◾बोधकथा :- नियोजन

राजापूरात प्रतिक नावाचा राजा राज्य करत होता. तो अत्यंत बुद्धिमान, निडर, चतूर आणि कनवाळू होता. एकदा एक मोठे ज्योतिषी या नगरात अवतरले. राजाही त्यांच्याकडे नगराचं भविष्य जाणून घेण्यासाठी गेला.

राजा ज्योतिषाला म्हणाला, "महाराज, मला माझ्या भविष्याची काळजी नाही. पण माझ्या प्रजेची काळजी मात्र नक्कीच आहे. प्रजेवर काही संकट येणार असल्यास सांगा. "

ज्योतिष महाराजांनी आपल्या झोळीतून काही पुस्तकं काढून वाचायला सुरुवात केली. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसू लागला. ते राजाला म्हणाले, "मी सर्व गोष्टींची नीट पाहणी केली आहे. त्यावरुन असं दिसतंय की येणा‍ऱ्या वर्षांत तुमच्या प्रजेवर दुष्काळाचं मोठं संकट येणार आहे. जर तुम्ही योग्य नियोजन आणि निर्णय घेतलात तर या संकटामुळे प्रजेचं फार नुकसान होणार नाही."

ज्योतिषी निघून गेले पण राजाच्या मनातून तो विचार जात नव्हता. मग राजाने वेषांतर करून राज्याचा फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं लक्षात आलं की, प्रजा खूपसं अन्न आणि पाणी वाया घालवते. त्यांनी प्रजेला समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हतं.

ज्योतिषी महाराजांच्या वक्तव्यातलं मर्म राजाला कळून चुकलं. त्यांनी मनाशी एक निर्णय पक्का केला व दवंडी पिटवली की, ‘प्रत्येकाने आपल्या जवळच्या धान्यापैकी एक तृतीयांश भाग राज्याच्या कोठारात जमा करावा. शिवाय यापुढे पाणी वापरावर कर लागू करण्यात येईल, जो कोणी त्याचं पालन करणार नाही त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल.’

या दवंडीमुळे प्रजेला आश्चर्य ‌वाटलं पण शिक्षेच्या भितीने त्यांनी हुकुमाचं पालन केलं. अन्न-पाण्याचा काटकसरीने वापर होऊ लागला. ज्योतिषाच्या भाकितानुसार काही महिन्यांतच दुष्काळ पडला. प्रजा दुःखी होऊन राजाकडे आली. राजाने त्यांना कडक शब्दांत आधी करत असलेल्या अन्न-पाण्याच्या नासाडीविषयी समज दिली व समजावले कि, "या संकटाची मला कल्पना होती त्यामुळेच मी तुमच्या अन्नपाण्याच्या अमर्याद वापरावर नियंत्रण आणलं. पण आपल्याकडे आहे म्हणून अन्नपाण्याची अशी नासाडी करणं, चुकीचं आहे."

इतकं बोलून राजाने आपलं कोठार प्रजेसाठी खुलं केलं. दुष्काळाच्या संकटावर मग सा‍ऱ्यांनी मिळून मात केली.

🔅तात्पर्य :~
काटकसरपणा आणि नियोजन हे गुण प्रत्येकाने अंगी बाणवायला हवेत.

____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट