#अर्जुन vs शिवबा
असाच एक गाव नावाची कथा वाचली असेल तर या कथेचा संदर्भ लागेल
#अर्जुन vs शिवबा
जगात अशी कितीतरी लोक असतात.जी चेहऱ्यावरुन शांत दिसतात.पण त्यांचा शांतपणा वरवरचा असतो.आतून मात्र ते एखाद्या ज्वालामुखी सारखे धगधगत असतात.आपल्या आतला ज्वालामुखी ते मोठ्या प्रयासाने थोपवायचा प्रयत्न करत असतात.कधीकधी आतला ज्वालामुखी रागरुपी लाव्हारसाने बाहेर पडतो.मग त्या व्यक्तीचं कधीही न पाहिलेल रुप सर्वाच्या नजरेस पडत.
समोर पसरलेल हे सदाहरित जंगल बाहेरुन असंच शांत दिसत.पण आत पक्ष्यांचा किलबीलाट,जनावरांचा आवाज,पानांची सळसळ कित्येक प्रकारचे आवाज असतात.हे आवाज जंगलात गेल्यावर ऐकू येतात...दुर्गम भागात पसरलेल ते जंगल अगदी घनदाट होतं.जंगल कित्येक एकराच्या परिसरात पसरल होते.जंगलात अनेक प्रकारची झाडं होती.काही उंच सरळसोट वाढून आभाळाला टेकलेली.तर काही वड,पिंपळासारखी विस्तीर्ण पसरलेली.जंगलात काही ठिकाणी सुर्यांचा प्रकाश पोहचत नव्हता.झाडाच्या दाट फांद्यामुळे तिथे दिवसापण अंधार असायचा.डोंगरातून उगम पावलेली एक नदी जंगलातून पुढे जात होती.नदीच्या कडेला गुडघाभर गवत माजल होत.गवतात त्याच रंगाचे सर्प होते,रंगीबेरंगी ठिपक्यांचे अजगर होते.नदीत ईतर जलचरांसोबत मोठमोठ्या मगरी होत्या.गवत खाणारी जनावर या मगरींना घाबरुन असायची.पाणी पिताना सावधपणे प्याव लागायच.कारण कुठून कसा हल्ला होईल सांगता येत नव्हतं.एकवेळ वाघ सिंह परवडला पण त्या मजबूत जबड्याच्या मगरी नको!!जमीनीवरचे मांसभक्षी प्राणी एका झटक्यात आपली शिकार संपवायचे.त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्राण्याला मरताना कमी त्रास व्हायचा.पण हे नदीतले जीव खोल पाण्यात बुडवून मारायचे...श्वास कोंडून जीव घ्यायचे.
या जंगलात माणसांच येण जाण असायचं.काही धाडसी लोक जंगल सफारीवर यायची.जंगलात तंबू ठोकून दोन तीन दिवस राहायची.दगडावर दगड घासून आग पेटवायची.छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करुन आगीवर भाजून खायची.जंगलाच्या बाहेर लहान लहान गावं होती.गावातील लोक आपली जनावरं घेऊन जंगलात घुसायची.त्यांना जास्त आत जायची परवानगी नव्हती.कारण जंगलात दुर्मिळ,वनस्पती होत्या.त्यामुळे शासनाने गुरे चारण्यासाठी ठाराविक जागा दिली होती.तरीही गावकरी आपली जनावरे जंगलात अगदी आत घालायचे.एखाद्या वेळी जनावर जंगलात भरकटायचे.शेवटी एखाद्या जंगली जनावराची सोपी शिकार बनायचे.गावातील लहान मुल मधाची पोळी शोधत जंगलात फिरायची.बोर,करवंद गोळा करायची.जमीन उकरुन मोठमोठे कंद बाहेर काढायची.गेल्या काही दिवसापासून गावकरी जंगलात जायला घाबरत होते.जंगलात एक नरभक्षी लांडगा आला होता.जंगलात गेलेल्या गावकऱ्यांवर तो नरभक्षी लांडगा हल्ला करत होता.लांडग्याच्या हल्ल्यात एक नाही दोन नाही तब्बल दहा गावकऱ्यांचा जीव गेला होता.जंगलात त्यांची छिन्नविच्छिन्न झालेली प्रेत सापडली होती.त्यांचा एकही अवयव जागेवर नव्हता.या घटनेने गावातील बाकिची लोक घाबरली होती.लहान मुलांनी तर केव्हाच जंगलात जाणे सोडले होते.शासनाने आखून दिलेली हद्द गावकरी ओलांडत नव्हते.पण हद्दीच्या बाहेरही ते सुरक्षित नव्हते.लांडग्याला कोणतीही हद्द नव्हती.तो गावकऱ्यांच्या हद्दीत घुसून त्यांचा जीव घेऊ लागला.लांडग्याच्या त्रासामुळे गेले कित्येक दिवस गावकरी जंगलात गेले नव्हते.एका रात्री जंगलाबाहेरच्या लहान गावात लांडगा घुसला.लांडगा गावात घुसताच कुत्र्यांनी भुंकून गाव जागा केला.घराबाहेर झोपलेली लोक सावध झाली.कोणाला काही कळायच्या आत लांडग्याने एका माणसावर हल्ला केला.त्याची मान जबड्यात पकडून वेगाने जंगलात पळून गेला.लांडग्यामागे जंगलात जायची कोणाची हिम्मत झाली नाही.त्याच्यामागे जाऊन काही उपयोग नव्हता.कारण तो माणूस आता जीवंत राहिला नव्हता.बाहेर झोपलेल्या माणसांनी लांडग्यांला बघितले होते.एवढा मोठा लांडगा त्यांनी उभ्या आयुष्यात कधी बघितला नव्हता.ते काळ धूड खूप भयानक होत.लालभडक रक्तवर्णी डोळे,मजबूत जबडा त्यातून लोंबणारी मोठी जीभ,टोकदार पांढरे दात...लांडगा धिप्पाड होता.अंगावरच्या कातडीवर काळे केस होते.एकदोन ठिकाणी जखमा होत्या.शेपटी झुपकेदार होती.ज्या लोकांनी लांडगा पाहिला होता ती लोक त्यांच वर्णन अगदी रंगवून सांगत होती.लांडग्याला मानवी रक्ताची चटक लागली होती...
गावकऱ्यांनी जंगलात जाणे सोडले तरी तो नरभक्षी लांडगा उपाशी राहणार नव्हता.सगळ माहिती असूनही शहरातील अतिउत्साही लोक जंगलात येतच होते.दिवसभर जंगलात भटकत होते.ससे,घोरपडीची शिकार करुन आगीत भाजून खात होते.वेगवेगळ्या पध्दतीने मासे पकडत होते.सगळ करुन दमल्यावर रात्री तंबू ठोकून त्यात झोपी जात होते.जंगलात येणारी लोक बऱ्याचदा समुहाने यायची.तर काही लोक एकटी असायची.एकटा माणूस सहज लांडग्याची शिकार बनायचा.हा लांडगा समुहाने येणाऱ्या लोकांनाही सोडत नव्हता.जंगलात आलेला दहा जणांच्या समुहावर लांडग्याने अचानक हल्ला केला.रात्रीची वेळ होती सगळेच बेसावध होते.अचानक झालेल्या हल्ल्याने ती लोक घाबरली,बिथरली...लोकांजवळ स्वरक्षणासाठी हत्यार होती.एकाने आपल्या बुटात लपवलेला चाकू लांडग्यांच्या मानेखाली घुसवला.लांडग्याच्या मानेतून लाल गरम रक्ताची चिळकांडी उडाली.लांडगा कळवळला या अनपेक्षित हल्ल्याने अधिकच चवताळला.पिसाळलेल्या लांडग्याने आपल्या हल्ल्यात दोन जणांचा जीव घेतला.लांडग्याच उग्र रुप पाहून बाकिची लोक जंगलात पळाली.जीव वाचवण्याच्या नादात ती एकमेकांपासून वेगळी झाली.घनदाट जंगलात वाट फुटेल तिकडे पळू लागली.यातील एकही वाचला नाही.त्याच रात्री लांडग्याने सर्वांना शोधून संपवले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना जंगलात कित्येक छिन्नविच्छिन्न झालेली प्रेत सापडली.त्यांची ओळख पटने कठिण होते.गावातील लोक हल्ला लांडग्याने केल्याचा सांगत होती.सापडलेल्या प्रेताची अवस्था बघून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसे वाटत होते...हा लांडगा वेगळा होता.त्याची नख आणि दात ईतर लांडग्यांपेक्षा तीक्ष्ण होते.तातडीने पुढची पावले उचलावी लागणार होती.नरभक्षी लांडगा पकडण्यासाठी त्यांनी एक योजना आखली.त्यांनी काही दिवस जंगलात न जाण्याचे आवाहन सगळ्यांना केले.गावकऱ्यांनी जंगलात जाणे बंद केले होते.पण शहरातील लोक काही ऐकत नव्हती.
जंगलात भरकटलेल्या लोकांचा वनविभागाचे कर्मचारी शोध घेऊ लागले.जंगलात ठिकठिकाणी लोखंडी पिंजरे बसवले.पिंजऱ्यात मांस आणि जिवंत बोकडाला बांधून ठेवले.दोन दिवस झाले तरी लांडगा पिंजऱ्यात अडकला नाही.एका सकाळी नदी काठावर वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांची प्रेतं सापडली...त्यांच्या शरीरावर खोल नखांचे व्रण उमटले होते.लांडग्याने त्यांची अवस्था ईतरांसारखी केली होती.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांत दहशतीच वातावरण पसरलं.वेगवेगळी कारण सांगून सगळे सुट्टीवर जाऊ लागले.शिल्लक राहिलेले कर्मचारी जंगलात जायला तयार नव्हते.वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काय करावे काही समजत नव्हते...
अशातच जंगलाबाहेर एक माणूस बेशुद्धावस्थेत सापडला.तो आपल्या सहकाऱ्यांसह जंगलात गेला होता.आनंद नावाचा तो माणूस जखमी होता.या जखमा झाडांच्या फांद्या आणि काटेरी वनस्पतींमुळे झाल्या होत्या.दोन दिवसापासून तो जंगलातून बाहेर जाण्याचा मार्ग शोधत होता.दोन दिवस उपाशी असल्याने जंगलाबाहेर येताच तो बेशुध्द झाला.त्याला तातडीने तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.दोन दिवसाच्या उपचारानंतर आनंद शुध्दीवर आला.त्याने सांगितलेल्या गोष्टीचा थोडा भाग विश्वास ठेवण्यासारखा होता.त्याने सांगितलेल्या एका घटनेवर कोणाचाही विश्वास बसला नाही.सर्वांनी त्याच बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं.आनंदच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं जो तो म्हणू लागला...
दोन दिवसांपूर्वी आनंद आपल्या काही मित्रांसोबत जंगलात आला होता.जंगलातील नरभक्षी लांडग्याबद्दल ते ऐकून होते. हे सगळे मिळून सात जण होते.सात जण एका लांडग्यावर भारी होते.त्यांनी आपल्यासोबत हत्यार घेतली होती.झाडाच्या मोठ्या काठ्यांना चाकू बांधून भाला बनवला होता.आनंद आणि त्यांचे सहकारी अतिउत्साही गटात येत होते.पहिल्या दिवशी सगळे दिवसभर जंगलात भटकले...रात्री शेकोटी पेटवून नदीच्या काठावर बसले.आनंदने नदीतून पकडलेले मासे केळीच्या पानात गुंडाळून शेकोटीत भाजले होते.भाजलेले मासे जो तो आपल्या आवडीनुसार मीठ मसाला टाकून खात होता.त्यांनी थोडी नशा केली होती.हे सगळे बेसावध होते.दिवसभराच्या पायपीटीमुळे त्यांचे डोळे जड होऊ लागले.यातील काही तंबूत तर काही बाहेरच उघड्यावर झोपी गेले.मध्यरात्री सगळ्यांना जाग आली,दूर कुठूनतरी लांडग्यांचा आवाज येत होता.तो आवाज वेगाने त्यांच्या जवळ येत होता.आपले भाले हातात घेऊन सगळे एकाजागी जमा झाले.दाट झाडीतून वीजेच्या वेगाने पळत एक भलामोठा लांडगा त्यांच्यासमोर आला.लांडग्याला बघताच सगळ्यांच अवसान गळाल.एवढा मोठा लांडगा त्यांनी कधीच बघितला नव्हता.कोणाला काही कळायच्या आत ते काळ धूड त्यांच्यावर कोसळलं.एकजण त्याच्या टप्प्यात होता.लांडग्याच्या पंजाने त्याच शीर धडावेगळ झालं.त्या लांडग्याची नख खूप टोकदार होती.रक्ताची चिळकांडी लांडग्यांला भिजवून गेली.त्याने क्षणात दोघा तिघांना लोळवल.आपल्या मजबूत जबड्याने लांडगा त्यांचे लचके तोडून खाऊ लागला.एवढ्या वेळात बाकिचे वेगवेगळ्या वाटांनी जंगलात पळाले.एकजण चुकून नदीत पडला.क्षणात नदीतल्या मगरीने त्याचा घास घेतला.पाण्यावर लाल रक्ताचा तवंग पसरला.जंगलात पळालेली लोक जीव वाचवण्यासाठी लपून बसली.कोणी झुडपात तर कोणी झाडावर...लांडग्यांचे घाणेंद्रिय खूप तीक्ष्ण असते.वासावरुन तो आपली शिकार कुठे आहे ओळखतो.शिकार मैलावर जरी असली तरी त्याचा माग काढतो...आनंदला हे माहित होते.त्याने आपल्या कमरेला खोचलेल्या हत्याराने जमीनीत पुरुषभर उंचीचा खड्डा खणला.जमीन भुसभुशीत असल्याने त्याला जास्त वेळ लागला नाही.चेहऱ्याला चिखल फासून त्याने जमीनीत स्वतःला गळ्यापर्यंत गाडून घेतले.सकाळ व्हायची वाट बघत तो तिथेच थांबला...
ती रात्र काही चांगली गेली नाही.रात्रभर जंगलात लांडग्याच्या गुरगुरण्याचा आवाज घुमत होता.मधेच ओळखीच्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू यायच्या.लांडगा आपली शिकार शोधून संपवत होता.मध्यरात्र उलटून गेली होती.लांडग्याच्या गुरगुरण्याचा आवाज अगदी जवळून येत होता.लांडगा त्याच्या आसपास कुठेतरी होता.आनंद अगदी घाबरुन गेला.ढगाआड गेलेली चंद्राची कोर बाहेर आली.हळूहळू प्रकाशमान चंद्राचा गोळा आकाशात दिसू लागला.सगळीकडे त्याचा प्रकाश पसरला.अंधारात असलेल्या वस्तू नजरेस पडू लागल्या.लांडग्याचा आवाज अधिकच वाढला.तो गगनभेदी आवाज कानाचे पडदे फाडू लागला.आनंदला पावलांचा आवाज आला.तो अगदी त्याच्या मागून येत होता.आनंद मान फिरवून मागे पाहू शकत नव्हता.कारण त्याने स्वतःला जमीनीत गाडले होते.त्याने आपला श्वास रोखून धरला.त्याच्या समोरुन दोन केसाळ पाय पालापाचोळा तुडवत पुढे गेले.ती एक उंच आणि धिप्पाड मानवी आकृती होती.तिच्या अंगावर मोठमोठे काळे केस होते.एक शेपूट होते...हाताची नखं लांब आणि टोकदार होती.ती आकृती लांडग्याप्रमाने गुरगुरत होती.चंद्र ढगाआड गेला तशी ती आकृती कोसळली...आनंदने डोळे फाडून पाहिले आकृतीचे रुपांतर लांडग्यात झाले होते.या लांडग्यानेच त्यांच्या समुहावर हल्ला केला होता...हा लांडगा सामान्य नव्हता.तो एक नरलांडगा होता...त्याने अशा लांडग्याबद्दल पुस्तकात वाचले होते.दिवसा रुप बदलून फिरणारे हे लांडगे चंद्राच्या प्रकाशात आपले खरे रुप दाखवतात.खऱ्या रुपात ते जास्त हिंसक बनतात...
आनंदने सांगितलेल्या गोष्टीतला थोडा भाग पटण्यासारखा होत.नरलांडग्याबद्दल जे काही सांगितलं ते कोणालाच पटल नाही.आनंदच्या मित्रांची प्रेत जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी सापडली.एकूण सात जण होते.यातील एक नदीतल्या मगरीची शिकार बनला तर बाकिचे लांडग्याची शिकार बनले.जंगलात चार प्रेत सापडली...मगरीच्या तावडीत सापडलेला व्यक्ती मिळूण पाच...आनंदने ती चार प्रेत ओळखली.यात एक प्रेत कमी होत...त्यांच्यासोबत असलेला सागर नावाचा मुलगा यात नव्हता.वनविभागचे कर्मचारी जंगलात आतपर्यंत जायला तयार नव्हते.त्याच प्रेत दाट जंगलात असण्याची शक्यता होती किंवा तो जिवंत असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती...उपचारानंतर खिन्न मनाने आनंद शहरात निघून गेला.असं काही होईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.तो परत कधीही ईकडे येणार नव्हता.
त्याच रात्री भरधाव वेगाने एक चारचाकी गाडी जंगलबाहेरच्या गावात आली.रात्र जास्त झाली नव्हती.गावात सगळीकडे शांतता होती.घरांचे दरवाजे बंद होते.गाडीचा आवाज ऐकूनही कोणी बाहेर आले नाही.ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीने आपली गाडी देवळासमोर लावली...त्याचे लक्ष देवळाच्या पायरीवर झोपलेल्या एका वृध्द व्यक्तीकडे गेले...गाडीच्या आवाजाने ती व्यक्ती जागी झाली होती...
"कोण पाव्हण म्हणायचं???.."खोकत ती वृध्द व्यक्ती म्हणाली...समोर एक सडपातळ शरीराचा मुलगा उभा होता.तो रंगाने गोरा आणि दिसायला चांगला होता.डोक्यावरचे केस कपाळावर पसरले होते.उंचीच्या मानाने तब्येत कमी होती.
"बाबा!!मी या गावचा नाही.थोड गाडीवर लक्ष ठेवा... "
"बरं बरं काय नाय होत तुझ्या गाडीला..."
"लोकांनी खूपच दहशत खाल्लेली दिसतेय लांडग्याची...तुम्हाला भीती नाही वाटत का??"
"ऑ!!.."एक हात कानाजवळ नेत तो वृध्द म्हणाला..."कसली भीती आन कसलं काय.आता माझं थोडच दिस शिल्लक हायेत.लांडग्याला हाड अन् कातडी शिवाय कायबी मिळायच न्हाय बघ..."
"तरीपण जीवाची भीती सगळ्यांना असते... "
"मला पण हाय बघ!!...पर माझ्या नाय समद्या गावाच्या...गावाचा मसणवाटा बनवण्याअगोदर मला मार म्हणील लांडग्यांला..."
"काय होतं नाही तुमच्या गावाला...तुम्ही झोपा निवांत लांडग्याकडे मी बघतो.तेवढ गाडीवर मात्र लक्ष ठेवा..."जंगलात जात तो मुलगा म्हणाला...
"पर तू कशाला सोताचा जीव धोक्यात घालतोय!!नाव तरी काय म्हणायच तुझ..."वृद्ध व्यक्ती खोकत म्हणाला...
"माझा मित्र जंगलात बेपत्ता झाला आहे.त्याचाच तर शोध घ्यायला आलोय.बर बाबा येतो मी आणि हा माझ नाव अर्जुन आहे... "एवढ बोलून अर्जुन जंगलात गायब झाला...
जंगलात बेपत्ता झालेल्या सागरची आई आणि अर्जुनच्या मावशीची ओळख होती.सागर त्यांचा एकुलता एक मुलगा होता.सागरचा कसलाच शोध लागत नव्हता.आनंद सोडला तर त्याचे सगळे सहकारी लांडग्यांच्या हल्ल्यात मुत्यूमुखी पडले होते.सागरच्या आईच्या मनात सारखे बरेवाईट विचार येत होते.त्या खूप खचल्या होत्या.अर्जुनच्या मावशीला त्यांची अवस्था बघवत नव्हती...तो या जगात आहे की नाही तेच कोणाला माहित नव्हते.मावशींनी अर्जुनला त्याचा तपास लावायला सांगितला...मावशीच काम म्हणल्यावर अर्जुन लगेच तयार झाला...
अर्जुन जंगलात शिरताच सगळीकडे काळोख पसरला.डोळे फाडून पाहिल तरी समोरच काही दिसत नव्हतं.त्याने मोबाईल बाहेर काढला.अगदीच कमी बॅटरी शिल्लक होती.रेंजचा तर काही पत्ताच नव्हता.मोबाईलची बॅटरी खर्च करुन जमणार नव्हते.थोडावेळ एका जागी उभं राहून तो नजर स्थीर होण्याची वाट बघू लागला.काही वेळाने नजर स्थीर झाली.झाडांचे आकार नजरेला दिसू लागले.पायाखालचा अंधार तुडवत तो पुढे निघाला.पुढे गेल्यावर नदीच काळ पाणी दिसू लागलं.पाण्यातून डोक बाहेर काढलेल्या मगरी मात्र त्याला दिसत नव्हत्या.थोडा वेळ तो असाच चालत राहिला.आपण कुठे चाललोय हेच त्याला समजेना.रात्री ईथे येऊन त्याची चूक झाली होती.अंधारात सागरचा शोध घेता येणार नव्हता.तो आता मागे फिरु शकत नव्हता.परत गावात जायचा रस्ता त्याला सापडणार नव्हता.जंगलात भटकून काही फायदा नव्हता.तो एका झाडाखाली झोपायला जागा करु लागला.खालचा पालापाचोळा हटवून तो आडवा झाला पण या ठिकाणी झोप येणे शक्य नव्हते.रातकिड्यांची किरकिर मधेच घुबडाचे चित्कार ऐकून झोपमोड होत होती.कानात हेडफोन अडकवून तो एकाजागी बसला.गाणी ऐकताना पहाटे कधीतरी झोप लागली.सकाळी जाग आली तेव्हा मोबाईलची बॅटरी संपली होती.समोर दोन तरुण उभे होते.त्यांच्यामागे एक मुलगी आणि एक मुलगा उभा होता.सगळ्यांच्या अंगावर जखमा होत्या...मागे उभा असलेला तरुण जास्त जखमी होता.त्याचे कपडे रक्ताने भिजले होते.त्या मुलीच्या डोक्यावर फडके बांधले होते...डोळे चोळत अर्जुन उभा राहीला...
"आपण!!..."समोरच्या तरुणांकडे बघत अर्जुन म्हणाला..
"मी विजय आणि हा राहूल... "एका तरुणाने दोघांची नावं सांगितली...हे दोन्ही तरुण एखाद्या पहिलवानासारखे दिसत होते.राहूलचे डोळे निळे होते त्याचे केस एकसारखे वाऱ्यावर भुरभुरत होते.विजयची तब्येत जास्त होती.दोन्ही खांदे रुंद आणि मजबूत होते.दोघांच्या चेहऱ्यात थोडे साम्य होते.
"तुम्ही दोघे भाऊ तर नाही... "अर्जुनने विचारले...
"तसेच काहीतरी समज..."राहूल हसत म्हणाला.अर्जुनने मागे उभ्या असलेल्या दोघांकडे बघितले...
"मी गीता आणि हा संदेश... "कपाळावर पट्टी बांधलेली मुलगी म्हणाली...
"या जखमा कशा झाल्या.... "अर्जुनने विचारले...
"आम्ही दोघं जंगलात फिरायला आलो होतो.पण रस्ता चुकलो...पुढे आम्हाला ही दोघ भेटली.ही दोघं आपल्या काही मित्रांसोबत जंगलात आली होती.यांचे सगळे मित्र लांडग्यांच्या हल्ल्यात मुत्यूमुखी पडले.हे दोघं आम्हाला जखमी अवस्थेत एका झाडाखाली सापडले.लांडग्याने यांच्यावर सुध्दा हल्ला केला होता.दोघ नशीबाने वाचले...पण तू कोण आणि ईथे कसा... "
"मी अर्जुन एका मित्राला शोधायला आलोय.तो जंगलात कुठेतरी हरवलाय..."यावर ते दोघे तरुण मोठ्याने हसायला लागले...
"अर्जुन तू सुध्दा रस्ता चुकलाय...अगोदर ईथून बाहेर पडायचा विचार कर... "तेवढ्यात जंगलातून वाहणाऱ्या नदीत कोणीतरी उडी मारली.सगळे सावध झाले.पाठोपाठ लपलप आवाज करत पाणी पिण्याचा आवाज आला.अशा पध्दतीने पाणी मांसभक्षी जनावरच पितात.लांडगासुध्दा असाच पाणी पितो...सगळे सावधपणे तिकडे निघाले.विजयने कमरेला खोचलेला चाकू बाहेर काढला...तेवढ्यात त्यांची नजर पाण्यातून बाहेर येणाऱ्या एका मुलावर गेली.अर्जुनने त्याला लगेच ओळखले.तो सागर होता...त्याचा फोटो अर्जुन कडे होता.सागर सुखरुप होता.अंगावर थोड्या जखमा होत्या.अर्जुनने त्याला आवाज दिला.सागर धावत त्यांच्याकडे गेला...गेले दोन दिवस तो जंगलात भटकत होता.अर्जुन खास त्याचा शोध घेण्यासाठी आलाय हे कळताच तो आनंदीत झाला...सागर सोबत खाकी कपडे घातलेला अजून एक जण होता.तो आपल नाव मेजर सांगत होता.तो कोणी मिलेट्रीतील मेजर नव्हता.त्याला स्वतःस मेजर म्हणवून घ्यायला आवडायचे.मेजर लांडग्याच्या शिकारीसाठी जंगलात आला होता.मेजर जरा वयस्कर होता.त्याच्या दाढीमिशा पिकल्या होत्या.वयाच्या मानाने त्याची तब्येत चांगली होती.तो कमरेत जराही वाकला नव्हता.त्याच्याकडे जुन्या पद्धतीची रायफल होती.त्याने कमरेला एक धारदार कोयता अडकवला होता.लांडग्याचा शोध घेत असताना त्याची आणि सागरची भेट झाली.सागर लांडग्यांच्या हल्ल्यातून वाचला होता.मेजर त्याला सुखरुप जंगलाबाहेर सोडणार होता.पण बाहेर जायचा मार्ग त्यालाही सापडत नव्हता.फिरुन फिरुन दोघे एकाच जागी परत होते.असाच अनुभव विजय,राहूल,गीता आणि संदेशला आला होता...
अर्जुनच काम झालं होतं.सागरला घेऊन माघारी फिरण्यास हरकत नव्हती.नरभक्षक लांडग्याचा बंदोबस्त करावा असे त्याला मनातून वाटत होते.बाकी सर्वांना सुखरुप जंगलाबाहेर सोडून तो हे काम करणार होता.सगळे जंगलाबाहेर जायला निघाले.या भागात कोणतीच पायवाट दिसत नव्हती.बाहेर जाण्याचा मार्ग शोधने अवघड होते.त्यात बाकीचे चार जण गेल्या दोन दिवसांपासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.नदीच्या कडेने चालत गेल्यावर त्यांना बाहेर पडता येणार होते.थोडे चालल्यावर नदीच्या कडेला दलदल दिसली.बाजूला दाट झाडी आणि झुडप...त्या झाडीला वळसा घालून परत नदीच्या काठावर जायचे होते.झाडीला वळसा घालून पुढे गेल्यावर नदी कुठेच दिसत नव्हती.खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज मात्र येत होता.पण नदी मात्र सापडत नव्हती.यातच दुपार उलटून गेली.सगळ्यांच्या अंगातून घामाच्या धारा नीघू लागल्या.विजय आणि राहूल कुठे दिसत नव्हते.त्यांची वाट बघत सगळे एकाजागी थांबले.पण ते काही परत आले नाही.शेवटी कंटाळून सगळे पुढे जायला निघाले.दिवस मावळायच्या वेळी जिथून सुरुवात केली त्याच जागी परत आले.हताश झालेली गीता मटकन खाली बसली.सगळ्यांना भूक लागली होती...
"आग पेटवायला काही आहे का...?"अर्जुनने विचारले...
"आग मी पेटवतो तुम्ही नदीत मासे मिळतात का ते बघा..."संदेश म्हणाला...
आजची रात्र पोर्णिमेची होती.गीता आणि संदेश शेकोटीसाठी लाकड जमा करत होते.दोघांच्या सुरक्षेसाठी मेजर तिथे थांबला होता.अर्जुन आणि सागर मासे पकडायला नदीकडे निघाले.मधे त्यांना विजय आणि राहूल दिसले...
"तुम्ही कुठे गायब झाला होता... किती शोधल आम्ही तुम्हाला...... "अर्जुन म्हणाला...
"हे जंगलच असं आहे.बघता बघता लोक ईथ गायब होतात..."गुढपणे हसत विजय म्हणाला.
ते चौघे नदीकडे निघाले.सागर आणि अर्जुन पुढे होते तर विजय आणि राहूल मागे होते.विजय आणि राहूलचे लक्ष सागरच्या प्रत्येक हालचालीवर होते.तेवढ्यात आकाशात प्रकाश पसरु लागला.पोर्णिमेचा पूर्णच़ंद्र बाहेर येत होता.सागरच्या शरीराला अचानक झटका बसला.दोन्ही हातात डोक गच्च पकडून तो खाली बसला.त्याचे पूर्ण शरीर थरथर कापत होते.अचानक तो विचित्र आवाजात ओरडू लागला..त्याची अवस्था पाहून अर्जुन घाबरला.त्याला काय करावे काही समजेना.मदतीसाठी त्याने विजय आणि राहुलकडे पाहिले.ते दोघे एकमेकांकडे बघत हसत होते.त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन अर्जुन सागरचे हात चोळू लागला.विजयने आपला हात हवेत उचलला.दूर कुठेतरी अंधाऱ्या गुहेत ठेवलेली एक काठी विजेच्या वेगाने त्याच्या हातात आली.ती काळ्या रंगाची नक्षीदार काठी उजव्या हातात घेताच त्याच्या टोकाला एक कुऱ्हाडीच पात चमकल.विजयने ती कुऱ्हाड वेगाने सागरवर फेकली.ते लालबुंद पात सागरच्या मानेवर आदळण्यापुर्वीच अर्जुनने हवेत पकडल
"मला वाटलच होत सगळ्या समस्येच कारण तुम्ही दोघे आहात..."दोघांवर जळजळीत कटाक्ष टाकत अर्जुनने ती कुऱ्हाड पुन्हा विजयवर भिरकावली.विजय चपळाईने बाजूला झाले.कुऱ्हाड वेगाने एका झाडावर आदळली.तो प्रचंड वृक्ष क्षणात कोसळला.झाडातून आरपार गेलेली कुऱ्हाड पुन्हा विजयच्या हातात आली....
"सांगितलं होतं ना हा कोणी सामान्य मुलगा नाही..."विजयकडे बघत राहूल म्हणाला...
"कोण आहात तुम्ही!!तुमचे चेहरे आणि नाव खोटी आहेत..."अर्जुन म्हणाला
"बरोबर ओळखलस!!आमची नाव आणि चेहरे खरे नाहीत.मी शिवबा आणि हा माझा मोठा भाऊ देवबा आहे...तू आम्हाला तर ओळखल पण तुझ्या सोबत असलेल्या सैतानाला नाही ओळखलं... "शिवबा म्हणाला
"म्हणजे!!... "
"म्हणजे हा सागर नसून हिंसक नरलांडगा आहे...हा सर्वांसाठी घातक आहे.याला वेळीच रोखले पाहिजे..."सागरच्या दिशेने धावत देवबा म्हणाला.तो सागरवर आदळणार तोच अर्जुन त्याला आडवा गेला.शिवबाची धडक त्याने सहज थोपवली.शिवबाने त्याला एका झाडावर फेकले.ते दोन्ही भाऊ सागरच्या दिशेने धावले.अर्जुनने तेच झाड मुळासकट उपटून दोघांच्या
अंगावर फेकले.ते अजस्त्र झाड बाजूला फेकत दोघे सहज उभे राहिले.अर्जुन सागरच्या जवळ जाऊन उभा राहिला...
"तू खरच अलौकिक आहेस.तुझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर चांगल्या कामासाठी कर... "त्यांच्याकडे बघत देवबा म्हणाला..
"ते तू सांगायची गरज नाही...काय चांगलं काय वाईट ते मला समजत..."
"तुला माहित नाही आम्ही कोण आहोत...आमच्या मार्गात आडवा येऊ नको...तुला नुकसान पोहोचवण्याची आमची ईच्छा नाही.जरा त्याच्याकडे बघ..."सागरकडे बोट दाखवत शिवबा म्हणाला...तो अजूनही कळवळत होता.
"हा सागरच रुप घेतलेला हिंसक नरलांडगा आहे.चंद्र उगवताच त्याच खरं रुप समोर येईल... "
तेवढ्यात जंगलात संगीताचा आवाज ऐकू येतो.पाठोपाठ विचीत्र आवाजात हसण्याचा आवाज कानावर आदळतो.संदेशची एक जीवघेणी किंकाळी सगळ्यांना ऐकू येते.देवबा आणि शिवबा लगेच तिकडे धावतात.सागरला घेऊन अर्जुन तिकडे जातो.पेटवलेल्या शेकोटोभोवती संदेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो.त्याच्या हातात पकडलेल्या मोबाईलमधून गाणं वाजत असतं.गीताच्या कमरेत हात घालून मेजर वेड्यासारखा नाचत असतो.मेजरच डोक रक्ताने भिजलेलं असत.नाचता असताना गीताचं शीर धडापासून वेगळं होतं.मेजर तिला बाजूला फेकून देतो.आकाशात पोर्णिमेचा चंद्र उगवायला सुरुवात झालेली असते.मेजरचे डोळे चमकू लागतात.तोंडातून सुळ्यासारखे दात बाहेर येतात.म्हणजे मेजर नरलांडगा असतो.मेजर नावाच्या व्यक्तीला मारुन नरलांडग्याने त्याचे रुप घेतलेले असते.पोर्णिमेच्या चंद्राचा त्रास सागरला कसा झाला ते शिवबा आणि देवबाला समजत नसते.दोघेही सागरला नरलांडगा समजत होते.अर्जुन तिथे नसता तर त्यांनी खरच सागरला मारले असते...देवबाच लक्ष सागरच्या गळ्याकडे गेलं.त्याच्या गळ्यातील दोऱ्यात नरलांडग्याचा दात अडकवलेला असतो.सागरला होणाऱ्या त्रासाचं कारण तो दात होता...तो दात मेजर बनलेल्या नरलांडग्याने मुद्दाम त्याच्या गळ्यात अडकवला होता.पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सागरच्या गळ्यातील दातावर पडताच.तो एखाद्या लांडग्यांसारखा वागू लागणार होता.पोर्णिमेचा चंद्र आकाशात असेपर्यंत त्याचे वागणे लांडग्यासारखे असणार होते.देवबा झटकन जाऊन त्यांच्या गळ्यातील दात काढतो.नरलांडग्याचा दात काढताच सागर सामान्य होतो...
"धन्यवाद अर्जुन आज तुझ्यामुळे आज एक निर्दोष व्यक्ती वाचला..."अर्जुनाचा हात हातात घेत देवबा म्हणला.देवबाचा हात विलक्षण गरम झाला होता.हातावर काळे केस उगवले होते.देवबाचे डोळे चमकू लागले होते.
"पण हा काय प्रकार आहे...तुम्ही आहात तरी कोण...?"
"सागरला घेऊन लगेच ईथून निघ..."आकाशाकडे बघत देवबा म्हणाला.पोर्णिमेचा चंद्र बाहेर येताच त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो.मेजर दोन्ही हाताने डोक गच्च आवळून खाली बसतो.त्याच्या अंगावरचे कपडे फाटतात.शरीराचा आकार वाढत जातो,अंगावर काळे केस उगवू लागतात.तोंडावर काळे केस पसरतात.डोळे लालभडक होतात.कानांचा आकार बदलतो.तोंडात सुळ्यासारखे दात येतात.त्याचा चेहरा लांडग्यासारखा बनतो.त्या लांडग्याच्या तोंडातून रक्तासारखी लाळ टपकत होती.तो लांडगा दोन पायांवर उभा राहिला.त्याच अर्ध शरीर माणसाच आणि अर्ध लांडग्याच होत.अर्जुन असा प्राणी पहिल्यांदाच बघत होता.तो धिप्पाड नरलांडगा एखाद्या चालत्या फिरत्या पहाडासारखा दिसत होता.
चंद्राकडे बघत तो नरलांडगा जोरात आरोळी ठोकतो.त्या आवाजाने जंगलात एकच गोंधळ उडतो.सगळे प्राणी सैरभैर होतात.झाडावर बसलेले पक्षी आकाशात घिरट्या घालू लागतात...अर्जुन आयुष्यात पहिल्यांदाच घाबरला होता...
"खूपच भयंकर!!..."अर्जुन म्हणला..
"हो!!हा खूप भयंकर आहे.याची ताकत जास्त आहे.याच वय जास्त आहे.जेवढ जास्त नरलांडग्यांच वय असतं तेवढी जास्त त्याची ताकत असते..."अर्जुनची पाठ थोपटत देवबा तिकडे निघाला.चंद्राच्या प्रकाशात येताच त्याच्या शरीरात बदल होऊ लागले.बघता बघता तो एक नरलांडगा बनला.पण हा नरलांडगा किरकोळ होता.त्या पहाडी नरलांडग्यासमोर अगदीच बच्चा वाटत होता...त्याने मान वळवून अर्जुनकडे पाहिलं...
"आम्ही पण नरलांडगेच आहोत अर्जुन!!फरक फक्त एवढाच आहे कि आम्ही सत्याच्या बाजूने आहोत..."देवबाचा आवाज...तेवढ्यात दुसरा एक नरलांडगा उडी मारुन त्याच्यासमोर आला.तो नरलांडगा बनलेला शिवबा होता.दोघे भाऊ नरलांडगे होते.त्या पहाडी नरलांडग्यासमोर दोघे किती वेळ टिकणार होते...सागरचा हात गळ्यात टाकत अर्जुन तिथून जाऊ लागला...त्या नरलांडग्यांच्या गगनभेदी किंकाळ्या त्याच्या कानावर पडत होत्या...
ईकडे नरलांडगा बनलेल्या देवबा आणि शिवबाने त्या पहाडी नरलांडग्यावर एकाच वेळी हल्ला केला.त्या पहाडी नरलांडग्याने एखादा चेंडू भिरकवावा त्या प्रमाणे दोघांना फेकून दिले.देवबा दगडावर आदळला,तर शिवबा नदीच्या पाण्यात फेकला गेला.दोन्ही हातांनी छाती बडवत त्या पहाडी नरलांडग्याने दोघांना आव्हान दिले.देवबाने एक मोठा दगड त्याच्या अंगावर फेकला.त्याच वेळी वीजेच्या वेगाने पळत शिवबाने त्याला धडक दिली.तो पहाडी नरलांडगा इंचभरसुध्दा मागे सरकला नाही.त्याने आपल्या पायाखाली शिवबाला चिरडले.शिवबा मासोळीसारखा तडफडू लागला.देवबाने हवेत झेप घेतली आणि त्या नरलांडग्याला एक जोरात ठोसा मारला.क्षणभर त्या पहाडी नरलांडग्याच्या डोक्याला मुंग्या आला.देवबा त्याच्या पायाखालून निसटला.दोघांनी त्याला उचलून दूर डोंगरावर फेकून दिले.डोंगरावर आदळलेला नरलांडगा सहज उठला.तिथूनच मोठमोठे दगड दोघांच्या अंगावर फेकू लागला.दगडांच्या वर्षावाने दोघे भाऊ जखमी झाले.तेवढ्यात नरलांडग्याने दोघांवर झेप घेतली.त्याच्या धडकेने दोघे दूर फेकले गेले.अंगातला सगळा जीव एकवटून पुन्हा उभे राहिले.पण आता त्या पहाडी नरलांडग्यासमोर जास्त वेळ टिकाव लागणे शक्य नव्हते.तिघांची पुन्हा तुंबड लढाई सुरु झाली.निर्णायक लढाईत पहाडी नरलांडग्याचे पारडे जड होऊ लागले.दोघे भाऊ आता प्रचंड थकले होते.तेवढ्यात एक कुऱ्हाड वीजेच्या वेगाने नरलांडग्याच्या पायावर आदळून एका झाडीत गायब झाली...तो पहाडी नरलांडगा कळवळला...झाडीतून अर्जुन बाहेर आला.त्याच्या हातात कुऱ्हाड होती...
"तू ईथे कशाला आलास..."त्याच्याकडे बघत शिवबा म्हणाला...
"किती मार खाणार...हिचा पण वापर करा कधीतरी.पण तुमचं हे हत्यार काही बरोबर नाही..."देवबाकडे बघत अर्जुन म्हणाला...तेवढ्यात पिसाळलेल्या न?
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदरर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा