांगण्याचा धोका तरी कोण स्वीकारेल? म्हणून लोक तोंडावर गोड गोड बोलतात. तुमची स्तुती करतात आणि पाठ फिरताच बरोबर उलट बोलतात. तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही तुमच्या इष्टमित्र, नातेवाईक किंवा अगदी रक्ताची माणसे यांच्याबाबत तुम्हाला त्यांच्या बद्दल मनापासून जे वाटते ते बोलून पहा.. तुमची असत्यावर उभी असलेली घरे कोसळतील, मैत्री, प्रेम वगैरेचे पत्यांचे बंगले धडधडा कोसळतील. तुम्ही एकटे पडाल. या एकटेपणाच्या भयाने आपल्याला  ग्रासले असल्याने आपण आपले सगळे मानवी सबंध खोटेपणाच्या पायावर टिकवले आहेत. म्हणून सत्याचा मार्ग काटेरी आहे हे वाक्य तंतोतंत खरे आहे.  दुसऱ्या...

ऐशी कैशी R7 ची ड्युटी...

इमेज

दिर्घ अनुभव आणि विचाराचे सार म्हणजेच पुस्तक...

काही पुस्तके हे अनुभव च असतात... मला एकदा कोणतरी विचारले,  की जीवनात अनुभव महत्वाचे की ज्ञान ,तर मी त्यास सांगितले नक्की अनुभवच श्रेष्ठ असणार कारण मनुष्य स्वतःच्या तर्कवितर्काने जे शिकतो ते नुसतं माहिती पेक्षा जास्त च महत्वाचे ना. यासाठी एक उदाहरण समजा, तुम्ही एका पुस्तकात वाचले चहा कसा करायचा ? त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सर्व काही सांगितले की चहा करण्यासाठी तुम्हाला साखर टाकावी लागेल दूध टाकावे लागेल चहापत्ती टाकावी लागेल आणि चहा गरम करण्यासाठी जाळावर ठेवावा लागेल आणि तोपर्यंत वाट पहावी लागेल हे झाले पुस्तकी ज्ञान आता पहा अनुभवाचे ज्ञान, चहा करण्यासाठी तुम्हाला योग्य गोष्टींची माहिती आवश्यक असेल नंतर एक कप चहा साठी किती साखर टाकावी लागेल हे पण तुम्हाला कळेल चहा किती गरम करावा हे पण कळेल वरील दोन्ही उदाहरणातील आता फरक काढले तर तुम्हाला कळेल की पहिल्या उदाहरणात साखर कमी जास्त होऊ शकेल किंवा चहा पावडर जास्त होऊ शकेल किंवा चहा शिजला जाणारच नाही किंवा अपेक्षा पेक्षा जास्त चांगला बनेल परंतु दुसऱ्या उदाहरणात 99 ते 100 टक्के चहा चांगलाच बनेल कारण येथे सोबत आहे अनुभव...! आता तुम्हाल...

ते निघून गेल्या आणि मी चक्करावून गेलो.

इमेज
काल संध्याकाळी म्हणजेच 7:30च्या सुमारास एक इनोव्हा गाडी लिफ्ट लॉबीच्या समोर येऊन उभा टाकली प्रथमता त्या गाडीला नजर अंदाज केला. माझ्या पॉईंट वर तोमर नावाचा मध्यप्रदेश येथील गार्डला बसवलं आणि मी ठेथुन मोबाईल चार्जिंग साठी निघालो. तिकडून आल्यावर त्या गार्डने मला सांगितलं कि " भाई ओ जो सफेद बडावाला गाडी लगा हैं, ओ रॉंग पार्किंग मै लगा हैं " तरी मी त्या गाडी कडे नजर अंदाज केला. 10 ते 15 मिनटं झाल्यावर 60 वर्षाच्या आसपास एक बाई बोली "आपको किसीने कुछ बोलतो नही." मी म्हणालो "किस लिये " त्या म्हणाल्या "ओ जो सफेद वाला गाडी हैं ना उसके लिये "मी त्यांच्या बोलण्यावरून ओळखून घेतलं. कि, ह्या बाई महाराष्ट्रीयन आहेत. " मी बोलो अँटी कोणी काही बोल नाही. आमचं बोलण चालूच होत. तेवढ्यात ती गाडी निघाली. आणि माझ्या नजरे समोर आलं ते तिची नंबर प्लेट त्यावंच MH -26 पाहून मी म्हणालो. "अँटी ही तर गाडी आमच्या येथील आहे. त्यावर त्यांनी बोल्या " हो ' माझ्या मुलगा कलेक्टर विपीन इटनकरआहे. नांदेडला " हे ऐकून माझ्या काळजाचे ठोके वाढले. आणि भुया वर झाल्या आणि...

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – कालबाह्यतेचा सापळा!..

इमेज
--------------------------------------------------------- थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – कालबाह्यतेचा सापळा!.. ---------------------------------------------------------- जानेवारी १९२५! स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने काही खास लोकांसाठी एक गुप्त मिटींग आयोजित केली होती. विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीच्या सर्व उत्पादकांना त्या मिटींगमध्ये बोलावले गेले होते. बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती. सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण वर्षागणिक सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्यमान असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते. जनता बल्बवर खुश होती पण कोणालातरी बल्बचे इतके दिर्घजीवी असणे खटकत होते. ते कोण होते? साक्षात बल्ब उत्पादक! कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रील, ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्...

विमानात जेवण ...

इमेज
विमानात जेवण विमानात मी माझ्या सीटवर बसलो.  दिल्लीला जायचे अंतर अडीच तासांचे आहे.  पुस्तक वाचणे, तासभर झोप घेणे ..  या गोष्टी मी माझ्या प्रवासात  बहूधा करतो. टेक ऑफच्या अगदी आधी १० सैनिक आले आणि माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसले. सर्व जागा भरल्या.  मी माझ्या शेजारी बसलेल्या सैनिकाशी संवाद साधला … "कुठे जात आहात ?" "आग्रा, सर ! दोन आठवडे तिथे प्रशिक्षण घेणार आहोत. त्यानंतर, आम्हाला ऑपरेशनसाठी पाठवले जाईल," तो म्हणाला. तासभर गेला. घोषणा ऐकू आली.  ज्यांना पाहिजे ते पैसे भरून जेवणाची पॅकेट्स मागवू शकतात. दुपारच्या जेवणाचा ताप संपला असे मला वाटले, मी पर्स घेऊन माझे दुपारचे जेवण बुक करण्याचा विचार करत असताना एका सैनिकाचे बोलणे ऐकू आले. "आपणही जेवण मागवूया का ?"  एका  सैनिकाने विचारले,  "नाही ! त्यांचे जेवण महागडे आहे. आपला प्रवास पुर्ण झाला की विमानातून उतरून नेहमीच्या हॉटेलमध्ये जेवू या !" "ठीक आहे !" इतर सैनिकांनी लगेच मान्य केले. मी फ्लाइट अटेंडंटकडे गेलो व तिला सर्व सैनिकांच्या जेवणाचे पैसे दिले अन् म्हटले "सगळ्यांना जेवायला द्या....

#अर्जुन vs शिवबा

इमेज
असाच एक गाव नावाची कथा वाचली असेल तर या कथेचा संदर्भ लागेल #अर्जुन vs शिवबा जगात अशी कितीतरी लोक असतात.जी चेहऱ्यावरुन शांत दिसतात.पण त्यांचा शांतपणा वरवरचा असतो.आतून मात्र ते एखाद्या ज्वालामुखी सारखे धगधगत असतात.आपल्या  आतला ज्वालामुखी ते मोठ्या प्रयासाने थोपवायचा प्रयत्न करत असतात.कधीकधी आतला ज्वालामुखी रागरुपी लाव्हारसाने बाहेर पडतो.मग त्या व्यक्तीचं कधीही न पाहिलेल रुप सर्वाच्या नजरेस पडत. समोर पसरलेल हे सदाहरित जंगल बाहेरुन असंच शांत दिसत.पण आत पक्ष्यांचा किलबीलाट,जनावरांचा आवाज,पानांची सळसळ कित्येक प्रकारचे आवाज असतात.हे आवाज जंगलात गेल्यावर ऐकू येतात...दुर्गम भागात पसरलेल ते जंगल अगदी घनदाट होतं.जंगल कित्येक एकराच्या परिसरात पसरल होते.जंगलात अनेक प्रकारची झाडं होती.काही उंच सरळसोट वाढून आभाळाला टेकलेली.तर काही वड,पिंपळासारखी विस्तीर्ण पसरलेली.जंगलात काही ठिकाणी सुर्यांचा प्रकाश पोहचत नव्हता.झाडाच्या दाट फांद्यामुळे तिथे दिवसापण अंधार असायचा.डोंगरातून उगम पावलेली एक नदी जंगलातून पुढे जात होती‌.नदीच्या कडेला गुडघाभर गवत माजल होत.गवतात त्याच रंगाचे सर्प होते,रंगीबेरंगी ठिपक्यां...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

फक्त व्यक्त व्हायला शिका...