अश्रुंचं मोल ...

अश्रुंचं मोल ... !
        जीवनाच्या पुस्तकात नानाविध प्रकरणाचा समावेश आहे.त्यातलंच एक प्रकरण म्हणजे रडणं आहे.जे जन्मताच सुरू होतं.मूल जन्माला येताच ते रडलं नाही किंवा काही सेकंद उशीरा रडलं तरी अनेक समस्या पुढं येतात.इतकं महत्त्वाचं ते प्रकरण आहे.अबोल बाळाला काही हवं नको आईला कळतं तेही रडण्यामुळेच ना  ?
         जीवन हे हास्य व अश्रूचं सुंदर मिश्रण आहे.अश्रू हे केवळ हतबलता हताशपणा किंवा दुर्बलतेची निशाणी नाही तर ती ह्रदयाची निर्मळताच असते, त्यामुळेच इतरांच्याही दुःखाचे पडसाद त्यावर पडून डोळ्यात ते तरळतात. आपली काहीही चूक नसताना लोक जेव्हा विनाकारण आरोप ठेवतात, दोष देतात तेंव्हाही डोळ्यात अश्रू येतात तेही या निर्मळतेमुळेच.
       लोकांवर हसायला अंगी फार मोठं शौर्य लागतं असं काही नाही पण लोकांसाठी डोळ्यात अश्रू उभे राहायला मन, मेंदू व हृदयावर उत्तम सुसंस्कारच असावे लागतात हे नाकारता येणार नाही.म्हणून ऊठसूठ रडणं योग्य नव्हे याचाही विचार करावा लागेल.हे जीवन खुप सुंदर आहे आम्ही चुकीच्या आशा अपेक्षा गरजा अवास्तव स्वप्नांच्या शरपंजरी पडलो आहोत म्हणून तर जीवनाचं रडगाणे बनून जातं .आज आमच्याकडं खुप सा-या सुखसुविधा खाजगी सार्वजनिक स्वरुपात आहेत पण उपभोगाची दृष्टी हरवत चालली आहे.साधनंही ही कधीच आपल्याला चिरंतन सुखी करु शकत नाहीत.कायम आनंदी बनवू शकत नाहीत हे समजून घ्यावं लागेल.आता आम्ही जसे विविध प्रकारचे क्लास क्लब लावतो ना तसा एखादा क्लास आपणाकडे असलेल्या सर्व वस्तू,वास्तू, सुविधांचा वापर करून कसं जगणं सुरु करु शकतो ते शिकावं लागेल.असलेल्याचा अव्हेरले करत पळत्या पाठी धावणे हा वेडेपणा तात्काळ बंद केला तर नक्कीच आपलं मन आनंदी व अधिक संवेदनशील बनेल.आपल्याकडील साधनंच तर आपलं आयुष्य किचकट करुन ठेवत नाहीत ना ? हे तपासावे लागेल.यंत्राच्या गराड्यात माणसाचंही जगणंच यंत्रवत बनलं आहे व आम्ही खुप व्यवहारी बनत आहोत. मुलं आहेत ना ? तुम्हाला काय हवं नको ते सांगा हे पैसे घ्या.तुमचं तुम्ही पहा.आईवडील आहेत ना ? ठीक आहे.तुमचा महिन्यांचा खर्च किती ? हे घ्या पण कटकट नको.असे व्यवहार पूर्वी कधी कुणी केल्याचं ऐकीवात नाही.असं हे जगणं जीवन कसे सुंदर करणार ? संवेदना कुठून उरणार.प्रत्येकाच्या सहवास, संस्कार,साथ व मदती ची किंमत कशी करणार आपण ? ती केवळ पैशातच परतफेड करणार का ?.
     या अशा सा-या प्रकारामुळे अश्रूचं मोल शून्यात जमा होत आहे.नात्याची विण अश्रूंच्या धाग्यांनी अनेकदा मजबूत बनते.डोळ्यातील अश्रू व हुंदक्यानी हृदयाचं प्रसरण आकुंचन अधिक होतं.मनावरचा ताण कमी होतो. हलकेपणा जाणवतं.डोळ्यात अश्रू येणं म्हणजे हृदयाचा संपूर्ण विकास मानला जातो.भावनिक विकासाची ती एक निर्मळ साक्ष असते.म्हणून हे रडणं तितकंच महत्त्वपूर्ण मानलं जातं.कदाचित विचित्र वाटेल पण अधूनमधून रडण्याचा व्यायाम त्यासाठी आपणास आता करावा लागेल उरल्यासुरल्या संवेदना टिकवून ठेवण्यासाठी.अश्रू क्लब अजून तरी निघाले नाहीत पण कदाचित ती गरज बनेल.कारण दुखाचंही तेवढं काही वाटत नाही व सुखाचं मोलही समजेना झालं आहे.
      अश्रू सारखी निर्मळ गोष्ट दुसरी नाही.अश्रू हे शस्त्र म्हणून घरोघरी वापरलं जातं याचाही अनुभव असेलच अश्रू हे कमजोर मनाचं लक्षण नाही तर निर्मळ मनाची प्रचिती आहे.माहेरची साडी चित्रपट प्रदर्शन होताना चित्रपटगृहात हुंदके ऐकू येत होते.कितीतरी हिंदी मराठी सिनेमातील दृश्यांची एकरुप होऊन डोळे ओलांडतात आजही सोशलमिडियावर असे अनेक प्रसंग घटना लेख व्हिडिओ हे वाचतापाहताना डोळ्याच्या कडा ओलावत  अश्रू येत असतील तर भलेही मुलं हसत असतील पण आपलं हृदय जिवंत आहे याची खात्री बाळगा.आजवर आपण रक्ताच्या शाहीने लिहिलेली अनेक वर्णने वाचली असतील पण अश्रूंची ही शाई असते हे आचार्य अत्रे साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात गुरुजीनी आईचं वर्णन महात्म्य अश्रुंच्या शाईनं लिहिलं आहे.हे वाचल्यानंतर अश्रूचं दिव्य मोल व महात्म्य लक्षात येते.
         आजच्या या धकाधकीच्या जीवनात अश्रूंची फार गरज बनते मनावरील ताण हलका होण्यासाठी.खंबीर जरुर असावं पण डोळ्यात अश्रूच येणार नाहीत इतकी संवेदनाशून्य व गंभीर जीवन कधीही जगू नका.परस्पर सहकार्य, प्रेम, जिव्हाळा,आपुलकीची निशाणी अश्रू आहे.
वियोगाचं दुःख पचवण्याचं तंत्र अश्रू आहे.निर्वाणीचा निरोप म्हणजे अश्रू आहेत.इतरांच्या दुखात सहभागाची प्रचिती अश्रू असते.त्याला डरपोकपणा माननं योग्य नाही. म्हणून मानवी जीवनातील या महत्त्वपूर्ण प्रकरणाचं महत्त्व खुप शब्दातीत असून बहुमोल आहे.तेंव्हा जरुर विचार करा व डोळ्यात असे अश्रू येत असतील तर त्याचा जरुर सन्मान करा.... त्यासाठी रडणं जरुरी आहे... !
           श्री.रवींद्र कल्याणराव देशमुख गुरुजी.



______________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट