◾व्यवसाय मंत्र :- रु.२०,०००/- वीस हजार
रु.२०,०००/- वीस हजार हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात "एअरटेल" नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं. कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला. आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फो