◾कविता :- उजळू दे गं पणती...
उजळू दे गं पणती दोन हात जोडूनी करते आई विनंती, येऊ दे या जगात उजळू दे गं पणती ." धृ " तुझ्या गर्भातूनी गे जन्म घ्यायचाहे मला, सार्थक माझ्या जन्माचे दिसणाराहे तुला असायलाच हवी तुम्हा दोघांची अनुमती!!१!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती.... छान शिक्षण घेईन जन्मा आल्यानंतर, मिटेल मुलामुलीतील भेदाचे अंतर, नाही कोणते मागणे ना अपेक्षा कोणती!!२!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती.... प्रगतीच्या भरारीने नसे,हुंड्याचा भार, मुलीच्या अभावी जगा,आई कशी मिळणार? अंकुरा कुस्ककरणाऱ्यांची वाढताहे गिणती!!३!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती... जिजाऊ अहिल्या सावित्रीचा मला दे वारसा, दाविन मी जगाला बाबांसह तुझा आरसा, हसू बागळू खेळू दे तुमच्या गे संगती!!४!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती.... कु.दिपाली निरंजन मारोटकर रा.पळसखेड,ता.चांदूर(रेल्वे),जि.अमरावती ➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा } सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅