◾आरोग्य :- स्वतःच बना स्वतःची आई...
"स्वतःच बना स्वतःची आई "
नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझ्या 27 वर्षांच्या प्रॅक्टिस मधे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो, आता प्रेम म्हंटल्या वर लगेच आपल्याला ते हिरो आणि हेरॉईनच सिनेमा मधलं प्रेम आठवत. पण ते प्रेम नाही म्हणत मी, तर ज्याला आपण माया, ममता, वात्सल्य म्हणतो ते आईच प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं.
थोडे स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघाना... मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते. कारण प्रत्येक फॅमिली मधे कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेऊन दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते) पण पुरुष ही थोड्या फार प्रमाणात असे आपण पहातो.
तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीर ही करत नाही, पण एखादवेळ अशी येते की, त्या व्यक्तीलाही प्रेमाची गरज असते. मग त्या व्यक्तीला एकाकी वाटतं आणि कुठे तरी आधार हवा असं वाटतं.
ह्या मनाच्या अस्वस्थते मुळेच काही व्याधी निर्माण होतात उदा : ऍसिडिटी, डोकेदुखी, डिप्रेशन, रक्तदाब, मधुमेह वैगरे.
तर ह्याला उपाय एकच आहे की, तुम्हीच तुमची आई व्हा. जसं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर, नातवांवर करता तसं स्वतःवर करायला शिका. कारण प्रेम करणं, हा तुमचा स्वभाव आहे. मात्र स्वतःकडे प्रेमाने पाहायला तुम्ही विसरून गेला आहात, आणि सगळं प्रेमाचं भांडं दुसऱ्यांवर ओतता आहात.
एखाद्या स्त्रीची कंबर खूप काम करून दुखली, किंवा गुडघा दुखला तरी ती स्त्री त्या अवयवाचा राग करते आणि काय मेलं झालं ह्याला दुखायला असं म्हणून ती अपेक्षा करते की, नवऱ्याने किंवा मुलांनी तरी विचारावं की दमलीस का? काही बाम वैगेरे लावून देऊ का.. एक तर मूव्ह ची जाहिरात बघून अपेक्षा दुणावतात. पण प्रत्येक वेळी कोणी वेळ देईलच असं नाही.
अश्यावेळी मनात कुढण्या पेक्षा स्वतःच स्वतःची आई बना. थोडा वेळ एकटं बसा, आणि दुखणाऱ्या भागा वरून जमल्यास हात फिरवा.. आता पाठ दुखत असेल तरी डोळे मिटा आणि हाथ फिरवताना फील करा... स्वतःच्या शरीरा कडे प्रेमाने बघा, आणि तुमच्या मुलाला किंवा नातवाला म्हणताना... तसं म्हणा... काय झालं माझ्या बाळाला.. बरं नाही कां?
आणि मग स्वतःच्याच डोक्यावरून हाथ फिरवा. दुखऱ्या भागाला थोडा वेळ गोंजारा.. आणि बघा जादू... दुखणं दूर पळत की नाही. सुरुवातीला लाज वाटेल, पण हे मनातल्या मनात आपण आपल्याशीच बोलत असल्यामुळे कोणाला ऐकायलाही जात नाही, आणि खूप बरं वाटतं.
ह्या सगळ्यात भावना खूप महत्वाची आहे. तुमच्या मुला, नातवा सारखं स्वतः बद्दल प्रेम निर्माण करा. तुम्हाला जो खाऊ खावासा वाटेल, तो सगळ्यांसाठी घेऊन या आणि त्यांच्या सोबत मनसोक्त खा. तुम्हाला आवडणारी भाजी आवर्जून बनवा आणि दुसऱ्यांसाठी काही वेगळा बनवा.
पण स्वतःची आई बना आणि स्वतःचे लाड करा. ते ही दुसऱ्यांना न दुखावता. कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि मग आयुष्यात हे करायचं राहिलं, ते राहिलं... ह्याची खंत करून दुखत करण्यात काय अर्थ आहे. दुसऱ्यांसाठी प्रेमाचा सागर असणारे तुम्ही स्वतःच कोरडे राहिलात तर काय उपयोग.
विचार करा आणि एकदा कां होईना हे करून पहा. ह्या मुळे आपल्यावर एकटं राहायची वेळ आली, तरी आपली प्रॅक्टिस असते मग डिप्रेशन येत नाही.
खूप लोकांना ह्याचा फायदा झाला आहे. सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी पण जगा.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
डॉ. विकास निकम
जीवन विकास केंद्र
जळगाव 9850484722
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा