कविता : राहून गेले
_________________________ जगणे कठीण होते बरेच भोगुन झाले खुप जगायचे होते थोडे राहून गेले नजरा बऱ्याच होत्या जखमा देत होत्या लक्तरे या देहाचे कितीदा पाहुन झाले विस्कटलेले आयुष्य थोडे शिवायचे राहून गेले किती हात होते किती घात होते गर्दीतून स्पर्श किती झेलून झाले लज्जेला थोडे झाकायचे राहून गेले किती धावत होते किती पहात होते खेळ वासनेचा खेळून किती वार केले आक्रोशालाही थोडे शांत करायचे राहून गेले किती आकृत्या विकृत झाल्या किती बळी गेल्या मेणबत्तीचेही कितीदा वितळून झाले निषेधाचेही थोडे निषेध करायचे राहून गेले धाव जोरात होती पळवाट कुठेच नव्हती वेदनेलाही ठार करून शिल वेशीवर टाकून गेले अमानुषतेलाही थोडे समजावयाचे राहून गेले संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅