◾थोडं मनातलं :- मृत्यू - एक अटळ सत्य...
तुम्ही किती काळजी घ्या किती आरोग्याकडे लक्ष केंद्रित करा मृत्यू यायचा असेल तर तो बरोबर ठरलेल्या क्षणालाच येणार. जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक ठरलेला आहे आणि तो अटळ आहे.
मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं.
कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.
त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत.
त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे.
त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.
मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्या मुलींबरोबर.
दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.
त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही.
त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे.
मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे.
मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.
मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं.
चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.
म्हणूनच सिकंदरन सांगितले होते, मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा, जगाला दिसावे... मी रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जात आहे.
हेच जीवनाचे सत्य आहे.
😊 आनंदात रहा, दुसर्याला पण आनंद वाटा आणि आनंदाने जगू द्या. 😊
खरं उदाहरण जीवन सत्य आहे
उत्तर द्याहटवा