बोधकथा - सकारात्मक पाऊल
एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे. काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच, असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट देणार्या भाविकांना मार्ग व सोबत लागणार्या सामानाविषयीची माहिती विचारतो.
*गावकरी* त्याला आवश्यक सामानाची यादी देतात. सोबत कंदील घेऊन जा, असा सल्लाही देतात.
*मनाशी* निश्चय केल्याप्रमाणे तो रात्री 2 वाजता तीर्थक्षेत्राकडे निघतो. अंधार असतो. कंदिलाच्या प्रकाशात त्याला केवळ दहा पावलांच्या अंतरावरील रस्ताच दिसत असतो. तो मनाशी विचार करतो... 20 किलोमीटरचा रस्ता आणि अशा अंधारात कंदिलाच्या मंद प्रकाशात केवळ काही अंतरावरचेच दिसतेय. त्याची पावले जागीच थबकतात.
*त्याच्या* मागोमाग एक साधु महाराज त्याला येताना दिसतात. तो साधुला थांबवतो व म्हणतो, तुमच्याकडे तर माझ्या कंदिलापेक्षाही मंद प्रकाश देणारा कंदील आहे. रस्ता धोकादायक आहे. तुम्ही जाऊ नका ?
साधु हसतो. त्याला म्हणतो, ‘अरे एकदाच दहा पावले कुणाला टाकायचीत ? एक पाऊल चालण्याइतका प्रकाश खूप झाला. एक एक पाऊल टाकत हजारो मैल दूरचा टप्पा आपण सहज गाठू शकतो.
*तो* साधु महाराजांनाच गणिताचा तर्क सांगतो. मी तर्कनिष्ठ आहे. मी श्रद्धाळू नाही. मी गणितज्ज्ञ आहे. मला समजावण्याचा तुमचा प्रयत्न निष्फळ आहे. असे सांगत तो पुन्हा त्या मार्गावर न जाण्याची विनंती साधुला करतो.
साधू त्याला म्हणतो, "बाळा एक पाऊल, अर्थात पहिले पाऊल महत्त्वाचे आहे. पहिले *सकारात्मक पाऊल* कित्येक किलोमीटरचा तुमचा कठीण प्रवासही सुकर करतो".
🔅तात्पर्य :~
पहिल्याच पावलाला तुमचा विश्वास डगमगल्यास प्रवास कितीही छोटा असू दे, तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचूच शकत नाहीत.
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा