प्रेम म्हणजे काय श्रीकृष्ण आणि इतर महान व्यक्तीमत्वांचा दृष्टिकोन...
प्रेम म्हणजे काय याविषयी आजपर्यंत जगात होऊन गेलेल्या काही दूरदृष्टी ठेवलेल्या व्यक्तींचे मत व दृष्टिकोन जाणून घेऊया... - अर्जुन आप्पाराव जाधव प्रे म म्हणजे काय असते ,प्रेम म्हणजे एक आपुलकी असते ,एक दुसऱ्याविषयी आदर असतो ,आपल्या मध्ये इतर कोणीतरी सामावते व इतरांमध्ये आपण सामावतो . त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्या होतात व आपल्या आवडीनिवडी त्या व्यक्तीच्या होतात जाऊद्या हे माझं व्यक्तिगत मत अनुभव होता.... आता आपण जाणून घेऊया काही जगप्रसिद्ध Genius व्यक्तींची मतं कारण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार पण या लोकांवर नक्की विश्वास ठेवता येईल कारण ही लोकं जगासाठी जे होते ते निस्वार्थ व सर्व सत्य जगत होते. श्रीकृष्ण स्टिफन हॉकींग महादेव १. श्रीकृष्ण : जगातील आत्तापर्यंतचा सर्वात महान genius व्यक्ती कोण आहे असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे श्रीकृष्ण... कारण, श्रीकृष्ण म्हणजे बुद्धी, श्रीकृष्ण म्हणजे सामर्थ्य, श्रीकृष्ण म्हणजे सौंदर्य, श्रीकृष्ण म्हणजे नेतृत्व, श्रीकृष्ण म्हणजे मैत्रीत्व, चौसष्ट कलांत पारंगत, सर्व वेदाचे ज्ञान, श्रीकृष्ण म्हणजे उत्तम राजा, श्रीकृष्ण म्ह