कर्ण कृष्णाला विचारतो...
💐💐💐💐 कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो! एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला. द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला. कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले. तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?" *कृष्णाने उत्तर दिले:* "कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती. रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले. तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात. मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. ना कोणती सेना