◾कविता :- आयुष्य... | shital babasaheb shinde
जगायला वेळ नाही
जगतो आहोत पण
कशासाठी हेच माहित नाही
धाव धाव धावत आहोत
पण दिशाच कळत नाही
सर्वकाही करत आहोत
पण कोणासाठी माहिती नाही
एक क्षण येईल असा
घेऊन जाईल हा श्वास
आपला अर्ध्यामधी थांबलेला
असेल हा जीवन प्रवास
आणखी पण वेळ आहे
थोडं तरी जगून घ्यायला
सुंदर अशा जगाला
डोळे भरून बघायला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा