◼️ यशाचा मंत्र :- ध्येयावर लक्ष केंद्रित करणे | yashacha mantra

😊“आज सकाळी (Jogging) फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती,  बहुदा रोज नियमाने चालत असणार.

निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.

मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती...

थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून....

आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!

हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये..

मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.

मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...

असेच होते ना आयुष्यात सुद्धा..? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण  पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.

मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.*

या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.

कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.

कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच.तेव्हा लक्ष आपल्यावर,आपल्या ध्येयावर केन्द्रित करावे

सुप्रभात👏

 ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुह मध्ये सहभागी व्हा

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट