प्रवास वर्णन : पं.नरेंद्र मोदींचा बर्लिन दौरा ....

🙏🏻दिव्यत्वाची जेथे अनुभूती तेथे कर माझे जुळती🙏🏻

एप्रिल च्या सुरुवातीलाच अचानक संध्याकाळी रवींद्र जी चा फोन आला आणि कळले की आपले सर्वांचे लाडके, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी २ मे ला बर्लिन ला येणार आहेत. मनात म्हंटले, भारतात सुरक्षा कारणाने महाकठीण असले तरी इथे जर्मनी मध्ये राष्ट्रकार्यासाठी आपल्या प्रेरणास्त्रोत असलेल्या, राष्ट्रहिताय निरंतर तत्पर असणाऱ्या ह्या भारत मातेच्या सच्च्या भक्ताची आपली नक्की भेट होणार. महिनाभर मनात हुर हुर होतीच आणि म्हणता म्हणता तो २ मे उजाडला.

कार्यक्रमा करता विविध आयोजन दृष्टीने कामे करायला बर्लिन च्या भारतीय दूतावासाने स्वयंसेवक (म्हणजे संघाचा स्वयंसेवक नव्हे हं!! शुद्ध मराठी मध्ये सांगायचे तर व्हाॅलेंटिअर) म्हणून नोंदणी करून घेतली होती. अर्थात मी पण त्या कार्यक्रमा करता एक व्हाॅलेंटिअर होतो. 

मोदी जी सकाळी सहा वाजता येणार आहेत तेंव्हा मोदी जी चे स्वागत आणि भेट म्हणून सर्व नोंदणीकृत व्हाॅलेंटिअरनी सकाळी ५:३० च्या आधीच त्यांच्या नियोजीत विश्राम गृही पोहोचावे असे सांगण्यात आले होते. एवढ्या सकाळी पोहोचायचे म्हणजे एक दिवस आधीच बर्लिन ला येऊन ठेपलो होतो. सकाळी ४ वाजता च उठून तयार होऊन पोचलो कसाबसा धावत पळत. माझ्या सारखा एरव्ही लेट लतिफ असणारा, त्या दिवशी चक्क वेळेत होतो. 

विश्राम गृहा च्या स्वागत कक्षात आम्हाला आत सोडायला थोडा अवकाश होता. भारतीय समाज माध्यमांचे प्रतिनिधी जसे की आजतक, इंडिया टिव्ही, न्यूज १८, झी आणि वियोन जणू आमच्या स्वागताला बाहेर च उभे होते. एन डी टीव्ही सारखे नमोरुग्ण चॅनल तिथे नव्हते हा ही आनंदाचा भाग होता. कश्यपांची अंजना अक्षरशः इकडून तिकडे नाचत नाचत सर्वांची मुलाखत घेता घेता अचानक जवळ आली, कुठून आलात आणि किती खुश आहात अशी बाई ने उत्साहात चौकशी केल्यावर म्हंटले मी ब्राऊनश्व़ाईग वरून आलोय आणि अर्थातच खूप खुश आहे की मोदीजी भेटणार, बिलकुल त्यांच्या स्वागता करता च आलो आहे आणि लगेच आपल्या भसाड्या आवाजाची प्रचिती द्यायची स्फूर्ती मिळाली आणि म्हंटले मोदीजी चे स्वागत आम्ही असे करू : भारsssssssत माता की जय अश्या पद्धतीने तिच्या समोर भारत माते चा त्रिवार जयजयकार केला. माझ्या जयजयकार करण्या मध्ये पण एक वेगळी उर्मी आहे असे काही मित्रांनी प्रशंसा करत म्हंटले आणि त्याची लगेच पावती म्हणजे, इंडिया टिव्ही चा कॅमेरामन आला आणि मला म्हणाला की तुम्ही नारा खूप छान देता, तेंव्हा जरा माझ्या करता मी एक दोन तीन म्हंटले की नारेबाजी करा. मग काय पुन्हा जोरदार खणखणीत आवाजात भारत माता की जय आणि वंदे मातरम् झाले. शिशु गणा पासून संघ स्वयंसेवक असलो की नारेबाजी मधली उर्मी सुद्धा लोकांच्या लक्षात येण्या इतपत सिद्धीस पावत असावी. हा प्रसंग माझ्या पिल्लू ने टीव्ही वर बघितला होता आणि माकडा सारखे गाल फुगवून, बाबा तू भारsssssssत माता की जय अस म्हणाला ना अशी नंतर फोन केला तेंव्हा तिने नक्कल करून दाखवली. असो. तर शेवटी विश्राम गृहा च्या स्वागत कक्षात प्रवेश देणे सुरू झाले.

आत मध्ये असे लक्षात आले की काही व्हाॅलेंटिअर नी स्वतःची "सेटिंग" (शुद्ध मराठीत सांगायचे तर सेटिंग च!! शेवटी भाषा हे संस्कृतीचे प्रतिबिंब च नव्हे काय; आणि आपल्या संस्कृती मध्ये चुकीच्या कामा साठी शब्दांची वानवा, हो ना!!!?? ) करून घेतली असून मोदीजी बरोबर वेगळ्या एका खोलीत आधिकारिक छायाचित्रकारा कडून त्यांच्या बरोबर छायाचित्र काढून घेणार आहेत. ज्यांनी ज्यांनी तिथे सेटिंग केली होती त्यांच्या पैकी काही जण माझ्या ओळखीचे असल्या मुळे मी पण त्यांच्या करवी माझी पण सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण नावे आधीच दिल्या गेली असल्या मुळे मला सुरक्षा रक्षकांनी प्रवेश दिला नाही. त्या मुळे थोडे मन खट्टू झाले होते. 

पण आता काय करता!!?? इतर सामान्य व्हाॅलेंटिअर मध्ये माझ्या बंधू भगिनीं समवेत रांगेत उभा झालो. भारत माता की जय, वंदे मातरम्, मोssssदी - मोssssदी अशी नारेबाजी लोकांची चालू होती. आणि मी खट्टू अवस्थेत शांत उभा होतो. 

स्वागत कक्षा च्या काचेच्या दारातून समोरील मांडव आणि त्या नंतर असलेला रुंद रस्ता दिसत होता.एका विशेष सुबक सुंदर अश्या हातगाडीतून लाल गालीचा आणण्यात आला. हिंदी चित्रपटात "तुम्हे तीन गुना लगान देना होगा" अशी गोऱ्या कलाकारांच्या तोंडची वाक्य सुद्धा आपलं रक्त उसळून आणत, अश्या विचारांच्या मला, अचानक चक दे इंडिया चा एक क्षण आठवला ज्यात एक गोरा भारताचा ध्वज आरोहण करत असतो आणि ते बघून चित्रपटाचा नायक खुश होत असतो, कारण इथे पण एक गोरा आपल्या मोदीजी करता लाल गालिचा स्वतःच्या हाताने आंथरत होता.

आsssणि, शेवटी म्हणता म्हणता तो क्षण आला.

डग डग डग करत जर्मन पोलिसांच्या बुलेट चा ताफा समोरून गेला. मागाहून काळया रंगाची मर्सिडीज दारा समोर आली आणि सिंह गुहेतून डरकाळी देत बाहेर यावा त्या प्रमाणे "मोदीजी - सत्तरी मध्ये असलेला तरुण सिंह", एकदम शानदार पद्धतीने बाहेर आलेत. रामदास स्वामींनी शिवराया करता "शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे" अश्या ज्या ओळी लिहून ठेवल्या आहेत त्याचीच आठवण झाली. खरं तर १७ वर्षा पूर्वी मोदी जी मुख्यमंत्री असताना त्यांच्या जाहीर भाषणा ला जाण्याचा योग आला होता पण प्रधानमंत्री झाल्या पासून हे पहिलंच दर्शन होत.

त्यांच्या चालण्या बोलण्या वर जे भाळलो ते नंतर त्याच्याशी हस्तांदोलन होई तोवर सांभाळलो च नाही. 

जसा मोदींनी स्वागत कक्षात पाय ठेवला त्या नंतर च्या कर्मेंद्रिेया च्या क्रिया ह्या झाल्या, मी केल्या नाही; असेच म्हणावे लागेल, बर का!!??

टवटवीत, प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा, कडक कटाक्ष, दाढी मिशी टापटीप, काळसर रंगाचा झब्बा, त्यावर साजेशी शाल, स्वच्छ शुभ्र पायातले आणि छान पॉलिश बुट असे सगळे रूप बघून मन थक्क होते.जेट लॅग फेट लॅग असा कुठला ही थकवा चेहऱ्यावर नाही. सत्तरी मधल्या त्या तरुणाची अशी मूर्ती पुढे सरकू लागली.

त्या भारत मातेच्या निस्सीम भक्ताला समोर पाहताच बेंबीच्या देठापासून "भारssssssssत माता की" अशी नारेबाजी माझ्या आवाजाच्या सर्वोच्च पातळी वर माझ्या वाणीतून सुरू झाली. 

भगवंता समोर इंद्रिय विषयांच्या गोष्टी मागू नये उलट, देवाला त्याचीच भक्ती, त्याचे च दर्शन, सद्गुरू भेट, नित्य आनंदाने उपासना असे मागावे. ह्याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी देवळात देव दर्शना आधी कासव ठेवला असतो. त्याचे चार पाय, आणि शेपूट ही पांचेंद्रिये आणि तोंड म्हणजे मन, तो जसा त्याच्या आवरणा खाली घालतो तसे देवासमोर आपणही हे सर्व आवरणा खाली घालून वरील प्रमाणे मागणे मागावे असे काही से आता पर्यंतच्या श्रवण भक्तीतून समजले आहे. बरीच मंडळी मोदी जी ना बघून त्यांच्या तोंडावर त्यांच्याच फोटो किंवा ते जवळ येताच त्यांच्या कडे चक्क पाठ करून सेल्फी घेणारी मी बघितली. वरील तत्वज्ञानात त्यांना बसवायचे तर ते विषय मागणारे होते. "मी", "माझ्या बरोबर चा सेल्फी" इत्यादी अहंकार युक्त गोष्टी त रमलेली. पण माझ्या बाबतीत निदान वरील प्रमाणे ऐकीव ज्ञान त्या वेळे पुरते का होईना, प्रत्यक्ष आचरणात आले. माझ्या जवळ ते येतील तेंव्हा सेल्फी किंवा निदान आमचा एकत्र फोटो कोणी घेत आहे की नाही हा विषय किंचित सुद्धा मनाला शिवला नाही. मोदी जी ची आणि आपल्या सर्वांची च, आराध्य दैवत असलेल्या भारत मातेच्या जयजयकारात रमून गेलो. 

मोदीजी जवळ येताच हातांची ओंजळ झाली आणि म्हणता म्हणता मोदी जी नी माझ्या जवळ येऊन चक्क ती ओंजळ हातात घेतली. फक्त एक सेकंद पुरते ते हस्तांदोलन झाले. मी भारत माते च्या जयकारा मध्ये एवढं रमलो होतो, शिवं भुत्वा शिवम् भजेत असे काहीसे जे ऐकले आहे तश्या प्रमाणे, चक्क मोदी जी शी हस्तांदोलन चालू असताना सुद्धा भारत माता की जय हा जयजयकार चालूच होता. एक सेकंद. 

केवळ एक सेकंदा च ते हस्तांदोलन
पण आयुष्य भराची आठवण!!

त्याचे वर्णन करायचे तर कबीर च्या दोह्या ची मदत घेतो

चार मिले , चौसठ खिले,
बीस रहे कर जोड
हरिजन से हरिजन मिले,
तो बिंहसे सात करोड .

जेंव्हा हरी चे दोन भक्त, दोन संत, एकाच देवतेची दोन भक्त एकमेकास भेटतात तेंव्हा जरी ती एकमेकाला लौकिक अर्थाने ओळखत नसले तरी आपण दोघे सम विचारी आहोत आपण दोघे एकाच उपासना मार्गावर आहोत हे ते दोघे एकमेकांना बघून ओळखून घेतात. आणि मग त्यांची भेट म्हणजे;

दोघाचे डोळ्यात डोळे म्हणून "चार मिले", दोघे ही मनापासून एक मेकाला निखळ हास्य देतात म्हणून प्रत्येकाची बत्तिशी प्रमाणे "चौसठ खीले", हाताला हात मिळाल्या मुळे वीस बोटाचे मिळणे आणि प्रत्येकी साडे तीन करोड रोम रोम मध्ये हर्ष होणे म्हणून "बिहसे सात करोड" असे कबीर जी नी वर्णन करून ठेवले आहे.

तो क्षण म्हणजे केवळ आनंद. निस्सीम आनंदाची ती सेकंद भर वेळेची ची अनुभूती. 

अगदी ह्याच शब्दात त्या भेटीचे चे वर्णन करता येईल.

हो.. कोरोना काळात सुद्धा हस्तांदोलन होऊ शकते!! जेंव्हा वरील प्रमाणे हरिजन हरिजन ची भेट होते ना, तेंव्हा!! प्रत्यक्ष हस्तांदोलन होणाऱ्या पैकी खात्रीशीर पद्धतीने बोलू शकतो की मी आणि माझा स्वयंसेवक बंधू कल्किन हे दोघेच भाग्यवान.

बस.....मोदीजी पुढे सरकले आणि मगाशी म्हंटले प्रमाणे जे रमणे, आनंदमय होणे वगैरे सर्व अध्यात्मिक ज्ञानाच्या दुनियेतून खाडकन सामान्य संसाराच्या दुनियेत बाहेर आलो. "मी आणि माझ्या बरोबर सेल्फी" अश्या विषयात परत गुंतलो. 

अरे समोर मोदी जी असताना आपण नाव सांगू शकलो असतो, तुमचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणू शकलो असतो, मी मोहिते शाखेचा स्वयंसेवक आहे आणि तुम्ही एक स्वयंसेवक असून आता विश्व नेता आहात ह्याचा मला खूप आनंद आहे असे म्हणू शकलो असतो इत्यादी इत्यादी हजारो विचार क्षणात येऊन गेले. माझी स्वयंसेविका भगिनी, सई, जी माझ्या बाजूला उभी होती ती म्हणते अरे ते स्वागत कक्षात आले तेंव्हा तुझ नारे देणं ठीक होत पण हस्तांदोलन करताना सुद्धा!!?? तुझी सिस्टीम हँग झाली होती वाटतं!!! खरच सिस्टीम हँग झाली होती असेच म्हणावे लागेल.

एक पाऊल मागे सरकलो.

इथून पुढच्या कर्मेंद्रिये च्या सर्व क्रिया पूर्ववत पद्धतीने मी च करत होतो बरं!!

माझा दुसरा स्वयंसेवक बंधू गणेश ह्याच्या "आशुतोष" ह्या लहान मुला जवळ मोदीजी थांबले होते. तो गोड गुटगुटीत सहा वर्षाचा मुलगा अतिशय सुंदर, हेवा वाटावा अश्या पद्धतीने 

हे जन्म भूमि भारत। हे कर्म भूमि भारत।
हे वंदनीय भारत। अभिनंदनीय भारत।। ध्रु ।।

जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे।
तेरी जनम जनम भर हम वंदना करेंगे। 
हम अर्चना करेंगे।। १।।

महिमा महान तू है। गौरव निधान तू है।
तू प्राण है हमारी। जननी समान तू है।।
तेरे लिए जिएंगे। तेरे लिए मरेंगे।
तेरे लिए जनम भर, हम साधना करेंगे।।
हम अर्चना करेंगे।। २।।

असे संघाच्या शाखेत शिकेलेल देश भक्तीपर गीत गात होता. मोदीजी त्याला मनापासून साथ देत होते अगदी पायाचा ठेका देत आणि हाताने चुटकी चा ठेका देत होते. इथे सेल्फी काढण्याची चांगली संधी होती म्हणून थोडे जवळ गेलो. अर्थात माझ्या सारखा विचार करणारे बरेच लोक तिथे होते आणि त्या गर्दीत सेल्फी काही बरोबर येणार नाही ह्याची जाणीव झाली. आशुतोष खरच मन लावून गीत म्हणत होता आणि मग त्याची श्रवण भक्ती करत चेहऱ्या च्या हाव भावाने प्रशंसा करत तिथेच थांबून राहिलो. मोदी जी नी आशुतोष गातानाची चित्रफीत त्यांच्या स्वतःच्या फेसबुक वर टाकली आणि मी नेमका त्या वेळ ला तिथे असल्या मुळे कळत नकळत मला पण प्रसिद्धी च्या लाटेवर स्वार होता आले. बऱ्याच मित्र मंडळी ने मला हा फोटो पाठवला आणि त्यांचे अप्रूप वाटणे व्यक्त केले.

मोदीजी पुढे सरकले आणि मग इतर सर्व मंडळी शी भेटून त्या सेटिंग केलेल्या स्वयंसेवकांच्या खोलीत गेले. तिथे त्या लोकांचा फोटो झाला आणि लगेच तिथून पुढे त्यांच्या शासकीय कामा करता आत गेले. तिथे त्या लोकांना वैयक्तिक हस्तांदोलन करण्याची संधी लाभली नाही. त्या मुळे सुप्त अहंकार जागा झाला आणि टुक टुक माकड....मला तर हस्तांदोलन करता आले तुम्हाला तर नाही... ओ ओ असा बालिश आनंद झाला. 

झाले!!! सकाळ चा कार्यक्रम इथे संपला होता. आम्ही आमच्या विश्राम गृहा कडे रवाना झालो.

त्यानंतर तिथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते. त्यात 

इंद्र जिमी जंभ पर।बाडव सुअंभ पर।
रावण सदंभ पर । रघुकुल राज है।।

ह्या कवी भूषण विरचित गाण्यावर एक नृत्य रुपी नाटिका आमच्या च शाखेतील रश्मी आणि कल्याणी करणार होत्या. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार होता माझा स्वयंसेवक बंधू कल्किन.

त्या नाटिके मध्ये दोन लोक मावळे म्हणून काम करणार होते. त्यांना फक्त भगवा ध्वज हातात घेऊन इकडे तिकडे मिरवणे एवढा छोटासा च भाग होता. त्या दोघा पैकी एक जण ऐन वेळेवर काही कारणाने सहभागी होणार नाही असे कळल्यावर कल्किन ने माझ्या कडे विचारणा केली. शिवरायांची नाटिका, ती सुद्धा ब्रँडेनबूर्ग टोर ह्या ऐतिहासिक स्थळी!! वाह,....मी नकार देण्याचा प्रश्न च नव्हता. एका च काय चक्क अर्ध्या पायावर तयार झालो. केवळ एक तास आधी ज्या काय छोट्या मोठ्या स्टेप्स वगैरे होत्या त्या पटकन शिकून घेतल्या आणि सिद्ध झालो. ऐन वेळेवर सगळे असल्यामुळे कल्किन नी आणलेला कुर्त्या ला बटणे नाहीत हे तेंव्हा लक्षात आले, मग काय, शेपटी पिन असते की सगळ्या भगिनी कडे. त्याने काम चालवले.

प्रत्यक्ष नाटिका सुरू होण्या आधी, ब्रँडेनबूर्ग टोर, ह्या ऐतिहासिक स्थळी आपली संघाची शाखा पण घेण्याचे ठरले होते. आपल्या जर्मनी मध्ये एकूण १४ शाखा आहेत. मोदी च्या जाहीर कार्यक्रमाला विविध शहरातून अनायासे तिथल्या तिथल्या शाखांचे कार्यकर्ते आलेच होते. बर्लिन शाखेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्या दृष्टीने ह्या विशेष शाखेचे आयोजन केले होते. ध्वज दंड तर होता पण त्याचा स्टँड घाई घाई मध्ये विसरलो होतो. मग काय, असल्या छोट्या मोठ्या अडचणी ना चिंता करत बसेल तो स्वयंसेवक कुठला!!?? स्टँड चा जुगाड केला. स्वयंसेवकां च्या बॅक पॅक, अंगा वरचे जॅकेट ह्याच्या सहायाने ध्वज दंडा चा स्टँड तयार झाला. पद्धतशीर रीतसर प्रार्थना वगैरे करत शाखा छान पार पडली. ए बी पी, इंडिया टिव्ही आणि अंजना बाई ने शाखे चे छायाचित्रण तर केले पण पुढे त्यांनी त्याबद्दल वाच्यता केली नाही असे दिसते. पी एम ओ ने मात्र आधिकारिक रित्या टिव टिवाट केला. त्यांनी त्यांच्या ट्विटर वर चक्क शाखेचा फोटो सामायिक केला. त्या वरील सेक्युलर मंडळी च्या कॉमेंट नक्की वाचा....नुसता धूर निघतोय ते जाणवेल. असो.

आता नाटिका सुरू होणार, इतक्यात सांगण्यात आले की मोदीजी त्यांच्या विश्राम गृहातून शासकीय कामा साठी बाहेर जातायेत. तिथे असलेले लेझिम पथक, ढोल पथक आणि आमचा शिवाजी राजा ह्याला पुढे या पुढे या करत काही व्हाॅलेंटिअर मंडळी विश्राम गृहा च्या मुख्य प्रवेश द्वारा पाशी घेऊन गेली. म्हंटले... ओ भाऊ,महाराज एकटे कसे जाणार,त्यांच्या सोबतीला मावळे पाहिजे ना राव,असे म्हणून छान संधी साधत महाराजां बरोबर मी पण पुढे गेलो. उजवी कडे ढोल पथक, डावी कडे लेझिम पथक आणि मध्य भागी महाराज आणि मावळे अश्या छान श्या रचने मध्ये आम्ही उभो होतो. मोदी जी ची पुन्हा एकदा जवळून भेट होणार.....मज्जा ना.....असा एकदम लहान मुला सारखा आनंद झाला. ढोल आणि लेझिम च्या सुर ताला ला मोदी जी बाहेर येताच नैसर्गिक द्रुतगती प्राप्त झाली. बाहू स्फुरण पाऊन मी पण हातातील ध्वज ढोल च्या तालावर जोर जोरात फडकवत होतो. मोदीजी बरोब्बर शिवाजी महाराजां जवळ येऊन थांबले आणि तिथून सर्वांना दोन्ही हात वर करून अभिवादन करत होते. हाऊ इज द जोश असा तिथे कोणी विचारले असते तर आम्हा तरुण मंडळी चा तर हाय जोश होता पण मोदी जी चा जोश सुद्धा स्काय हाय होता. आमच्या महाराजांच्या म्हणजे कल्किन च्या खांद्यावर हात ठेवून वाह वाह किप इट अप अशी शाबासकी दिली मोदी जी नी. आमचे महाराज मोदी जी ना सांगू लागले की आम्ही वोल्फस्बूर्ग वरून आलो असून इथे अशी अशी छोटी नाटिका करणार आहोत. मोदी जी चक्क कान देऊन ऐकून घेत होते. त्यात मी पण चांस पे डान्स करून च घेतला. मोदी जी ना म्हंटले हे आमचे शिवाजी राजे आणि आम्ही त्यांचे मावळे बर का. स्मित हास्य देत मोदीजी नी नमस्कार करत मला अभिवादन केले. 

कल्किन आणि माझ्या आनंदाला तर पारावर च उरला नव्हता. 

जगी सर्व सुखी असा कोण आहे 
आम्ही दोघे जे मोदी जी च्या पुढे उभे आहे
समर्थांच्या ह्या प्रश्नावर माझे त्या क्षणापूर्ते का न सही पण निःसंशय उत्तर असेच राहिले असते. 

मज्जा नी लाईफ असे म्हणतात ना आगदी तसेच काहीसे बराच वेळ वाटत होते. झाले....मोदीजी पुढे निघाले आणि पुन्हा आम्ही मंडळी काय मज्जा आली यार....वगैरे वगैरे गोष्टी करत नाटिका होणार होती तिथे येऊन पोहोचलो. नाटिका छान पार पडली. कश्यप बाई ने तर तिच्या न्यूज बाईट करता एका कडव्यावर , वन्स मोर दिला आणि आम्ही परत थोड्या वेळ तिच्या तालावर नाचलो. 
छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव च्या घोषणा देत आमच्या दिवस भराच्या नाटकाचे आता मध्यंतर झाले होते!!

संध्याकाळी मुख्य कार्यक्रम होता तो म्हणजे मोदी जी च्या जर्मनी स्थित भारतीय समुदाया ला संबोधन करण्याचा. त्यात १८०० लोक अपेक्षित होते आणि आता व्हाॅलेंटिअर चे खरे काम होते. लोकांच्या जमावाचे नियमन करणे, त्यांना पद्धतशीर रित्या सभागृहात सोडणे आणि विठोबा झाल्यावर पोटोबा करता समोसे आणि पाणी वाटप करणे. माझ्या सारख्या खादाडा ची नेमणूक स्वाभाविक पणे समोसे वाटप केंद्रावर झाली. कार्यक्रम सुरू होण्या पूर्वी सर्व डब्बे, पाणी इत्यादी ची व्यवस्थित रचना लावून ठेवणे हे काम होते आणि शेवटी लोक बाहेर येतील तेंव्हा वाटप. 

इथे कामे आटोपल्यावर सभागृहात जाऊन बसलो. भारत माता की जय, वंदे मातरम् , मोदी मोदी आणि नवीन नारा ट्वेन्टी ट्वेन्टी फोर मोदी वन्स मोर अशी जोरदार नारेबाजी चालू होती. निर्मला सीतारामन जी, सध्या गोऱ्या लोकांना खडे बोल सुनावणारे एस जयशंकर, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे जितेंद्र जी आणि आपला भारतीय जेम्स बाँड अजित दोभाल जी चे आगमन झाले. निर्मला जी नी पण नारेबाजी केली. थोड्या वेळात पिवळसर कुर्त्या मध्ये लालसर रंगाची मॅचींग दुपट्टा घेतलेले मोदी जी व्यासपीठ वर आले. नारेबाजी आधिक च जोर जोरात सुरू झाली. काही वेळाने मंडळी शांत झाल्यावर आपल्या खणखणीत आवाजात त्यांच्या विशेष शैली मध्ये किती तरी वेळा टाळ्यांचा कडकडाट प्राप्त करत मोदीजी चे अत्यंत प्रभावी आणि आव्हानात्मक उद्बोधन सुरू झाले. साधारण ४५ मिनिटे त्यांचे बोलणे अविरत चालू होते.

मी दिवस भर इकडे तिकडे नाचत असल्या मुळे थकलो होतो आणि भाषण चालू असताना दोन चार मिनिटांची चक्क डुलकी पण काढली. 

इथे मला आवर्जून हे सांगावस वाटेल की त्या दिवसाची माझी आणि मोदी जी च्या दिनचर्ये ची तुलना केली तर लक्षात येईल की आम्ही दोघे ही रात्री ची झोप नीट नसून सुद्धा आपापल्या कामात विना उसंत मग्न होतो. पण हा सत्तरी मधील तरुण अजून सुद्धा उर्जे नी परिपूर्ण होता आणि मी चाळिशी मधला म्हातारा मात्र डुलक्या देत होतो. खरंच कुठून मिळत असेल त्यांना ही ऊर्जा. भारतीय जन मानसाचे भरभरून प्रेम ह्या व्यक्ती ने प्राप्त केले आहे. एवढी लोकप्रियता इतर कुठल्या ही नेत्या ला नाहीच. 

ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक मुद्दा ध्यानात घेण्या सारखा असा की, प्रचंड ध्येय निष्ठा, ही उर्मी, ही ऊर्जा त्यांना प्रदान करत असते. प्रत्येक कृती निष्काम कर्मयोग्या प्रमाणे केवळ आणि केवळ देव देश आणि धर्मा साठी केली जाते ना तेंव्हा ही अशी ऊर्जा सहज मिळत असावी, असे आता आगदी खात्रीशीर पणे मी बोलू शकतो. समाज कल्याणासाठी ज्याचे आयुष्यातील प्रत्येक क्षण वेचणे चालू आहे ना त्या व्यक्ती ला भरभरून प्रेम आपुलकी आदर मिळणारच. बरं एवढं दिवस भर काम करून करून दुसऱ्या दिवशी कॅजूअल सुट्टी टाकतो किंवा सिक लिव तरी मारतो असे पण नाही. लगेच डेन्मार्क, पॅरिस ला तिथल्या राष्ट्राध्यक्ष मंडळी, व्यवसायी मंडळी शी भेट घेऊन तिसऱ्या दिवशी भारतात परत दाखल सुद्धा.

संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार जी च्या बाबतीत गीत गायले जाते की "ध्येय आया देह लेकर". "परम् वैभवं नेतु मे तत् स्वराष्ट्रं" ह्याच ध्येयाने डॉक्टर जी झापटले होते आणि हा सत्तर वर्षाचा तरुण स्वयंसेवक सुद्धा संघ प्रार्थनेत म्हंटल्या प्रमाणे, अक्षय ध्येय निष्ठा सतत स्फुरत ठेवून डॉक्टर जी चे तंतोतंत अनुसरण करतो आहे ह्यात शंका नाही.

खरंच...🙏🏻दिव्यत्वाची जेथे अनुभूती तेथे कर माझे जुळती🙏🏻.

अमेय केळकर
११.०५.२०२२


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट