🔴🔴 धोक्याची घंटा वाजत आहे पारंपारिक उद्योगांपैकी ७०% उद्योग पुढील १० वर्षात बंद पडतील. जगभरामध्ये टेक्नॉलॉजी, बाजारपेठेचे स्वरूप, संशोधन, ग्राहकांचा माइंडसेट इतक्या वेगाने बदलत आहे की आज चालणारा उद्योग, प्रॉडक्ट, ब्रॅंड उद्या चालेल का, हे सांगू शकत नाही. मी कोणालाही कोणतातरी उद्योग पुढील काही दशके चालेल व करा, असा सल्ला देत नाही. तीन ते पाच वर्षात झटपट धंदा करा किंवा पैसे कमवा. पुढील जगात काय होईल सांगता येत नाही. ब्लॅकबेरी, नोकिया, राजदूत गाडी, अँबेसिडर, लँडलाईन फोन, एसएमएस, ऑरकुट, रेडिफ/याहू मेल, सीडी, कॅसेट, टाईप राईटर अशी शेकडो उत्पादन बंद झाली, कारण ती काळानुसार बदलली नाहीत. माझ्या अंदाजानुसार येत्या १० वर्षात काय बदल होतील? पूर्णवेळ कार्यालये पध्दत बंद होईल. त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील. फुड होम डिलिव्हरी वाढेल व रेस्टॉरंटचा धंदा ६०% कमी होईल, ब्युटीपार्लर ही घरपोच सेवा होईल. घरपोच ऑनलाईन हेल्थ सेवा सुरू होणाऱ्या कंपन्या निघतील व मोठी फी घेणारे डॉक्टर व टोलेजंग हॉस्पिटलचे दिवाळं निघेल. शिक्षण ऑनलाईन होईल. भव्य ईमारती असणाऱ्या शिक्षण संस्था खंडर बनतील