तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक *ज्ञानेश्वरी* जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली.
मी पुस्तके वाचायला सुरुवात केली तेव्हा काय वाचायचं हे ठरवलं नव्हतं. सार्वजनिक वाचनयालात जे समोर येईल ते वाचत गेलो आणि हळहळू मराठी साहित्याचा मोठा खजिना हाती गवसला. सुरुवात झाली होती *पॅपिलॉन* नावाच्या पुस्तकापासून. हेन्री शॅरीयर नावाच्या एका फ्रेंच गुन्हेगाराने हे पुस्तक लिहिलं. हेन्रीला गुन्हेगारी जगतात पॅपिलॉन नावाने ओळखत असत. तो फार मोठा गुन्हेगार नव्हता. पण त्याच्यावर खुनाचा खोटा आळ आला आणि त्याला फ्रेंच गियानामधील कुप्रसिद्ध जेलमध्ये धाडण्यात आलं. तिथे त्याला कठोर कारावास भोगावा लागला. आपल्यावर खोटा आळ टाकणार्यांना धडा शिकवायचा, त्यासाठी जेलमधून पाळायचं आणि पुन्हा फ्रान्सला जायचं हे त्याने ठरवलं. त्याचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अत्यंत जिद्द, धाडसाच्या बळावर तो पळाला. ही सगळी कथा त्याने स्वतः लिहिली आणि रवींद्र गुर्जर ह्यांनी ती मराठीत आणली. ह्या पुस्तकाने शिकवलं की जीवनात केव्हाही अडचणी येऊ शकतात आणि त्याला तोंड द्यायला साहस, दुर्दम्य आत्मविश्वास ह्याची गरज असते. संघर्ष हा दर पावलाला येत असतो आणि त्याला तोंड देत जिद्दीने लढायचं असतं.
साहस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचा विषय निघतो तेव्हा सावरकरांचं *''माझी जन्मठेप''* पुस्तक विसरता येत नाही. सावरकरांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. एक जन्मठेप होती २५ वर्षांची. म्हणजे सावरकर ५० वर्षानंतर जेलमधून बाहेर येणार होते. थोडक्यात जिवंत बाहेर येण्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षा ऐकून ते डगमगले नाहीत. त्यांनी ब्रिटिश सरकारला ऐकवले. तुम्ही फार काळ भारतात राहू शकणार नाही. त्यामुळे माझी शिक्षा लवकर संपेल. इतका दुर्दम्य आत्मविश्वास फक्त तेच दाखवू शकतात. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात गेल्यावर त्यांची कठोर बारीशी गाठ पडली, शारीरिक-मानसिक यातनांना सुरुवात झाली. दिलेल्या भांड्यात संडास करावी लागे. स्वतःच्या कोठडीत लघुशंका केल्यावर त्याचा वास घुमत राही. इतकी भयंकर प्रतिकूलता असूनही ते हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते. जगताना आपल्यावर संकटे येऊ शकतात आणि आपण त्यांवर मात करू शकतो हे शिकायचं असेल तर *'माझी जन्मठेप'* वाचायलाच हवे. क्रांतिकारकांनी जे भोगले त्या तुलनेत आपल्या वाट्याला जर काही प्रतिकूल परिस्थिती आली तर ती काहीच नाही हे जाणवू लागते.
जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील मी वाचलेलं एक आहे *डेझर्टर!* गंथर बाहनमन हा जर्मन सैनिक होता. त्याची लिबियामध्ये नेमणूक झाली होती. हिटलरसाठी तो लढत असताना त्याच्या वडिलांना नाझी सैनिकांनी फासावर चढवले. म्हणून त्याने सैन्य सोडण्याचे ठरवले. जर्मनीला जाऊन आईला भेटायचे त्याचे स्वप्न होते. पण त्याचा प्रवास सोपा नव्हता. सैन्यातून पळाल्यामुळे त्याला ठार केले जाऊ शकत होते. तरीही तो जर्मन आणि त्यांचे दोस्त असलेल्या इटालियन सैन्याला झुकांड्या देत पळत राहिला आणि अखेर शत्रूच्या म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीत सापडला. ब्रिटिशांच्या कैदेत असताना तो इंग्लिश शिकला आणि त्याने हे पुस्तक लिहिले.
विजय देवधरांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. त्यापैकी बरीच पुस्तके साहसावर आधारित आहेत. ही सगळी पुस्तके आपल्याला धाडस करायला उद्युक्त करतात. रवींद्र गुर्जरांनी अनुवादित केलेल्या *'सत्तर दिवस'* पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एक विमान दुर्गम पर्वतामध्ये कोसळले आणि त्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांनी जगण्यासाठी जी धडपड केली, ती ह्या पुस्तकात दिली आहे. ह्या प्रवाशांनी बर्फाळ प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मेलेल्या सहप्रवाशांचे मास कापून खाल्ले. अखेरीस त्यांचा शोध लागला आणि त्यांची सुटका झाली. ज्यांना जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी जगण्याचा टोकाचा प्रयत्न कसा असतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे. ही सत्यकथा आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही जगण्याची प्रेरणा देतं. जगण्यासाठी अनेकांची कशी धडपड चालते हे जाणून घ्यायचे तर *'मला निसटले पाहिजे'* हे पुस्तकही वाचावे. रशियाने काही ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले होते. ह्या सैनिकांनी पळून जाण्यासाठी जे प्रचंड धाडस केले तो ह्या पुस्तकाचा विषय आहे. कैदेतून पाळल्यावर हे सैनिक रशियापासून भारतापर्यंत चालत आले. इथे ब्रिटिशांची सत्ता होती. भारतात आल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा इंग्लंडला पाठवतील, हे ओळखून त्यांनी अत्यंत थंड प्रदेशातून उपास तापास सहन करून भारतापर्यंत चालत प्रवास केला. भारताच्या सीमेवर ते ब्रिटिश सैन्याकडे आले आणि त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माणूस प्रसंगी जीवावर उदार होतो, असंख्य अडथळे पार करतो हे या पुस्तकातून शिकता येते. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती बहुमोल आहे ते कळते. तसेच एक सैनिक देशासाठी किती झटत असतो तेही कळते.
भारतामध्येही अनेक चरित्रकथा लिहिल्या गेल्या. *'लंडनच्या आजीबाई'* हे पुस्तक त्यापैकी एक आहे. इंग्रजांच्या काळात विदर्भात राहणारी राधाबाई वनारसे ही विधवा दारिद्र्य भोगत होती. मुलींचं पोषण करणं अशक्य झालं होतं. ती दुसरा विवाह करून इंग्लंडला राहायला गेली. दुर्दैवाने दुसऱ्या पतीचेही निधन झाले. पुन्हा दारिद्र्य आले. इंग्लिश भाषा येत नव्हती. ती अशिक्षित होती. तरीही इंग्लंडमध्ये राहून तिने खानावळ चालवली आणि लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या. पु. ल. देशपांडे, अत्रे, यशवंतराव चव्हाण लंडनला गेले की तिच्या खानावळीत जात असत. अत्रेंनी तर तिचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यामुळे लंडनही महाराष्ट्राचा भाग व्हायला पाहिजे. हे पुस्तक वाचकाला आशावादी बनवते, संघर्ष करण्याची प्रेरणा देते. कितीही संकटे आली तरी श्रम करून संकटे दूर करता येतात, यश मिळवता येते, हे या पुस्तकातून शिकता येते.
काही पुस्तके जगायला शिकवतात तर काही पुस्तके का जगायचं हे शिकवतात. जीवनातील विसंगतीकडे पाहून हसता येते हे पु. ल. देशपांडेंची पुस्तके शिकवतात आणि असे दिलखुलास हसता येते हाच जीवनातील मोठा आनंद आहे हे या पुस्तकातून कळते. "चाराणे खाल्ले तर चौकटीची टोपी घालून डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाखो रुपये खाल्ले तर लोकनियुक्त प्रतिनिधी बनवतात'' हा त्यांचा विनोद अनेक वर्षे उलटली तरी अजूनही खरा ठरतो. ''असा मी असामी'' आजही सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे. आचार्य अत्र्यांची पुस्तकेही अशीच हसवतात. द. मा. मिरासदार, रमेश मंत्री यांचीही पुस्तके करमणूक करतात. शं. ना. नवरे, व. पु. काळे छोट्या कथेमधून खूप काही सांगून जातात. व्यंकटेश माडगूळकर आणि रवींद्र पिंगे ह्यांचे ललित लेख तर फार वाचनीय असतात. माडगूळकरांनी त्यांच्या गावाचे खुमासदार वर्णन केले आहे आणि पिंगेंनी स्वतः केलेल्या भटकंतीवर विपुल लेखन केले आहे. हे लेखन आपल्याला आसपास पाहायला प्रवृत्त करते. जीवन चहूबाजूने खूप काही दाखवत असते. आपण आपल्या छोट्या समस्या, रोजचे रडे बाजूला सारून हा आनंद घ्यायला हवा हे त्यांची पुस्तके शिकवतात.
कथा, चरित्रकथा अनेक शब्दातून व्यक्त होतात. पण कविता मोजक्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगून जाते. आशावाद, सकारात्मकता कशी असावी हे मंगेश पाडगावकरांच्या *'या जन्मावर, या जगण्यावर'* च्या शेवटच्या कडव्यातून शिकता येते. पाडगावकरांनी लिहिले आहे,
या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी...
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
आपण जगताना अनंत यातना सोसतो. प्रसंगी मरणही झेलून घेतो. तरीही पाडगावकर लिहितात की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण पुरामध्ये पिंपळ पानावरुन तरून गेला तसे हे विश्वही तरणार आहे. आसपास अनेक नकारात्मक प्रसंग घडताना हा आशावाद मनाला खूप उभारी देतो. आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीशी उभं राहणं. एखाद्याने नुसता धीर दिला तरी मोठ्या संकटांवर मात करता येते. कुसुमाग्रजांची *"कणा"* कविता हेच शिकवते. कुसुमाग्रजांकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आहे. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याचं घर उध्वस्त झाले आहे. तो येतो आणि म्हणतो,
*"ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,*
*कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.*
*क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,*
*‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.*
त्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं. पण त्या पाण्याला नाव न ठेवता तो त्याला गंगामाई म्हणतो आणि पुढे सांगू लागतो.
*"माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,*
*मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.*
*भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,*
*प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.*
*कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे,*
*पडकी भिंत बांधतो आहे,* *चिखलगाळ काढतो आहे"*
कुसुमाग्रजांनी त्याला मदत म्हणून काही पैसे देण्याचा विचार केला. पण त्याने ते नाकारले. कुसुमाग्रज लिहितात,
*खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,*
*‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.*
*मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,*
*पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!*
पूरग्रस्त झालेला हा विद्यार्थी खूप मानी आहे. त्याला पैसे नकोत, फक्त सरांकडून धीर हवा आहे. सरानी पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणावे इतकीच त्याची इच्छा आहे!! कुसुमाग्रजांची ही कविता अनेकांच्या स्मरणात राहिली ती फक्त हव्या असलेल्या धीरासाठी!
मराठी पुस्तकांची ही खासियत आहे. ही पुस्तके जगायला बळ देतात. जणू पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असतात. म्हणून आपल्या संग्रही पुस्तके असावीत. आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत. कारण संपत्ती मिळालेली पिढी पंगू होते तर पुस्तके मिळालेली पिढी सक्षम बनते. पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणारी पाब्लो नेरुडाची कविता आहे,
If you do not travel,
If you do not read,
If you do not listen to the sounds of life,
You start dying slowly
जर तुम्ही प्रवास करत नसाल, पुस्तक वाचत नसाल, जीवनाचे रंग अनुभवत नसाल तर तुम्ही हळूहळू मरत आहात....
✏ कविता समूह क्र ७ चे संकलन 📚' मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ 🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏 🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व माझ्यासाठी अनमोल आहे हे आनंदी जीवनाच्या वाटेवर सुखासवे मी चालू पाहे !! लाख संकटे जरी आली सोबतीने आपण मात करू जगाच्या या बाजारामध्ये प्रेमाची आपण देवघेव करू!! भिती कुणाची मग ना उरे आत्मविश्वासाने चालू हासत खेळत जीवन सारे आनंदाच्या गोष्टी बोलू !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह. ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ Next poem वेदना वेदना सहन करुनी नऊ महिन्याचं केला गोळा दर महिन्याच्या वेगळ्या कळा आता सोसवेना भार तिला जन्मा आली मुलगी झाली बापाच्या कपाळी रेखा उमटली कस करू मी आता लेक झाली हुंडा लकेर समोर दिसू लागली लेक चालू लागली,बोल...
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो...
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . .. . या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे - wings of fire ... टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण पाठवा __________________________________________ .
🚩 राधेय/१ 🚩 लेखक - रणजित देसाई माथ्यावरचा सूर्य थोडा कलला होता. त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती. पण त्या सूर्यकिरणांची तमा न बाळगता कर्ण अपराह्ण काळी आपली सूर्योपासना पुरी करीत होता. गंगेच्या पाण्यात उभा राहुन, दोन्ही हात उंचावून तो पूजामंत्र म्हणत होता. पैलतीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले, तरी त्याचे भान कर्णाला नव्हते. तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता. रूपसंपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता. कर्णाने आपली सूर्योपासना पुरी केली. नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली, ‘कोणी याचक आहे?’ तीन वेळा कर्णाने हाक दिली. पण पाठीमागून साद आला नाही. कर्णाने हाती घेतलेले जल गंगेत सोडले. गंगाजल नेत्रांना लावून तो वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली वस्त्रे परिधान केली, पादत्राणे घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला. अचानक त्याची पावले थांबली. गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्णरथाकडे कर्णाचे लक्ष व...
वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे मी सर्वांसाठी समर्पित करीत आहे. ..... १) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात २) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. ३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. ४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. ५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो ६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो . ७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. ८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. ९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. १०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. ११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो १२) खर्च केल्याचे दुःख नसते हिशोब ...
शब्दरूपं आले....मुक्या भावनांना. व्यक्तं होणं....मग ते शब्दांतून असो स्पर्शातूनं असो डोळ्यांतून असो वा असो फक्त श्वासांतून...... वा सहवासातून. व्यक्त होणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं... शब्दातून व्यक्त होणं व्हा व्यक्त होण्याचा खरा "राजमार्ग" आहे...मात्र बऱ्याच वेळा शब्दं फुरंगटून बसतात....भावना रुसूनं बसतात...आणि मग होत राहते घुसमट....मनातल्या मनात थिजलेल्या या अबोल अशा क्षणांची...शब्दांची! सुरू होते घालमेल...मनातल्या स्वप्नांची. पण अचानक कधीतरी.... एका निवांत क्षणीं होतो साक्षांत्कार... नि शब्द घेवू लागतात मनासारखा आकार...आणि साकारू लागते भावभावनांची अनोखी अशी मूर्ती जी क्षणांत बोलू लागेल आणि मुक्या मुक्या झालेल्या भावनांही शब्दरूप घेवू लागतील... आपण मनुष्य प्राणी खूप भाग्यवानं आहोत की आपल्याला "भाषेचं" हे 'अमूल्य दान' ईश्वराने दिलेलं आहे.भाषा ही एखाद्या नदी सारखी प्रवाही असते..जी कायम खळाळतं राहते.नदीचं हे खळाळणं...आणि भाषेचं उच्चारणं हे कानाला नेहमीचं मधुर वाटत राहतं.याच भाषेच्या उच्चारातून घडत राहतो तो संवाद..इतर कोणतेही प्रा...
--- उपकार कुणावर करावे --- 🟣 बोधकथा 🟣 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने...
"• कुठल्याही क्षेत्रात "लीडर" जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात." "लीडर" मध्ये हे खालील गुण असणे आवश्यक आहेत... >> सदर लेख ₹२ मधे खरेदी करून वाचा ₹१discount << . . . .
✏ कविता समूह क्र ७ चे संकलन 📚' मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ 🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏 🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व माझ्यासाठी अनमोल आहे हे आनंदी जीवनाच्या वाटेवर सुखासवे मी चालू पाहे !! लाख संकटे जरी आली सोबतीने आपण मात करू जगाच्या या बाजारामध्ये प्रेमाची आपण देवघेव करू!! भिती कुणाची मग ना उरे आत्मविश्वासाने चालू हासत खेळत जीवन सारे आनंदाच्या गोष्टी बोलू !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह. ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ Next poem वेदना वेदना सहन करुनी नऊ महिन्याचं केला गोळा दर महिन्याच्या वेगळ्या कळा आता सोसवेना भार तिला जन्मा आली मुलगी झाली बापाच्या कपाळी रेखा उमटली कस करू मी आता लेक झाली हुंडा लकेर समोर दिसू लागली लेक चालू लागली,बोल...
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो...
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . .. . या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे - wings of fire ... टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण पाठवा __________________________________________ .
--- उपकार कुणावर करावे --- 🟣 बोधकथा 🟣 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने...
"• कुठल्याही क्षेत्रात "लीडर" जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात." "लीडर" मध्ये हे खालील गुण असणे आवश्यक आहेत... >> सदर लेख ₹२ मधे खरेदी करून वाचा ₹१discount << . . . .
वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे मी सर्वांसाठी समर्पित करीत आहे. ..... १) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात २) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. ३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. ४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. ५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो ६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो . ७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. ८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. ९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. १०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. ११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो १२) खर्च केल्याचे दुःख नसते हिशोब ...
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली. उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांड...
🚩 राधेय/१ 🚩 लेखक - रणजित देसाई माथ्यावरचा सूर्य थोडा कलला होता. त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती. पण त्या सूर्यकिरणांची तमा न बाळगता कर्ण अपराह्ण काळी आपली सूर्योपासना पुरी करीत होता. गंगेच्या पाण्यात उभा राहुन, दोन्ही हात उंचावून तो पूजामंत्र म्हणत होता. पैलतीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले, तरी त्याचे भान कर्णाला नव्हते. तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता. रूपसंपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता. कर्णाने आपली सूर्योपासना पुरी केली. नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली, ‘कोणी याचक आहे?’ तीन वेळा कर्णाने हाक दिली. पण पाठीमागून साद आला नाही. कर्णाने हाती घेतलेले जल गंगेत सोडले. गंगाजल नेत्रांना लावून तो वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली वस्त्रे परिधान केली, पादत्राणे घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला. अचानक त्याची पावले थांबली. गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्णरथाकडे कर्णाचे लक्ष व...
✏ कविता समूह क्र ७ चे संकलन 📚' मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ 🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏 🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व माझ्यासाठी अनमोल आहे हे आनंदी जीवनाच्या वाटेवर सुखासवे मी चालू पाहे !! लाख संकटे जरी आली सोबतीने आपण मात करू जगाच्या या बाजारामध्ये प्रेमाची आपण देवघेव करू!! भिती कुणाची मग ना उरे आत्मविश्वासाने चालू हासत खेळत जीवन सारे आनंदाच्या गोष्टी बोलू !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह. ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ Next poem वेदना वेदना सहन करुनी नऊ महिन्याचं केला गोळा दर महिन्याच्या वेगळ्या कळा आता सोसवेना भार तिला जन्मा आली मुलगी झाली बापाच्या कपाळी रेखा उमटली कस करू मी आता लेक झाली हुंडा लकेर समोर दिसू लागली लेक चालू लागली,बोल...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊...
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . .. . या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे - wings of fire ... टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण पाठवा __________________________________________ .
वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे मी सर्वांसाठी समर्पित करीत आहे. ..... १) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात २) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. ३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. ४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. ५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो ६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो . ७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. ८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. ९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. १०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. ११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो १२) खर्च केल्याचे दुःख नसते हिशोब ...
🚩 राधेय/१ 🚩 लेखक - रणजित देसाई माथ्यावरचा सूर्य थोडा कलला होता. त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती. पण त्या सूर्यकिरणांची तमा न बाळगता कर्ण अपराह्ण काळी आपली सूर्योपासना पुरी करीत होता. गंगेच्या पाण्यात उभा राहुन, दोन्ही हात उंचावून तो पूजामंत्र म्हणत होता. पैलतीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले, तरी त्याचे भान कर्णाला नव्हते. तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता. रूपसंपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता. कर्णाने आपली सूर्योपासना पुरी केली. नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली, ‘कोणी याचक आहे?’ तीन वेळा कर्णाने हाक दिली. पण पाठीमागून साद आला नाही. कर्णाने हाती घेतलेले जल गंगेत सोडले. गंगाजल नेत्रांना लावून तो वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली वस्त्रे परिधान केली, पादत्राणे घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला. अचानक त्याची पावले थांबली. गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्णरथाकडे कर्णाचे लक्ष व...
--- उपकार कुणावर करावे --- 🟣 बोधकथा 🟣 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने...
"• कुठल्याही क्षेत्रात "लीडर" जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात." "लीडर" मध्ये हे खालील गुण असणे आवश्यक आहेत... >> सदर लेख ₹२ मधे खरेदी करून वाचा ₹१discount << . . . .
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली. उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांड...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा