◾आरोग्य :- हास्य एक औषध...🥣
😊 हास्य एक औषध...🥣
---------------------------------------
सकारात्मकता हास्याला आमंत्रित करत असते आणि हास्य सकारात्मकतेला. तुमचं आनंदी असणं हे सभोवतालही आनंदी बनवतं. आनंदी राहणं हे आंतरिक समाधान तर देतंच, पण इतरांनाही समाधानी बनवतं. याउलट असमाधान तुमचा चिडचिडेपणा वाढवतं. तुमच्यात क्रोध निर्माण करतं. मग जो माणूस स्वतःच असमाधानी आहे, तो इतरांना काय समाधान देणार या जाणिवेने लोक त्याच्याकडे फिरकतही नाहीत.
आनंद कोठून आणावा लागत नाही. तो आपला आपल्याकडे असतोच. पण मासा जसा पाण्यातच तहानलेला, तशीच माणसाची अवस्था असते. आनंदी राहूनच आपण हवं ते मिळवू शकतो, हे माहिती असूनही माणसं गंभीर आणि पडेल चेहऱ्याने फिरत राहतात. नकारात्मकतेला जवळ करतात. मग अकाली थकतात. अपयशाचे धनी होतात.
खरं तर, कारणापेक्षा जास्त गंभीरपणा हा एक आजारच आहे. तर हसणं हे अनेक आजारावरचं रामबाण औषध आहे. हसणं मानसिक ताणतणाव दूर करतं.एकमेकातले संबंध आनंदी बनवून सामाजिक आयुष्य यशस्वी करतं. जेवण आरोग्यासाठी जितकं महत्त्वाचं, तितकंच हसणंही महत्त्वाचं आहे. हसण्यामुळे शरीरात एंडॉर्फीन नावाचं हार्मोन उत्सर्जित होतं जे शरीरात उत्साह, स्फूर्ती आणि प्रसन्नता आणतं.
मेडिकल सायन्स सांगतं, जर एखादा माणूस दिवसातून पंधरा वेळा हसला, तर तो कधीही आजारी पडणार नाही. यशस्वी आयुष्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संतुलित आहार, शांतता आणि हास्य !
हसणं तुमचं बाह्य व्यक्तिमत्त्व आकर्षित बनवतंच, पण अंतरंगही प्रसन्न करतं. प्रत्येक भावना शब्दाने व्यक्त करता येत नाहीत ; तिथे हास्य फार परिणाम साधून जातं. समोरच्याचा रागही तुमचं हास्य विरघळून टाकतं. हसण्यासाठी फार कष्ट आणि खर्चही करावा लागत नाही. रागासाठी 49 पेशी काम करतात. पण हसण्यासाठी 17 पेशीच लागतात. म्हणजे हसणं रागावण्यापेक्षा अडीचपट सोपं आहे.
हसण्यासाठी एक क्षणही पुरेशा असतो. हसण्यासाठी काही घडलं आणि घडवलंच पाहिजे असंही नाही. हसणं आणि स्मित करणं यात थोडा फरक आहे. स्मित करणं ही केवळ मनाची क्रिया आहे, तर हसणं ही शरीर आणि मन या दोहोंची . मोकळेपणाने हसणे ही सर्वोत्तम क्रिया आहे. हसण्याने शरीरपेशीमध्ये ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा प्रवाह सुरू होतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. शरीरातील अतिरिक्त मेद नष्ट होतो. शरीरातील जी 90 % ऊर्जा मनाला लागते ती हसण्यातून निर्माण होते. त्यामुळे मनात प्रसन्नता राहते. प्रसन्न मन हेच नवनवीन कल्पनांचं, शोधाचं, कार्याचं उत्तम निर्मितीस्थान असतं.
जी माणसं सर्वोत्तम यशस्वी ठरलीत, ती कायम आनंदी आणि हास्यमयी असतात. ती यशस्वी ठरली म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं असं नव्हे; तर ती कायम हसतमुख आणि आनंदी होती, म्हणून यशस्वी ठरली, हे खरं !
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा