अदृश्य बाप

वाघ हा नेहमी एकटा राहणारा प्राणी. त्यात मादी एकटी आपल्या पिलांचे संगोपन करते हे नेहमीच पाहण्यात आलेलं.

अशाच एका जंगलात जेमतेम पाच-सहा महिन्यांचे दोन बछडे असलेली एक वाघीण वनाधिकाऱ्यांना अचानक मृतावस्थेत सापडली. तिच्या इतक्या छोट्या पिल्लांचं काय होईल या चिंतेने अधिकारी त्या पिल्लांचा शोध घेऊ लागले. पण ती काही सापडेनात.

अखेर दोन आठवडे गेल्यानंतर मात्र आता ती जिवंत नसणार या खात्रीने शोध थांबवण्यात आला.

अजून दोन आठवडे गेले आणि अचानक त्यातला एक बछडा एका अधिकाऱ्याला दिसला. आईविना, अजून शिकार करता न येणारी ही पिल्लं जिवंत कशी याचं आश्चर्य वाटून त्यांनी त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी गुंगारा दिला. मग ठिकठिकाणी Night vision motion sensor trap कॅमेरे बसवले गेले.

एका कॅमेऱ्यात दिसलं की एका नर वाघाने रात्रीच्या वेळेस त्यांना शिकार आणून दिली. तो काहीवेळा त्यांच्या सोबत थांबला आणि मग निघून गेला.

तो त्यांचा बाप होता! आईविना पिलांची काळजी घेत होता. अधिकारी हे पाहून अक्षरशः चाट पडले.

🐾

सिंह हा जरी कळपाने राहणारा प्राणी असला तरी प्रसूतीची वेळ आली की सिंहीण कळपापासून वेगळी होते. एखाद्या सुरक्षित, गुप्त जागी ती पिलांना जन्म देते, काही महिने ती एकटीच त्यांचे संगोपन करते आणि योग्य वेळी पिलांसोबत परत येऊन कळपात दाखल होते.

गर्भभाराने जडावलेली, प्रसूतीच्या वेदनांनी शिणलेली ही सिंहीण एकटी कशी काय शिकार करू शकते, नक्की काय खाते याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी एकदा जागोजागी कॅमेरे लावले.

त्यात एके ठिकाणी दिसलं की मध्यरात्री कळपाचा प्रमुख नर सिंह एकटाच एक मोठी शिकार आपल्या प्रिय पत्नीसाठी घेऊन आला. तिच्या लपण्याच्या जागेपासून काही अंतरावर ती ठेवून त्याने कॉल दिला. तशी सिंहीण बाहेर आली. ती बाहेर आलेली पाहताच तो लगेच निघूनही गेला.

आळशासारखा झोपा काढणारा, सिंहिणींनी शिकार केल्यावर मग आयत्यासारखं येऊन अरेरावी करून आपला 'सिंहाचा वाटा' खाणाऱ्या आणि दुसऱ्या कळपावर कब्जा केल्यावर त्यातल्या एकूण एक पिल्लांना ठार मारणाऱ्या सिंहाकडून असे प्रेमळ, जबाबदार वर्तन कुणाला अपेक्षित नव्हते, कारण ते कधी जगासमोर आलेच नव्हते.

🐾

ध्रुवीय प्रदेशात हिवाळ्याच्या सुरुवातीला पेंग्विन पक्षांच्या जोड्या जमतात. माद्या एकच अंडं देतात आणि दूरवर समुद्रात निघून जातात.

आपल्या दोन्ही पायांवर खळग्यात ते अंडं ठेवून, तोल सांभाळत सगळे नर घोळका करून, दोन महिने बर्फाळ वाऱ्यांना तोंड देत, न खाता पिता एकमेकांना चिकटून उभे राहतात.

पिल्ले जन्मायची वेळ झाली की माद्या समुद्रातून परत येतात. जन्माला आलेले पिलू जड अंतःकरणाने त्यांच्याकडे सोपवून हे उपाशी थकलेले नर पोट भरायला समुद्राकडे प्रयाण करतात.

🐾

सृष्टीतले नवल उलगडणाऱ्या या एकेक गोष्टी आपल्याला थक्क करतात.

आपल्या पोटातल्या पिशवीत एकट्याने बाळांची जपणूक आणि संगोपन करणारे बाबा सी-हॉर्स,

आजूबाजूला शत्रू दिसताच सर्व पिलांना आपल्या तोंडात बंदिस्त करणारे कुठलेसे बाबा मासा,

पत्नी आणि पिलांना झाडाच्या ढोलीत सुरक्षित बंद करून त्यांच्या पालनपोषणासाठी अव्याहत फेऱ्या मारून अन्न भरवणारे बाबा धनेश पक्षी...

ही अशीच अजून काही गोड बाबांची उदाहरणे.

काहींचे कष्ट आणि खस्ता जगासमोर येतात, तर अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर कधीच उघड होत नाही.

आपल्या अबोल बाबांसारखे ते नेहमी अव्यक्त आणि पडद्याआडच राहतात...❤

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...