◾माहिती :- ​​पुस्तक वाचनाचे मानसशास्त्रीय फायदे....

​​पुस्तक वाचनाचे मानसशास्त्रीय फायदे📚📖
- प्रा. सुनील शिंदे

1. काळ : एखादी व्यक्ती पुस्तक लिहीते तेव्हा काही महीने ते काही वर्ष ती त्या विषयावर संशोधन, माहीतीची जुळवाजुळव करीत असते, त्या लेखकाचं जगणं, त्याने घेतलेले अनुभव या सगळ्यांच प्रतिबिंब त्या पुस्तकात उमटलेल असतं.
तुम्हीं ते पुस्तक ४ ते ५ दिवसात वाचून काढता तेव्हा खरतर तुम्ही केलेला तो एक काळ प्रवास असतो..

2. संघर्ष : काही वेळेस माणसाला स्वत: समोरील समस्याच मोठ्या वाटत असतात. पण जेव्हा तुम्ही मोठ्या थोर व्यक्तींची आत्मचरीत्र वाचता, त्यांनी केलेला संघर्ष, शोधलेले मार्ग हे जाणून घेता तेव्हा त्यांच्या संघर्षा पुढे आपल्या समस्या खुप लहान आहेत याची जाणीव होते आणि त्यांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास येतो..

3. नशीब : भविष्य जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते निर्माण करणं. एक चागलं पुस्तक सकारात्मक विचारांची श्रूखंला तयार करते, उद्या या विचारांचच क्रूती मध्ये रुपातर होइल. तुम्हीं आज जे काही आहात ते भूतकाळातील तुमच्या विचारांच फलित आहे आणि उद्या तुम्हीं जे असाल ते आज मेंदूत काय विचार आहेत याच फलित असेल. आज केलेल्या सकारात्मक विचारातच चांगल्या नशिबाची बीजं असतात..

4. सर्जनशिलता , तार्कीकता : प्रवास वर्णन, कथा, कादंबरी वाचताना मनामध्ये जी कल्पना चित्रे निर्माण होतात ती जेवढी विविधांगी असतील, तेवढी व्यक्ति फोटोग्राफी, सिनेमेटोग्राफ़ी यासारख्या कलांमध्ये पारंगत होण्याची शक्यता अधिक असते. वाचनामुळे सौंदर्यद्रूष्टी बहरते, तसेच चांगल लिहीण्या आगेदर चांगल वाचलेल ही असाव लागतं.. 
कुठलाही शोध लागण्यापूर्वी त्याच कल्पना चित्र त्या शास्त्रज्ञाने पाहीलेलं असत..

5. मानसिक लवचिकता: कवितेचा अर्थ लावतांना, अवघड लेख समजून घेताना मेंदू मध्ये बरेच बदल होत असतात,दिसत असलेले शब्द आणि त्यामागे लपलेला अर्थ ही सगळी प्रक्रिया होताना मेंदूची जागरूक अवस्था वाढलेली असते. मानसिक लवचिकता असलेली व्यक्ति एखाद्या समस्येचे नाविन्यपूर्ण उत्तर शोधू शकते, स्वत: चे वर्तन आणि परिस्थिति यात चांगल समायोजन साधू शकते.

6. संवाद : काही वेळेस फक्त काहीतरी प्रतिक्रिया द्यायची आहे म्हणून समोरच्या व्यक्तीच ऐकलं जाते, समेारच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे तेच समजलेल नसते यातूनच वाद, विवाद निर्माण होतात, वाचनात एकाग्रता दाखविणारी व्यक्ती दुसर्याच मत ऐकून घेण्यात ही एकाग्रता दाखवू शकते. चांगला वाचक हा चांगला संवाद साधू शकतो.

7. भावनिक बुध्दीमत्ता : कथा कांदबरी वाचत असतांना त्यामधील नायक - नायिकेच्या दु:खात, आनंदात, संघर्षात व्यक्ती एकरूप झालेली असते. यातूनच सहानुभूति विकसित होते. काही काळासाठी का असेना पण त्या पात्राच्या भावना तुम्हीं अनुभवत असता. हे चागंल्या भावनिक बुध्दीमत्तेच लक्षण आहे. संशोधनानूसार चांगला भावनिक बुध्दीगुणांक (EQ) असलेली व्यक्ती ही चांगला बुध्दीगुणांक (IQ) असलेल्या व्यक्तीपेक्षा जीवनात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

8. ताण तणाव: माहिती आणि ज्ञानाचाअभाव हे ताण निर्माण होण्याच एक कारण असते, वाचनाने नवीन माहिती आणि ज्ञानात भर पड़त असते. ज्ञानी माणूस आत्मविश्वासाने नवीन परिस्थिति ला सामोरे जाउ शकतो.

9.मेडीटेशन : पुस्तकाचे वाचन करतांना आणि मेडीटेशन करतांना यादोनही क्रिया घडतांना मेंदूतील क्रियांमध्ये कमालीचं साम्य असल्याच आढळून आले आहे. मेडीटेशन मूळे मिळणारे फ़ायदे जसे रिल्याक्सेशन, आंतरिक शांती हे सर्व वाचनातूनही मिळतात.

10. यश: जीवनात असामान्य यश मिळवलेल्या लोकांमध्ये एक साम्य दिसून येते, ते म्हणजे पुस्तक वाचनाची आवड.
यश आणि पुस्तक वाचनाचा सकारात्मक सहसंबंध दिसून येतो. याच कारण नवीन पुस्तक नवीन प्रकारची माहिती देते. आणि अशी माहिती गुंतवणुकी सारखी  वापरता येते. 

11. संवेदना: असं म्हणतात की पुस्तक न वाचलेला मनुष्य त्याच्या पूर्ण जीवन कालखंडात एकच आयुष्य जगतो त्याचं स्वतःच , तर चांगला वाचक हा त्याच्या एकाच जीवनात हजारो आयुष्य जगलेला असतो. आपण इतरांना जेव्हा चांगलं म्हणतो तेव्हा ते संवेदनशील आहेत असच आपल्याला म्हणायचं असत.

12. एकाग्रता : यशस्वी माणसं एकाच कामावर खूप काळ लक्ष केंद्रित करू शकतात,म्हणून ती यशस्वी असतात, जसं काचेच भिंग हलवत राहील तर कागद जळणार नाही त्यासाठी एकाच ठिकाणी ते स्थिर पकडावे लागते. आजच्या मोबाइल च्या काळात एकाग्र असणं अजुनच कठीण झालं आहे, पुस्तक वाचनाने एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते त्यामुळे व्यक्तीची एकाग्रता वाढते.

📚📖📚📖
- प्रा. सुनील शिंदे

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
    
टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट