◾आरोग्य :- तुम्ही नैसर्गिकरित्या... तुमचा मूड बदलू शकता !

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

* तुम्ही नैसर्गिकरित्या... तुमचा मूड बदलू शकता !
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

आपल्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. सध्या धावपळ करत एकाच वेळी अनेक काम करण्याचे कसब देखील मिळवले आहे. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतर तुम्हाला कोणीही काहीही मदत करू शकत नाही.

आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा.
   
आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे? काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात.

जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो. तुम्हाला वाटेल खरंच हे शक्य आहे का? मी हे पाहिलंय माझ्या ग्राहकांवर हे आजमावले आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे आनंदी जीवनाचं रहस्य?

*उगवत्या सूर्याकडे बघा* :
होय, उगवत्या सूर्याकडे बघितल्याने तुमचा मूड बदलू शकतो. झाडांच्या पानांवर पडलेले सूर्य किरणे जे इंद्रधनुष्य निर्माण करतात. तसेच विविध रंगांच्या फुलांवरील सूर्य किरणे पहावी. सकाळी सकाळी होणारा पक्षांचा किलबिलाट ऐकावा. यावेळी नैसर्गिक उजेडात एक स्मित हास्य देऊन सेल्फी काढा. या नैसर्गिक वातावरणात तुमच्या मध्ये उच्च ऊर्जा निर्माण होईल. हा आवाज खूप साधा आहे पण नेहमी साध्या गोष्टी चांगला परिणाम करतात.
   
*चालायला जा, धावा* :
धावायला जा. यावेळी तुमच्या सोबत पाण्याची बाटली, मास्क, ठेवा. पार्क मध्ये नैसर्गिक वातावरणात धावा. जेथे पक्षांचा किलबिलाट असेल. संशोधन सांगते की, हिरवेगार वातावरण तुमच्या मध्ये हार्मोन बदल करतात.

*लहान मुलांबरोबर खेळा* :
लहान मुलांचं हास्य निखळ असते. त्यांना मिठी मारणं, त्यांच्या सोबत खेळणं. यामुळे तुमच्या मध्ये ऑक्स्ट्टोसिन नावाचे संप्रेरक निर्माण होते. जे तुमच्या मनावरील ताणाव दूर करते. तुमच्या भावना यामुळे चांगल्या व्यक्त होऊ लागतात.
   
*तुमच्या आवडीचे काम करा* :
आपल्या वेगवेगळ्या आवडी असतात जसे पोहणे, वाचणे, खेळणे, चित्र काढणे, फोटोग्राफी यामुळे तुम्ही निवांत वेळ घालवता आणि थकवा दूर होण्यास मदत होते. तर तुमच्या आवडीच्या गोष्टी मध्ये वेळ घालवण्याने तुम्ही आनंदी राहता. यामुळे हार्मोन्स निर्माण होण्यास मदत होते.

*योगासन करा* :
योगासांमुळे तणाव दूर होतो, यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टी बद्दल धन्य असता. जीवनात तुम्हाला काय हवे आणि काय नको यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं असतं. याचा तुम्हाला दुहेरी फायदा होतो. एक तर तुमचा तणाव दूर होतो आणि सकारात्मकता तुमच्यात निर्माण होते.
   
*अन्नातून सेरोटोनिन वाढवा* :
सेरोटोनिन या संप्रेरकांमुळे तुमचा मूड चांगला होऊन आनंदी राहतो. तर तुम्ही तुमच्या जीवनातून देखील शरीराला सेरोटोनिन मिळवून देऊ शकता. यामध्ये बिया वर्गीय धान्य, प्रोटीन, मांसाहार तसेच इतर आहारातून तुम्ही सेरोटोनिन मिळवू शकता.

तसेच काही तेलांचा मसाज करण्यासाठी वापर केल्याने देखील शरीराला शांती मिळण्यास मदत होते. यामुळे हार्मोन निर्माण होऊन मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहते. यासाठी तुम्ही लोह देणारे लिंबू वर्गीय फळ खाऊ शकता.
   
निसर्ग आपल्याला खूप काही देतो. नैसर्गिक आणि साधी जीवन पद्धती एक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते.

त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळवायचं असेल तर इतर पर्यायांपेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि तुमच्या मनस्थितीला पुन्हा परत आणणे फायदेशीर ठरू शकते.

हे नेहमी लक्षात ठेवा की, केवळ तुम्हीच स्वतःला आनंदी ठेवू शकता इतर कोणीही नाही !

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

*सौजन्य : लेट्स अप*

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

__________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...