सुखाच्या शोधात...

सुखाच्या शोधात...
             आज सुमारे दहा वर्षांनी मनोज कॉलेजमध्ये आला होता. अनेक मुले-मुली पाठीला दप्तर लावून कॉलेजच्या आवारात ये-जा करताना त्याला दिसत होती. काही झाडाखाली बसली होती, गप्पा मारत होती. या विद्यार्थ्यांमध्ये मनोज आपलं कॉलेज जीवन शोधत होता. सर्वकाही तसेच होते, फक्त त्या विद्यार्थ्यांमध्ये तो नव्हता, त्याचे मित्र नव्हते.
             दोन-तीन प्राध्यापक सेवानिवृत्त झाले होते. काहींनी त्याला ओळखले तर, काहींना त्याला आपली ओळख पटवून द्यावी लागली. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलो, असे म्हटल्यानंतर प्राध्यापकांनी त्याचे कौतुक केले. पदवी कशी पूर्ण करता येईल, याबाबत सर्व चौकशी करून तो परत पार्किंगच्या दिशेने निघाला. त्याची सायकल पार्किंग मध्ये होती.
                 कॉलेजच्या परिसरात एक टेम्पो उभा होता. त्यात बरीचशी 'रोपे' होती. 'रोपे' उतरवण्याचे काम चालू होते. खाली उतरवून ठेवलेल्या रोपांकडे पाहत पाहत पुढे जात असताना, करड्या रंगाची साडी घातलेली, सडपातळ बांध्याची, तीस-पस्तीस वर्षे वय असलेली तरुणी त्याला दिसली. तिला पाहताच मनोजची गती मंदावली. तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून तो हळूहळू चालू लागला. ती 'सुनिता' होती! मनोजची वर्गमैत्रीण! 
               मनोजने स्वतःकडे बोट करत, आवाज न करता, फक्त ओठ हलवले, 'ओळखलं का? मी मनोज....' सुनीताने स्मित हास्य करत, होकारात मान हलवली. मग तीही चालायला लागली. दोघांमध्ये बरेच अंतर होते. मंदमंद चालताना ते अंतर कमी कमी होत होते.
मनोजने विचारले,"तू कॉलेजमध्ये कशी काय?" मनोज कडे एक नजर टाकत सुनिता म्हणाली, " खरं सांगू, सुखाच्या शोधात!"
"सुखाच्या शोधात?"
"हो, सुखाच्या शोधात. एका मोटिवेशनल स्पीकरचे भाषण मी ऐकले. त्यात तो सांगत होता, जीवन सुखी करायचे असेल, आनंदी राहायचं असेल तर, सुखी भविष्याची स्वप्न रंगवत, वर्तमानातलं दुःख विसरून, भविष्यातील सुखाकडे पहा. हे दिवस निघून जातील. आनंदाचे, सुखाचे दिवस येतील."
       "पण तू तर भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आहेस, या आठवणी तुला आनंद देतील?"
"हो, निश्चितच! कॉलेजच्या या आठवणी माझा ठेवा आहेत. त्या कुणी माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. त्या आठवणींना उजाळा देत, आनंद मिळवावं सुख मिळवावं, म्हणून इथे आले."
         "तुला कशाचं दुःख आहे. म्हणजे, तुझ्या दुःखाचं कारण काय? मी तुझी मदत करू शकलो तर, मला आनंदच होईल."
      "फार छोटीशी कहाणी आहे माझी. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. आई-वडिलांनी स्थळ शोधलं. थाटात लग्न झालं. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच, माझ्या पतीला एक दुर्धर आजार जडला. त्यातून तो सावरलाच नाही. विधवेचे जीवन जगत आहे. जेव्हा कधी मन दु:खी होतो. जगणं नकोसं वाटतं. तेव्हा मनात आशा निर्माण करणाऱ्या, जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या मोटिवेशनल स्पीचेस ऐकते. जुन्या आठवणींना उजाळा देते. या आठवणीत सुख शोधते. असो, पण तू इकडे कसा?"
         "माझी कहाणीही छोटीशीच आहे! अचानक वडील गेल्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावर आली. जीवनाचा मार्गच बदलला. आई, दोन लहान बहिणी..... शिक्षण अर्धवट सोडून रोजीरोटीच्या मागे लागलो. हाताला मिळेल ते काम केलं. दोन्ही बहिणीचे लग्न केले. मनात आलं आता पुन्हा जीवनाला त्याच ठिकाणाहून सुरुवात करावी, जिथून मार्ग बदलला होता. पदवी पूर्ण करण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून आलो होतो. खरं सांगू या 10 वर्षात एवढे व्यत्यय, एवढ्या अडचणी आल्या की, सुखाची कल्पनाही करता आली नाही. तुझ्या प्रमाणेच मीही सुखाच्या शोधात आहे!
         सुनीताने परत स्मित हास्य करुन, मनोज कडे पाहिले. दोघेही पार्किंगपर्यंत पोहोचले होते... 
         सय्यद जाकेर अली
         परभणी
         9028065881

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...