कविता - आपल्या ग्रूपची गोष्टच न्यारी
आपल्या ग्रूपची गोष्टच न्यारी,
प्रत्येकाची आवड जगावेगळी,
प्रत्येक सभासदाचा रंग वेगळा,
प्रत्येक रंगाची छटा निराळी.
कुणी फक्त सुप्रभात म्हणून गायब,
तर कुणी प्रत्येक पोस्ट वर स्मायली,
कुणी करे व्हिडिओ चा भडिमार,
तर कुणाची सकाळ सुविचाराने झाली.
कुणी ज्ञानदानासाठी आसुसलेला,
तर कुणाची वृत्ती सदा धार्मिक
कुणी हास्यरसात बुडवून घेई,
तर कुणाची पोस्ट मार्मिक,
कधी आजीबाईंचा बटवा उघडे,
तर कधी बोधप्रद कथा,
कधी कोडी असोत किंवा तत्त्वज्ञान,
तर कधी गृहिणींची व्यथा.
हर तर्हेचे मनोरंजन करण्याचा,
वसा जणु घेतला आपण,
कधी कुणाला येवू देणार नाही,
कंटाळा किंवा एकटेपण.
लोभ आहेच तो व्हावा वृद्धिंगत,
आपल्या माणसांची ही लोभस संगत.🙏🏻🙂
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा