◾पर्यटन :- कंधार जवळील नैसर्गिक पर्यटनासाठी ५ निसर्गमय ठिकाणे... | kandhar | weekend travel
पर्यटन कोणास आवडत नाही, प्रत्येक जण निसर्गावर प्रेम करतो. म्हणून मी आज आपल्या कंधारकरांसाठी खास काही आपल्या कंधार मधील नैसर्गिक ठिकाणे सांगत आहे,आपल्या ला माहिती नसतील तर नक्की वाचा आणि एकदा तरी नक्की पर्यटनाचा आनंद घ्या! कंधार जवळील नैसर्गिक पर्यटनासाठी निसर्ग मय ठिकाणे... सदर ठिकाणे मला माहीत आहे म्हणून लिहिले आहेत तुम्हाला काही ठिकाण माहीत आहे तर नक्की सांगा, कमेंट् बॉक्स मधे नक्की कमेंट् करा...
१.कंधारचा किल्ला :-
विशेष :- राष्ट्रकूट घराण्याची राजधानी असलेला राष्ट्रकुट राजा कृष्ण देवराय यांच्या हस्ते बांधलेला कंधारचा किल्ला हा आपल्यासाठी एक आपल्या पूर्वजांची ऐतिहासिक भेटच आहे हा किल्ला येत्या हजार सालापासून अजूनही तसाच भक्कम ताट उभा आहे ह्या किल्ल्यावर आपणाला किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेले खंदक तसेच राष्ट्रकूट घराण्याचे शिल्पशैली वास्तुकला इत्यादी बारकाईने पाहायला मिळेल
कधी जायचे : हा किल्ल्यावर बाराही महिने जायला काही हरकत नाही
२.कड्याचा महादेव :-
विशेष :- महादेवाचे प्रसिद्ध देवस्थान आणि तसेच एक नैसर्गिक ठिकाण , हे ठिकाण कुरूळ्याच्या पूर्वेस पाच किमीच्या अंतरावर आहे. आणि हे ठिकाण खरेच एक दुसरा स्वर्गच आहे एका उंच माळाच्या पायथ्याशी झाडे वेलाने नटलेले नदीच्या किनारी असलेले महादेवाचे पाषाणे मंदिर आहे. हे ठिकाण महादेवाच्या दर्शनासाठी व मनाच्या आनंद म्हणजेच पर्यटनासाठी खूपच सुंदर / योग्य ठिकाण आहे कड्याचा महादेव इतर दर शिवरात्री एक छोटेखानी जत्रा ही भरलेलीच असते
कधी जायचे :- जाण्यासाठी योग्य वेळही बाराही महिने जाऊ शकतो पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काही औरच मौज असते
विशेष :- एक तळे आणि त्यात कमळाचे फुले .असे म्हटले तर नेहरूनगर साठी वावगे ठरणार नाही, नेहरूनगर हे कृषी विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे येथे दुरदुरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. येथे मुलांच्या वस्तीगृहाच्या पाठीमागे च गावच्या वस्तीला लागून हे तळे आहे...यात पांढरीशुभ्र कमळाचे फुले नेहमी मी एस.टी मधून जाताना बघत असायचो. परंतु मला कधी हे जवळून पाहण्याचा योग आला नाही... आता जर कमेंट मध्ये कोणी योग्य माहिती दिली तर नक्की जाऊन येईल
कधी जायचे :- मी पण ह्या तळ्यावीषयी ऐकून व लांबून पाहिले आहे मला याविषयी अधिक माहिती नाही... माफ करावे
कृपया आपणास ऋतू विषयी अधिक माहिती असेल तर नक्की कमेंट करा
४.उम्रज-बोरी :-
विशेष :- संत नामदेव महाराज यांच्या आर्शिवादाने पावन झालेली भूमी म्हणजेच 'उम्रज-बोरीच' .येथे गावाच्या मध्यभागी उंच डोंगरावर संत नामदेव महाराज यांचा मठ आहे . मुख्य व्दारातून मठात प्रवेश करता क्षणीच एक अंगात वेगळीच शक्ती संचारते . पाषाणी बांधकाम असलेले हे मंदिर खूप च नयनरम्य झाडा वेलाने वेढलेले मंदिर आहे... महाराजांच्या दर्शन स्थळी आयुष्यात एकदा नक्की भेट आपल्या प्रतेकानं दिलीच पाहिजे...
कधी जायचे :- वर्षाच्या बाराही महिने आणि विशेषतः गुरू पोर्णिमेच्या वेळी येथे जत्रा भरते या वेळी नक्की भेट द्यावी
विशेष :- डोंगर-दऱ्या चढ-उतार वळणावळणाचा रस्ता अश्या रस्तात कुणाला आवडत नाही प्रवास करायला ... नक्कीच असाच आहे काही हा थोडाफार रस्ता . पावसाळ्यात ह्या रस्त्याने प्रवास करायला काही औरच मजा येते... मी तर प्रवास केला आहे तूम्ही केले आहे का? नाही तर एकदा नक्की प्रवास करा, आनंद घ्या!
कधी जायचे :- अखंड पावसाळा ते हिवाळा कधीही
वरील माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते पण सांगा आणि महत्वाचा हा लिंक शेअर करायला विसरू नका
खूपच छान��✊��
उत्तर द्याहटवा