पोस्ट्स

कविता - वाट पाहणारं दार

इमेज
"वाट पाहणारं दार"🚪 प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं खरच सांगतो त्या दाराच नाव आई बाबा असतं उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं प्रत्येक घराला एक *वाट पाहणार दार असतं🚪* वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेच महिरपी तोरण असतं घराच्या आदरातिथ्याच ते एक परिमाण असतं नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड मर्यादेचं त्याला भान असतं प्रत्येक घराला एक *वाट पाहणार दार असतं🚪* दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधी सडत नसतं ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं प्रत्येक घराला एक *वाट पाहणार दार असतं🚪* सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देतं व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनं ताळ्यावर आणतं प्रत्येक घराला एक *वाट पाहणार दार असतं🚪* मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका मानापमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका कारण,  प्रत्येक घराला एक वाट पाहणार दा

कविता - आई

इमेज
🙏 आई🙏 🌿काहीच बोलता न येणारी बाळं        बोलायला शिकतात बोलायला शिकवलेल्या आईला       कधी कधी खूप खूप बोलतात🌿 🌿मान्य आहे पहिला संघर्ष         आईशीच असतो बोलताना , तिच्या भावनांचा अर्थ       समजून का घ्यायचा नसतो ?🌿 🌿नको म्हणा , रागवा , तिरस्कार करा     हवे तसे बोला , मस्करी करा ती कायम तुमच्या पाठीशीच असते     कारण ती वेडी असते🌿 🌿नाही जेवला , अभ्यास नाही केला     लवकर नाही उठला , नाराज दिसला सतत विचारपूस करत राहते    कारण ती वेडी असते🌿 🌿तुम्हाला रागावते पण तीच रडते       मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते स्वतःला विसरते , तुमच्या विश्वात रमते      कारण ती वेडी असते🌿 🌿जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते     हरला तर खंबीर बनवते तुम्ही असाल कसेही , जीवापाड जपते      कारण ती वेडी असते🌿 🌿ती नाही कळणार , नाही उमगणार   तीच्यामुळे आपण काहीसे घडलो हे आज नाहीच आपल्याला पटणार   कारण ती वेडीच वाटणार🌿 🌿खरं तर ती वेडी नसतेच कधी      मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत स्वतःला ही नव्यानं फुलवत असते     स्वप्नातील दिवस तुमचे  वास्तव स्वीकारुन बघत असते     कारण ती "आई "असते🌿 🌿ती उमगू

Be the CEO of your own Life

इमेज
Be the CEO of your own Life ... अप्रतिम लेख ... परत परत वाचा  नक्की वाचा.. बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात... 👌 प्रत्येकाने वाचावा असा अप्रतिम लेख... दोन दिवसांपूर्वीची गोष्ट.. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.  मुलगी ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.  पेपर खरं तर, नांवाला.  माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.) माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.  जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.  अंगावर ब्रुट.  हातात मराठी पुस्तक.  खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.  रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक

आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं हवीत...

इमेज
आपलं यश डोळे भरून... बघणारी माणसं हवीत...... दुसऱ्या साठी करताना सुद्धा ........  आपल्याला झेपेल इतकंच करावं.. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना ..... अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.........   प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून......  कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो.... कोणताही स्वार्थ नसतांना..  मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात.....  ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं ........  केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो.. त्यांचं कर्तव्यच आहे.. करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो..  आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं.....   हा निर्मळ प्रयत्न असतो.........  गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो.......  तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो... ज्याला समजून घ्यायचंय ......  तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो... ज्याला समजून घ्यायच॔च नाही ......  तो शब्दाचा किस पाडतो... शब्दांनी घायाळ करतो... नात्यांची खरी मेख तर इथेच आहे... माझं माझं करता करता ......  आपण आपल्यांना दुखावतो........  घालून पाडून बोलतो.......... . परिणाम फक्त वाईटच होतात... संबंध दुरावले जातात.....  आपुलकीतला रस संपत जातो... उरते ती फक्त निराशा... हल्ल

बहिर्जी नाईक

इमेज
बहिर्जी नाईक  दहा दहा दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो, तर महीना महीना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो...! धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो, पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो...!              तलवार ,भाला ,फरीगगदा ,पट्टा ,विट्टा ,धनुष्य असे काही चालवतो कि समोर महासागर येऊदे शत्रुचा...! शत्रुच्या राणीवशात जाऊन राहु शकतो,तर खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवुन बक्षीस घेऊन येऊ शकतो...!             माणुस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही , जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा...! मोठमोठ्या गोष्टीत अचुक निर्णय , सावध नियोजन आणि स्वत:च्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड...! हा बहीर्जी नाईक जणू शिवाजी महाराजांचा तिसरा डोळाच होता...! आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडुन कोणी विना परवाना जाऊ शकत असतील तर ते म्हणजे बहिर्जी नाईक...! महाराजांचा नाईकांवर इतका विश्वास कि हा माणुस चुकुन सुद्धा चुक करु शकणार नाही इतका द्रुढविश्वास...! पाची पातशाहींना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्यभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहीर्जी

कविता : तिला विचारलं नाही..

इमेज
_______________ 🍁 तिला विचारलं नाही..🍁 ज्या क्षणी पाहिले तिला... होकार गृहीतच धरला...! मी तुला आवडलो का...? तिला विचारलंच नाही...!! सप्तपदी चालतांना... घुटमळली पाऊले तिची...! हुरहुर कसली होती...? तिला विचारलंच नाही...!! माप ओलांडतांना उंबरठ्याचं...  मी आलो सहज आत...! तुलाही यावंस वाटतंय का...? तिला विचारलंच नाही...!! झाली पहिली भेट... किती आतुर होतो मी...! ओढ तुलाही आहे का...? तिला विचारलंच नाही...!! वंशाला दिवाच हवा... सांगून मोकळा झालो...! पण आई व्हायचंय का...? तिला विचारलंच नाही...!! संगोपन करतांना मुलांचं... कसरत होत होती तिची...! गरज माझीही लागेल का...? तिला विचारलंच नाही...!! आयुष्यभर दिली साथ... झाली सुख दु:खाची सोबती...! कधी मन तिचं दुःखलं का...? तिला विचारलंच नाही...!! न मागताच तिच्याकडून... घेतलं मी सारं काही...! तुलाही काही हवं का...? तिला विचारलंच नाही...!! खरंच किती स्वार्थी झालो... गृहीतच धरलं मत तिचं...! तिचं मन काय म्हणतं...? तिला विचारलंच नाही...!! 🍁सर्व महिलांना समर्पित 🍁 टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता : आयुष्याच्या अखेरीस

इमेज
आयुष्याच्या अखेरीस ************** आयुष्यभर कष्ट केलीत पण मनासारखे जगता आले नाही राब राब राबत गेलो पण माणस् कळली नाहीत  ईच्छा साऱ्या दुर ठेवून आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो स्वतःसाठी कमी मात्र दुसऱ्यांसाठी जास्त  जगलो नोकरी असेपर्यंत सारकाही सुखासीन असतं त्यानं संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता : महात्मा गांधी

इमेज
'महात्मा गांधी' सत्य अन् अंहिसेचे होते ते पुजारी, पत्करली नाही कधी त्यांनी कुणाची लाचारी, होते आहे मात्र आजही तत्वांची त्यांच्या परीक्षा, विसरला नाही अजूनही माणूस त्यांनी दिलेली विचारांची दिक्षा, होणार नाही आज  त्यांच्यासम कुणीही महान संत, नव्हताच त्यांच्या सहनशिलतेला कधीही कोणत्या गोष्टीचा अंत, मात्र, पसरतोय आज वारयासारखा भ्रष्टाचार होणार कसा त्यांचा आज जगाला साक्षात्कार, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, हि त्यांची शिकवण, देईल त्यांची कायम आठवण.                               मंगेश शिवलाल बरई.                    हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.                    संपर्क-९२७१५३९२१६ ______________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता : राहून गेले

इमेज
_________________________ जगणे कठीण होते बरेच भोगुन झाले  खुप जगायचे होते थोडे राहून गेले नजरा बऱ्याच होत्या जखमा देत होत्या लक्तरे या देहाचे कितीदा पाहुन झाले विस्कटलेले आयुष्य थोडे शिवायचे राहून गेले किती हात होते किती घात होते  गर्दीतून स्पर्श किती झेलून झाले लज्जेला थोडे झाकायचे राहून गेले किती धावत होते किती पहात होते खेळ वासनेचा खेळून किती वार केले आक्रोशालाही थोडे शांत करायचे राहून गेले किती आकृत्या  विकृत झाल्या किती बळी गेल्या मेणबत्तीचेही कितीदा  वितळून झाले निषेधाचेही थोडे  निषेध करायचे राहून गेले धाव जोरात होती पळवाट कुठेच नव्हती वेदनेलाही ठार करून शिल वेशीवर टाकून गेले अमानुषतेलाही थोडे समजावयाचे राहून गेले संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सोडून द्यावं | marathi poem | जीवनावर कविता

इमेज
 🙏🏻😊 सोडून द्यावं 😊🙏🏻 🍁 एकदोन वेळा समजावून  सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे  निर्णय घेत असतील  तर पाठीमागे लागणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं *सोडून द्यावं* 🍁 🍁 एका ठराविक वयानंतर  कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं,  आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं   *सोडून द्यावं* 🍁 *समजलं तर ठीक नाहीतर हे ही सोडून द्यावं* 🙏🏻🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आता मला जमायला लागलय | मराठी कविता | audio poem

इमेज
✨🍀✨ आता मला जमायला लागलय . आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर  जे जे मला दुखवत गेले  त्या त्या सगळ्यांना  न दुखावता सोडून देणं  *आता मला जमायला लागलयं.* संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर  निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते  *हे ही समजायला लागलय.* माझ्या बरोबर घडणाऱ्या  अनेक वाईट गोष्टींचा  उहापोह करून त्यात  शक्ती खर्ची घालून  आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय *हे ही जाणवायला लागलयं.* आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून,  इतरांना आनंदी करणे *मला आता जमायला लागलय.* कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे  त्यांना संमती असणे ,गरजेचे नाही, कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं.  *हे ही कळायला लागलंय .* आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण स्वतः च्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब क

सुसंस्कार..

इमेज
_सुसंस्कार.-_ _लेखक- अनामिक._            आयुष्याच्या प्रवासात कोण, कुठे, केंव्हा आणि कशा स्वरूपात मिळेल काहीच सांगता येत नाही. अशाच एका प्रवासात मला आलेला  अनुभव थोडक्यात असा.           माझ्या जिवलग मित्राच्या मुलीचं लग्न होतं राजमुंद्री या गावाला. विशाखापट्टणम पासुन काही मैलांवर असणारं हे गाव.        मी विशाखापट्टणम स्टेशनवर मिसेससह पोहोचलो. रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली होती. पाय ठेवायला जागा नव्हती. काही प्रवासी ऊभ्यानेच प्रवास करीत होते.        एकदाची ट्रेन सुरू झाली आणि हायसे वाटले. राजमुंद्रीला जातांना तूली नावाचं एक स्टेशन लागतं. गाडी हार्डली एखादा मिनिट थांबत असेल.       खिडकीतूनच चहा व्हेंडरला हाक मारून दोन काॅफींची ऑर्डर दिली आणि ईथेच सर्व गडबड झाली. मी ensure करायला हवं होतं की माझ्या वाॅलेटमधे चिल्लर पैसे आहेत की नाहीत. एक दोनशेची नोट होती त्याला दिली. ऊरलेले पैसे वापस घेता घेता ट्रेन सुरु पण झाली.         झालं, तिकडे रेल्वेचं इंजीन भडकलं आणि ईकडे बायको. थांबता थांबेना. "आधीच सांगितलं होतं तुम्हाला, काॅफी घेऊ नका म्हणून, आणि वेंधळे तर ईतके की पैसे आधीच देऊन टाकले."

शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो

इमेज
"शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो."  "चढलेला मोठा आवाज"... आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.  घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.  घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या *ऋण लहरी अशुभ अनुभव* देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे *अदृष्य लहरींची शिकार* होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.  *शुभ लहरींचे* ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे  उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.  एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्

शट्डाऊन ॲन्ड रीस्टार्ट

इमेज
वाचण्यात आले ला सुंदर लेख   🌸शट्डाऊन अॅण्ड रीस्टार्ट🌸 चांगले - वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काही वेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते... अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूती शिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशा वेळी न रडता, न घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे... मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो ते स्वत:वर करा. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही., अशा वेळी तुम्ही काय करता...?

SpaceX एक अद्वितीय कंपनी

अवकाशाला गवसणी घालून  ••• पृथ्वी  एक जिवंत   Instagram वर ही पोस्ट पहा SpaceX (@spacex) ने सामायिक केलेली पोस्ट टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

व्यवसाय / उद्योग प्रकार

इमेज
📍 # *सुक्ष्म_तसेच_लघु_उद्योगांची_यादी*  💼 आपल्याला उद्योग सुरू करायचा असतो परंतु नेमका कुठला व्यवसाय सुरू करावा हे कळत नाही. मुळात आपल्याला ज्या गोष्टींची आवड आणि ज्ञान असेल त्याच क्षेत्रात आपण उद्योगाची सुरुवात करावी. अश्याच विविध क्षेत्रातील उद्योगांची यादी आपल्यासाठी उद्योजक महाराष्ट्र देत आहे. यापैकी आपण आपला उद्योग निवडू शकतात 👉 *खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग –*  🎯कुंभार उद्योग 🎯चुना उद्योग,  🎯दगड फोडणे-कोरणे, 🎯नक्षीकाम करणे व दगडापासून उपयोगी वस्तू तयार करणे,  🎯पाटी पेन्सिल बनविणे,  🎯प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वस्तू तयार करणे,  🎯सरपणासाठी कोळसा तयार करणे,  🎯भांडी साफ करण्यासाठी पावडर तयार करणे,  🎯सोने, चांदी, दगड आणि कृत्रिम धांतूपासून दागिने तयार करणे,  🎯गुलाल-रांगोली तयार करणे  🎯लाखेच्या बांगड्या तयार करणे,  🎯रंग वॉर्निश,  🎯डिस्टेम्पर तयार करणे,  🎯काचेची खेळणी तयार करणे 🎯सजावटीसाठी काच कापणे, काच डिझायनिंग व पॉलिश करणे,  🎯रत्न कटाई करणे.  👉 *वन संपत्तीवर आधारीत उद्योग -*  🎯हातकागद उद्योग,  🎯वह्या- रजिस्टर- लिफाफा इत्यादी लेखन सामुग्री तयार करणे,  🎯काथ तय

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...