कर्ण भाग - 3

 🚩 *राधेय/३* 🚩

कर्ण दोनप्रहरी आपल्या महालात विश्रांती घेत होता. शेजारी वृषसेन बसला होता.

‘तात.’

‘हं!’

‘कृष्णमहाराज केव्हा येणार?’

‘कृष्णाच्या नावाबरोबर कर्णाने वृषसेनाकडे पाहिले.

कृष्ण जाऊन आठ दिवस झाले होते, तरी त्या बालमनातून कृष्णाची आठवण जात नव्हती.

कर्णाची अवस्थाही तीच झाली होती.

‘सांगा ना, तात!’

‘वसू, ज्या वेळी आपल्या दैवी आनंद लिहिलेला असतो, त्याच वेळी अशा माणसांचं दर्शन, सहवास घडतो... अन् दैवी काय लिहिलं, ते कोण सांगणार?’

वृषसेनाला काही समजले नाही. तो काही विचारणार, तोच त्याचे लक्ष मागे वळले.

दारातून वृषाली आत येत होती. ती कर्णशय्येजवळ येत म्हणाली,

‘आपल्या भेटीसाठी कुणीतरी आलंय्’.

‘कोण?’

‘सांगा, पाहू!’

‘हस्तिनापुराहुन शत्रुंजय आला असेल.’

‘अंहं!’ नकारार्थी मान हलवीत वृषाली म्हणाली.

‘मग वृषकेतु!’

‘नाही.’

‘मग उत्तर देणं फार सोपं आहे. माझा मित्र, सखा चक्रधर आला असेल.’

वृषाली थक्क झाली. तिने विचारले,

‘आपण कसं ओळखलंत?’

‘मला न भेटता सरळ तुझ्यापर्यंत पोहोचणारे तिघेच. आपले दोन पुत्र आणि चक्रधर. कुठं आहे चक्रधर?’

दाराआड उभा असलेला चक्रधर आत आला. कर्णाने उठून त्याला मिठी मारली. चक्रधर हसत, नम्रतेने नमस्कार करीत म्हणाला, ‘अंगराज, आपला सेवक आपल्याला वंदन करतोय्.’

‘वत्सा, तुला अभय आहे. पण, मित्रा, तू आलास, हे फार बरं झालं.’

‘चांगली बातमी घेऊन आलो नाही मी.’

‘काय झालं?’

‘काल रात्री तस्कर फार मोठ्या संख्येनं आले आणि त्यांनी सारं गोधन चोरून नेलं.’

वृषालीने विचारले, ‘सर्व गोधन?’

‘हो! एकही गाय शिल्लक राहिली नाही. रात्रीचा समय असल्यानं आपल्या दळाला पाठलागही करता आला नाही.’

‘तुम्ही गेला नाहीत?’ वृषालीने विचारले.

‘मी सांगितलं ना, वहिनी! रात्रीची वेळ होती. वैरातक मद्यानं धुंद असलेला मी पाठलाग कसा करणार?’

कर्ण मोठ्याने हसत होता.

वृषाली संतापाने म्हणाली, ‘आपलं गोधन लुटलं अन् हसता काय?’

‘आपलं हसू आवरीत कर्ण म्हणाला,

‘या माणसाच्या बोलण्यावर भरवसा ठेवू नकोस. गोधन लुटलं गेलं असतं, तर हा सांगायला आला असता का? दुसरं गोधन लुटून आणून मगच ती वार्ता सांगायला तो इथं अवतरला असता.’

चक्रधर आणि कर्ण दोघेही हसत होते.

वृषाली कृत्रिम रागाने म्हणाली, ‘असली कसली थट्टा!’

‘थट्टा हा तर त्याचा जन्मजात स्वभाव! वृषाली, आश्रमात याच्या भट्टेनं! सारे त्रासून जायचे. एकदा आम्ही रानात गेलो होतो. परत येताना हा पुढं आला अन् राधाईला मी विहिरीत पडलो, म्हणून सांगितलं.’

‘अन् मग?’

‘राधाईनं आकांत मांडला. तशी ही स्वारी भ्याली; पण तेव्हा सारं हातांबाहेर गेलं होतं. तो प्रकार चालू असता मी तिथं गेलो. साऱ्यांच्या ध्यानी खरा प्रकार आला अन् नंतर आपल्या गुणांमुळं तातांकडून चाबकाचा मार या वीरानं सोसला; पण तरीही सवय सुटली नाही.’

वृषाली मोकळेपणे हसली.

‘वहिनी, आज आम्ही निघणार.’

‘कुठं?’

‘गोधन पाहायला. आता आठवडाभरात जनावरं चराईला बाहेर पडतील. ती यानं पाहायला हवीत.’

‘चक्रधर, तू असता मी कशाला पाहायला...’

‘अंहं! माझ्यासाठी नव्हे; पण गोधन-रक्षणासाठी जे असतात, त्यांना वर्षातून एकदा तरी राजाचं दर्शन घडायला हवं. या निमित्तानं मृगयाही होईल.’

कर्णाने नि:श्वास सोडला. तो वृषालीला म्हुणाला, ‘याच्यापुढं इलाज नाही. पण, मित्रा, एवढ्या तातडीनं निघणं होणार नाही. उद्या पहाटे आपण निघू.’

‘मी येऊ?’ वृषसेनाने विचारले.

‘तिथं आईचं बोट धरून चालायचं नसतं. घोड्यावरून दौड करावी लागते, म्हटलं,’ चक्रधराने वृषसेनाला चिडवले.

‘त्या मुलाला कशाला रडवतोस?’ कर्ण वृषसेनाला जवळ घेत म्हणाला, ‘वसू, तू मोठा झालास, की तुला नेईन हं.’

वृषसेनाने मान डोलावली आणि तो कर्णाला अधिकच बिलगला.

✍️ *क्रमश* ✍️

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...