पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्नभंग | मराठी कविता | marathi poem

इमेज
     विषय :- स्वप्नभंग   लाख मोलाचे अश्रू माझे आठवणीत तुझ्या किती रडत बसू ? नाही आधार तुझा डोळे पुसावया मग का तरी मी तुझ्यावर रुसू ? जन्मोजन्मीची गाठ आपुली ती सत्य वचने दिलंस तू मला हातात हात तुझा नी माझा प्रेम माझं कळलं तरी काय तुला ? बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मत तरी का नव्हती  तुझ्यात बोलके नव्हते तुझे डोळे तरीही नजरेने घायाळ केलंय तुझ्या प्रेमात स्वप्न भरले ते डोळ्यांत माझिया दोघांच्या प्रेमळ सुखी संसाराचे मला कधी का कळालेच नाही ? फसवे होते सगळं फक्त एकट्याचे शेवटी एकांतात पडली मी अशी बघत बसली सख्या वाट तुझी खऱ्या प्रेमात स्वप्न नक्की भंगतेच चूकभूल असावी त्यात थोडी माझी स्वप्नांना अशी कुरुवाळीत मी दुरावा तो अंतरीचा अपुल्यात स्वप्नभंग करुनिया माझे तू  कधीचा राहिला ना आता माझ्यात कु. सोनाली कोसे, डोंगरगाव ( बुज.) ___________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आनंदी राहण्यासाठी कशाला एखाद्या कारणाची गरज आहे..

इमेज
कारणावाचून आनंद, तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते ? म्हणजे, मनुष्य आनंदासाठी जगतो, आणि दुःख करतो. याचे कारण असे की, आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते; म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते, कारण भगवंत आनंदस्वरूपच आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की, काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो, आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे; पण कारणावर अवलंबून असणार्‍या आनंदाची वाट दुःखामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून, कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे

WhatsApp विषयी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तीन सत्य

इमेज
मेसेज पाठवूनही, रिप्लाय न मिळाल्याने , अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली  ठेवण्याचा निर्णय घेतला... तेंव्हा श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये  समजावली... - ज्यांना तु आवडतोस , ते न वाचताही तुझ्या मेसेजला रिप्लाय देतील . - ज्यांना तुझे मेसेज आवडूनही , जे नाईलाजास्तव रिप्लाय करू शकणार नाहीत , ते तुझी खाजगीत नक्कीच प्रशंसा  करतील.. - जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे  आहेत, त्यांना तुझा मेसेज कितीही आवडला  तरी ते कधीच रिप्लाय करणार नाहीत..!! म्हणून हे पार्था !    तु लिहीत रहा ! तु पाठवत रहा ! तु फॉरवर्ड करीत रहा! "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" 😃😂🤣😜

टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !

इमेज
"कोणाचं घरटं मोडू नका." सत्य घटना  खूप सुंदर लेख टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग ! एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती. जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे." यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैश

व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा

इमेज
व.पुं. तुम्ही ग्रेटच ....  व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !! 1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !!  3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!  कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली   काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब   लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,  कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य

मनाचा संयम

इमेज
👏 मनाचा संयम 👏 एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर  पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.  त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?' विणकर उत्तरला - 'अवघे दहा रुपये !' त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला - 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?' अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !' त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?' प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !' तो

मत परेशान हो मस्त रहो व्यस्त रहो

इमेज
मत परेशान हो मस्त रहो व्यस्त रहो क्योंकि  1. चालीस साल की अवस्था में "उच्च शिक्षित" और "अल्प शिक्षित" एक जैसे ही होते हैं। 2. पचास साल की अवस्था में "रूप" और "कुरूप" एक जैसे ही होते हैं। (आप कितने ही सुन्दर क्यों न हों झुर्रियां, आँखों के नीचे के डार्क सर्कल छुपाये नहीं छुपते) 3. साठ साल की अवस्था में "उच्च पद" और "निम्न पद" एक जैसे ही होते हैं।(चपरासी भी अधिकारी के सेवा निवृत्त होने के बाद उनकी तरफ़ देखने से कतराता है) 4. सत्तर साल की अवस्था में "बड़ा घर" और "छोटा घर" एक जैसे ही होते हैं। (घुटनों का दर्द और हड्डियों का गलना आपको बैठे रहने पर मजबूर कर देता है, आप छोटी जगह में भी गुज़ारा कर सकते हैं) 5. अस्सी साल की अवस्था में आपके पास धन का "होना" या "ना होना" एक जैसे ही होते हैं। ( अगर आप खर्च करना भी चाहें, तो आपको नहीं पता कि कहाँ खर्च करना है) 6. नब्बे साल की अवस्था में "सोना" और "जागना" एक जैसे ही होते हैं। (जागने के बावजूद भी आपको नहीं पता कि क्या करना है). जीवन

अश्रुंचं मोल ...

इमेज
अश्रुंचं मोल ... !         जीवनाच्या पुस्तकात नानाविध प्रकरणाचा समावेश आहे.त्यातलंच एक प्रकरण म्हणजे रडणं आहे.जे जन्मताच सुरू होतं.मूल जन्माला येताच ते रडलं नाही किंवा काही सेकंद उशीरा रडलं तरी अनेक समस्या पुढं येतात.इतकं महत्त्वाचं ते प्रकरण आहे.अबोल बाळाला काही हवं नको आईला कळतं तेही रडण्यामुळेच ना  ?          जीवन हे हास्य व अश्रूचं सुंदर मिश्रण आहे.अश्रू हे केवळ हतबलता हताशपणा किंवा दुर्बलतेची निशाणी नाही तर ती ह्रदयाची निर्मळताच असते, त्यामुळेच इतरांच्याही दुःखाचे पडसाद त्यावर पडून डोळ्यात ते तरळतात. आपली काहीही चूक नसताना लोक जेव्हा विनाकारण आरोप ठेवतात, दोष देतात तेंव्हाही डोळ्यात अश्रू येतात तेही या निर्मळतेमुळेच.        लोकांवर हसायला अंगी फार मोठं शौर्य लागतं असं काही नाही पण लोकांसाठी डोळ्यात अश्रू उभे राहायला मन, मेंदू व हृदयावर उत्तम सुसंस्कारच असावे लागतात हे नाकारता येणार नाही.म्हणून ऊठसूठ रडणं योग्य नव्हे याचाही विचार करावा लागेल.हे जीवन खुप सुंदर आहे आम्ही चुकीच्या आशा अपेक्षा गरजा अवास्तव स्वप्नांच्या शरपंजरी पडलो आहोत म्हणून तर जीवनाचं रडगाणे बनून जातं .आज आम

देहाचे भोग आणि आनंद

इमेज
┏━━━━•❅•°•❈ - •°•❅•━━━━┓ 🌷 ॥ *प्रसन्न प्रभात* ॥ 🌷 *श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने* १३ ऑगस्ट _*देहाचे भोग आणि आनंद*_ तुम्हाला आपल्या हिताकरीता दुसर्‍याच्या उपयोगी पडणे जरुर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की, परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे ? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही. पण आपल्या हिताकरीता, म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी, दुसर्‍याच्या उपयोगी पडणे जरूरी आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे परमात्म्याला पोहोचते. परमात्म्याने पाठवलेली दुखणी, संकटे, यांत आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर सांगितली, तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सदगुरुंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी, संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे क

बोधकथा - जे होते ते भल्यासाठीच होते

इमेज
पूर्वीच्या काळातील घटना आहे. एक राजा होता त्याचा एक खास मंत्री होता. जो मंत्री  होता त्याचे वडील नेहमी त्याला सांगायचे." जे होत ते चांगल्या साठीच होतं."  त्यामुळे त्या मंत्र्याच्या तोंडात ते वाक्य नेहमी यायचं.  असंच एक दिवस मंत्री आणि राजा बसले असताना राजा  तलवारीला धार किती आहे हे बघत होता. हे बघत असताना तलवारीवरुन हात फिरवताना राजाच्या हाताच्या करंगळीचा थोडासा भाग कापला गेला . लगेच मंत्री सवयी प्रमाणे राजाला म्हणाला.  *"  जे होत ते चांगल्यासाठी होत ."* माझी करंगळी कापली हे चांगलं झाल का ? राजाला राग आला त्याने मंत्र्याला तुरूंगात   पाठवलं.  तरीही तो मंत्री म्हणाला  *" जे होत ते चांगल्यासाठी होतं ".* राजा म्हणाला आत हवा खात बस काय चांगलं होत ते बघ.                      दुसऱ्या दिवशी राजा शिकारीला निघाला त्याला जंगलात हरिण दिसले. हरणाचा पाठलाग करत राजा घोडयावरुन चालला होता . घोडा वेगाने पळत होता. राजाचे सर्व केस विस्कटलेले होते . कपडे खराब झाली . राजा पुर्ण थकला पण हरिण काही सापडले नाही. रस्ताही चुकला... शेवटी राजा कंटाळून एका झाडाखाली बसला.     तेवढयात ति

थोरांचे लहानपण

इमेज
  एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत रहात होते. देशातील अनेक हुशार व व्‍यासंगी पंडीतांमध्‍ये त्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होत असे. सर्व शास्‍त्रार्थामध्‍ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्‍या घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते.           *हे* पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्‍थाने त्‍यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होते असे तुम्‍ही पंडीत असूनसुद्धा तुम्‍ही चक्क लहान काय खेळता आहात ?’’            *गृहस्‍थांचे* हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्‍थांना घेऊन ते जवळच्‍याच एका घरात गेले. त्‍या घरात एका खुंटीला एक धनुष्‍य अडकविले होते. त्‍या धनुष्‍याकडे बोट दाखवून पंडीतजी म्‍हणाले, "महोदय, त्‍या धनुष्‍याच्‍या प्रत्‍यंचेची दोरी सध्‍या का सोडून ठेवली आहे, याचे कारण तुम्‍हाला माहित आहे काय...? त्या गृहस्थाने नकारार्थी मान हलविली.  यावर पंडितजी म्हणाले, "कामाव्‍यतिरिक्तच्‍या वेळेसही जर धनुष्‍याच्‍या कांबीची दोन्‍ही टोके जर वाकवून त्‍या दोरीला बांधून ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्‍याची दोरी खेचायची बंद होईल. परिणा

बोधकथा - भगवंताचे अस्तिव | थॉमस अल्व्हा एडिसन

इमेज
       थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते. त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण तरूण आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार ?"  हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसनना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोहचले.                               आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा, फोनम

जीवनातील रि रूट

इमेज
रि रूट थोर मॅनेजमेंट गुरु एन. रघुरामन यांनी माणसाला निराशा आणि दुःख यातून बाहेर पडण्यासाठी "रिरूट" चा पर्याय दिला आहे. आपण कार चालवत असताना गुगल मॅप वापरतो. गुगल मॅप ने चालताना जर ड्राइवर गाडी मॅप प्रमाणे वळण न घेता पुढे गेला तर गुगल मॅप चा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही तर मॅप "रिरूट" करते. पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो. जीवनातील असंच वळण चुकलं तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना "रिरूट" करायला भाग पाडलं पाहिजे. झालेल्या चुकांवर भर देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा "रिरूट" करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही योग्य राहील.. टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आपल्याला देवाची नड वाटते का ?

इमेज
┏━━━━•❅•°•❈ - •°•❅•━━━━┓ 🌷 ॥ *प्रसन्न प्रभात* ॥ 🌷 *श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने* १९ ऑगस्ट _*आपल्याला देवाची नड वाटते का ?*_ एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले, तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला, की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे, आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते; ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का ? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्थंभूत माहिती असते; परंतु देवघरातला देव, ज्याची आपण रोज पूजा करतो, तो कधी आपलासा वाटला आहे का ? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल ? देवाचे प्रेम लागायला हवे असेल

सुख स्वतःवरच अवलंबून आहे.

इमेज
┏━━━━•❅•°•❈ - •°•❅•━━━━┓ 🌷 ॥ प्रसन्न प्रभात ॥ 🌷 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने २१ ऑगस्ट _सुख स्वतःवरच अवलंबून आहे._ सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्‍न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्‍न केला, तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का, की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे ? तसे, जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे, सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उ

वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा.

वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याचकरीता सांगितला आहे. तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे. ग्रंथ लिहीणाराची तीव्र इच्छा असते की, त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच; मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका अणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत, हा फरक जाणून घ्यावा. कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते. उगीच वाचीत बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो. वाचावे कुणी ? तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये; त्यातही, वर्तमानपत्र वाचीत वेळ घालविणे, म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणे होय. वाचनाचे मनन झाले पाहिजे. मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मि

बोधकथा - कर्म

इमेज
‼️...  कर्म ...‼️ *एकदा* एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरतफिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलावून म्हणाला, "कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही... पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे. *प्रधान* बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला. *दुस-या* दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानापाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदारा शिवाय कोणीच नव्हते. आजूबाजूला चौकशी केली असता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. *प्रधान* दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता. चौकशी करता कळले की... लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. मा

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.

इमेज
एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.     गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते.     अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांतचित्त होती.    गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली.....            "कसे आहात द्वारकाधीश ?"   जी राधा त्याला 'कान्हा' 'कान्हा' म्हणायची तिने "द्वारकाधीश" असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला,            "राधे, मी आज ही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …!"            "खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती."    राधा म्हणाली,            "खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही."            "कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही.             

आमचाही एक 'जमाना' होता

इमेज
आमचाही एक 'जमाना' होता .. पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.😅😅 अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं...🤪 पास / नापास हेच आम्हाला  कळत होतं... % चा आमचा संबंध कधीच नव्हता.😛 शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...🤣🤣🤣 पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...☺️☺️ कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.😁 दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा...🤗 आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना ही आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती आमच्यामध्ये टायलेंट च तेवढं होतं...🤭🤗🤭 एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आ

विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले

इमेज
_"विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले-"_ _लेखक- अनामिक._        अमृता, एक कॉलेज कन्यका, शिकायला गाव सोडून शहरात आलेली ! घरून आलेले महिन्याच्या खर्चाचे पैसे काढण्यासाठी ती एकदा भरदुपारी एटीएम मशीन बॉक्स जवळ गेलेली !         आत जाऊन कार्ड काढून मशीनमध्ये सरकवणार, इतक्यात तिथे नोटा बाहेर येण्याच्या ड्रॉवरकडे तिचे लक्ष गेले. दोन दोन हजाराच्या पाच नोटा तिला दिसल्या. तीने पटकन आजूबाजूला, इकडे तिकडे पाहिले. जवळपास तर कोणीच दिसत नव्हते.          'आता काय करावे ? हे पैसे कुणाचे असतील ? कोण विसरून गेले असेल ?' या विचारात ती पडली !       अमृता ने त्या नोटा मशीनमधून काढून शांतपणे हातात घेतल्या आणि नंतर स्वतःला हवे असलेले महिन्याचे पैसे आपले कार्ड टाकून काढून घेतले.         सहज नजर फिरवताना तिला समोर तिथे त्या एटीएम मशीन ज्या बँकेचे असते त्या बँकेचा फोन नंबर दिसला. स्वतःच्या मोबाईलवरून तीने नंबर फिरवून बँक मॅनेजरशी संपर्क साधून म्हणाली कि, "इथे आता कुणीतरी माझ्या आधी १० हजार रुपये काढले होते, मात्र ती व्यक्ती पैसे विसरून गेलीय !"         त्या बँकेची शाखा जवळच होती म्हणून म

हृदयांतर

इमेज
👌👌👌 हृदयांतर👌 🤝👌                                                   🙏🏻       तात्वीक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...       खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..       एखाद्याशी "वाद" घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधावा.       "अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये..        शेवटी "मृत्यू" हे सुंदर, शाश्वत "वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे "भय" नसावे.        आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे "स्मरण" ठेवू या.        आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे.        "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे.        *क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.* टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर

आठवणींचा श्रावण

इमेज
श्री सरस्वती प्रसन्न योगिनी श्रीनिवास पाळंदे पुणे आठवणींचा श्रावण काही काही व्यक्ती जगातून निघून गेल्या तरी त्यांचं अस्तित्व राहातंच नं? शक्तीचं रूप कन्व्हर्ट होतं फक्त. आणि त्याची जाणीव ठायी ठायी होत राहाते.   *ती* माझ्या आयुष्यात अशाच कुठल्यातरी शक्तीरूपाने भिनून गेली आहे. तसा भिंतीवर आहे तिचा एक निर्जीव फोटो. पण तिच्या फोटोत ती नसतेच कधी. सारखी-सारखी फोटोबाहेर येते. दूध निगुतीने तापवताना, रिकाम्या दुधाचं पातेलं निपटून खाताना,भांडी एकातएक रचून ठेवताना,चहात आलं घालताना,वाणसामानाची यादी टाकताना,वाण्याने पाठवलेलं सामान डोळ्यात तेल घालून बघताना. तिच्यासारख तेल डोळ्यात कुठून आणू,हा प्रश्न आहेच म्हणा. आमचा वाणी आणि ती ह्यांच्यातलं नातं भन्नाट होतं.  त्याला दुर्बुद्धी झाली की तो, हिने न मागितलेली वस्तू पाठवायचा. ते लक्षात आल्यावर ही काय गप्प बसेल?? डोळे बारीक करून त्याचा फोन नंबर पाहून त्याला फोन करायची *तुला सकसचं पीठ पाठवायला सांगितलेलं होतं ना रे? मग तू दुसरं कुठलंतरी माझ्या गळ्यात का मारतोस? पाठव त्या मुलाला पीठ परत न्यायला.आणि हो, ते परत केलेल्या पिठाचे पैसे वजा करायला विसरु नको* वाणी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...