◾ललित लेख :- सायकल

नवीकोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दुर खेळत असलेली सायली धावतच तिच्या जवळ आली.
"माझी नवी सायकल,माझी नवी सायकल"
सायकलवरुन हात फिरवताफिरवता सायली उद्गारली.
नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता.समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली.पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती.लोकांची धुणीभांडी करुन साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता.दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं.सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता.

 दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असतांना सायली सायकल घेऊन शाळेत गेली.अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता.सात दिवस सगळं व्यवस्थित सुरु होतं.आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली.पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सागितलं.पार्वतीच्या काळजात धस्स झालं.पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं.शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही. कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेली.
" साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंम्प्लेंट द्यायची होती" ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भितभितच ती बोलली.त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहीलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला "कशाची चोरी झालीये?"
त्याच्या खेकसण्याने सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मुळूमुळू रडू लागली.
"सायकल साहेब.सायकलची चोरी झाली"
"खरेदीची पावती आहे का?"
तिनं पावती दिली.त्याने एक रजिस्टर काढलं.
"व्यवस्थित शोधली का सगळीकडे?खोटी कंप्लेंट चालणार नाही"त्याने दरडावून विचारलं
"हो साहेब.सगळीकडे शोधली.पण नाही सापडली"
" ठिक आहे.सांगा आता"
पार्वतीनं सायकलीचं आणि कधी,कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला  सागितलं.त्यानं लिहून घेतलं.तिचा पत्ता,मोबाईल नंबर घेतला. सही घेतली.
" जा आता घरी.सायकल मिळाली की कळवू तुम्हाला"
तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला.
त्याचा रुक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली. तीच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली.
"ताई आपण साहेबांना भेटू.हा मेला काहीच करणार नाही" पार्वतीलाही ते पटलं.धीर धरुन ती त्या पोलिसाला म्हणाली
" साहेब आम्हांला मोठ्या साहेबाला भेटायचंय"
त्यानं एकदम डोळे मोठे केले.जोराने ओरडून तो म्हणाला.
"ए चल.निघ इथून.साहेबाला भेटायचं म्हणे.साहेब भेटणार नाही.साहेब बिझी आहेत.लिहीली ना कंप्लेंट?जा आता घरी" 
तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलिस बाहेर आला.बहूतेक तोच साहेब असावा.
" काय आरडाओरड चालवलीय पाटील.काय झालं?" 
"साहेब ते...."पाटील तंबाखू लपवू लागला.तेवढ्यात साहेबाची नजर पार्वती आणि सायलीवर पडली.तो काय समजायचं ते समजला असावा.
" या बाई तुम्ही आतमध्ये" 
तिघीही भितभित चेंबरमध्ये शिरल्या.
"हं सांगा आता काय झालं ते!"
पार्वती परत एकदा सांगू लागली.तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला.फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता.सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते.फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं.
" तुम्ही काय करता?"
"साहेब मी लोकांची धुणीभांडी करते.त्यातुन मिळालेल्या पैशातूनच ती सायकल घेतली होती.."
"आणि तू गं मुली?तू शाळेत जातेस का?"
पार्वतीचं बोलणं पुर्ण होऊ न देताच साहेबाने सायलीला विचारलं.
सायलीने मान हलवली.
"कितवीत आहेस?"
"पाचवीत "हलक्या आवाजात तिनं सांगितलं.तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात गढून गेला.पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं.बराच वेळाने साहेबाचं बोलणं संपलं.त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला.
"ठिक आहे.या तुम्ही.मी बघतो काय करायचं ते"
"पण साहेब...."ती काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं.इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखाने तिचं मन भरुन आलं.

घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खुप रडली.एकुलती एक पोर.खुप समजदार होती.आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडिल नाहीत याची तिला पक्की जाण होती.तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती.पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतांनाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती.

दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जातांना बघून पार्वती च्या काळजाला असंख्य भोकं पडली.चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटत होतं.पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष सहज लागणार होती.आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरुन येत होते.

पोलिस कंप्लेंट करुन एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही.पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयरसुतक नव्हतं.ती दोनतीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली.शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसतेय का याचाही तिने शोध घेतला.पण सायकल कुठेच सापडत नव्हती.
पोलिस तक्रार करुन पंधरा दिवसही उलटूनही जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्वती समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्य नाही.आजुबाजुचे शेजारीही तिला तेच समजावत होते.पण मन मोठं वेडं असतं.कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल "ताई तुमची सायकल सापडली "असं तिला वाटत रहायचं.

विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं.तिनं उघडलं.बाहेर एक पोलिस उभा होता.
"पार्वताबाई तुम्हीच का?"
"हो"
"या बाहेर" 
तिचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं.बाहेर पोलिसांची व्हँन उभी होती.व्हँन पाहून शेजारपाजारचे जमा झाले.पोलिस व्हँनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला.
"ही घ्या तुमची सायकल"
"साहेब पण ही आमची सायकल नाही"
"ते मला माहीत नाही.साहेबांनी पाठवलीये.तुम्ही साहेबांना भेटा.त्यांनी बोलावलंय तुम्हाला"
व्हँन निघून गेली.पार्वतीभोवती गर्दी जमा झाली.ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलीपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती.सात-आठ हजाराची असावी.बरेच जण तिच्याकडे असूयेने बघत होते.सायलीची तर नजर हटत नव्हती.ती सारखी सायकलवरुन हात फिरवत होती.
"आई ही सायकल आपल्याला दिली?"
"बेटा आपली सायकल नाहीये ती.उद्या जाऊन साहेबाला विचारु आपण"
जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या.एका बाईने तर हद्द केली.पार्वतीवर साहेबाची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल म्हणे.ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं.ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली.सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली.रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्नं पडत होती.

दुसऱ्या दिवशी ती कामं आटोपून सायलीला घेऊन पोलिस स्टेशनला गेली.नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता.
"या ताई,बसा" मनमोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचं स्वागत केलं.त्याच्या ताई म्हणण्याने तिच्या मनातलं किल्मिश बरंच कमी झालं.
" साहेब तुम्ही जी सायकल पाठवलीत ती आमची नाहीये"
तिनं विषयाला हात घातला.
"हो.बरोबर.मला कल्पना आहे.तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला.पण ती मिळाली नाही.आणि ती मिळणारही नव्हती.चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करुन एका तासात विकूनही टाकले असतील."
"पण मग साहेब ही नवी सायकल....."
" कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते!पोलिसांना काय गरज पडलीये चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची?असंच ना?ही सायकल मी माझ्यातर्फे दिलीय.आणि ती का दिली आहे ते पण सांगतो" 
टेबलावरची बेल वाजवून त्याने शिपायाला बोलावलं
"या ताईंकरीता एक चहा आणि या मुलीकरता एक कँडबरी घेऊन ये.तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात.तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण आली.ती माझ्यामागे सायकल घेऊन देण्याकरीता हट्ट करायची पण तिचं घर हायवेजवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो.दुर्दैव बघा ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा म्रुत्यु झाला. सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती, कदाचित नाही.पण तिच्या म्रुत्युनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो.तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली. तुम्हांला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं.भाचीची इच्छा पुर्ण करु नाही शकलो.कमीतकमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं.खुप मोकळं वाटतंय आता" 
एक श्वास सोडून त्याने सायलीला जवळ बोलावलं.तिला जवळ घेऊन म्हणाला.
"बेटा ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट.आणि हो कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का!"
"साहेब तुमचे आभार...."
"नाही ताई आभार नका मानू.मीही गरीबीतूनच वर आलोय.गरीबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो.माझ्या आईनं मोलमजूरी करुनच मला मोठं केलंय.तुम्हीही तुमच्या मुलीला खुप शिकवा.मोठं करा"
पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
© दीपक तांबोळी
    9503011250
(ही कथा माझ्या खालील "कथा माणुसकीच्या " या पुस्तकातील आहे.)


असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद



ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट