नवीन लघुकथा - वय झालयं!!!

नवीन लघुकथा - वय झालयं!!!

आज बघत बसलो होतो तिच्या वहीत तिने चिकटवलेल्या माझ्या लहानपणींच्या फोटोकडे... पापण्यांच्या ओलावलेल्या कडांच पण भान राहिलं नव्हतं मला... स्वतःला खूप श्रीमंत समजत असलो तरी आज मात्र गरीबीच्या एका झळेने हारलो होतो मी... धगधगत होतं माझं मन... कसा होतो मी..?? हाच प्रश्न पडत होता आणि मनाला चैन काही पडत नव्हतं... खात होतं मनाला काहीतरी... काहीतरी काय 'ते'च खात होतं मनाला... मला निर्णय का घेता आला नाही... मंत्रालयात काम करणारा सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेचा अधिकारी होतो मी... मग मला खरचं माझं कार्य समजलं होतं का...??? सगळं सगळं स्पष्ट माझ्या डोळ्यांसमोर दिसतयं... तो भूतकाळ मला त्याच्याबरोबरओढत घेऊन जातोय... सतत... मी केलेल्या कळत-नकळत चुकांच्या टेकडीकडे... ज्याला मीच सुरुंग लावून आघात केला तिच्यावर... ज्या टेकडीवर मी वाढलो, घडलो, जिने मला सगळं काही दिलं तिलाच मी अनाहुतपणे उध्वस्त केलं... 

आजही आठवताहेत ते मला सोनेरी दिवस... जेव्हा मनाली आली होती माझ्याशी लग्न करून आमच्या घरात... बाबा तर नव्हतेच तेव्हा... आईनेच वाढवलं होतं मला... पण आई खूप आनंदी दिसत होती... सुनेचे लाडही खूप करत होती... मनालीची तर मज्जाच चालू होती... मनाली एका उमद्या हुद्द्यावर अकाउंटंट म्हणून कार्यरत होती... तसा स्वयंपाक आणि तिचा दुरदुरवरचा संबंध नव्हताच... त्यामुळे किचनमध्ये अजूनही आईच राबत होती... कामावरून आल्यावर मनालीची दमछाक व्हायची आणि ती आमच्या बेडरूममध्ये जाऊन मग मस्तपैकी ताणून द्यायची... पण हळूहळू भांड्याला भांड लागायलाच लागलं... मनालीने तसं तिची होणारी दमछाक आणि कामाचा ताण याबद्दल सविस्तर मला सांगितलही... त्यामुळेच मला परिस्थितीचं आकलन झालं आणि तसं मी कामाला बाई ठेवल्या... आता प्रश्न जरा सुटला असं वाटून मी मोकळा झालो... आईचा ताण जरा हलका झाला होता त्यामुळे तीही जरा सुखावलेलीच असेल असं मला वाटलं... हळूहळू आमचं घर फळा-फुलांनी बहरायला लागलं... तस्सं आमच्या घरात मनालीच्या माहेरच्यांचीही रेलचेल सुरूच झाली... मनालीचे सगळे सोहळे पुरवतचं होते... मनालीचे आई-बाबाही तिच्या आनंदासाठी आमच्याच घरी रहात होते... तिला दोन भाऊही होते पण ते दोघेही कामानिमित्त त्यांच्या कुटूंबासह बाहेरगावीच रहात होते... मनाली गावातल्या गावातचं दिल्यामुळे त्यांनाही बर वाटत होतचं... आणि मलाही खूप छान वाटत होतं... म्हणजे तसं झोपायची अडचण सोडली तर...?? कारण बेडरूमही तीन माणसं झोपू शकतील इतकीच लहान होती... त्यामुळे तशी जागेची पंचाईतच होती... आणि त्यात मनालीला तिच्या आईपेक्षा बाबाच सारखे लागायचे... मलाही आनंदच आणि हेवा वाटायचा तिचा कारण बाबांवर तिचं किती निर्व्याज्य प्रेम होतं... त्यामुळे ती आणि तिचे आई-बाबा बेडरूममध्ये... आणि मग काय मी आईसोबत हॉलमध्ये... 

मनालीने तिची झालेली बेडरूम आईसोबत कधीच शेअर केली नाही आणि मलाही त्याचं गांभीर्य इतकं कधीच लक्षात आलं नाही... मी तसा काम आणि पैशात डोक खूपसून घालणारा एकलकोंडी माणूसचं झालो होतो... घरात मुलगा जन्माला आला... तस्सा सगळ्यांचाच आनंद द्विगुणीत झाला... मनाली सोबत तिचे आई-बाबाही खूष होते... आईचा तर आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि मी...?? मी तर मनालीला बघतचं सुखावलो होतो... आता ती सांगेल ती पुर्व दिशा होती माझ्यासाठी... मस्त आनंदात दिवस जात होते आता... त्यातच आईची बहीण सुलभा मावशी आजारी पडली... तिचं करायला तिच्या दोन मुलीच फक्त... आणि त्यातली छोटी नलू तर सातवीलाच होती... तशी अजाणत्या वयातलीच... आणि मोठ्या मालतीची बारावी झाली होती... तीही पोस्टात कमी पगारावर घर चालवत होती... सुलभा मावशीचे मिस्टर तात्या ते तर कुबड्या घेऊन एका पायावर चालायचे... एका अपघातात त्यांनी त्यांचा एक पाय गमावला होता... पण तरीही ते कुरीयर पोचवायचं काम करायचे... त्यात आता सुलभा मावशी अंथरूण धरून बसली होती... त्यामुळे आईला तिकडे जाणं आता भागच होतं... मी ही कामाला त्यावेळी नवखाच लागलो होतो... त्यामुळे आईच्या हातात पाचशे रुपये मी जाताना टेकवले... आई घरातून निघाली आणि आम्ही तिघे घरात राहिलो... तस्सं मनालीचे आई-बाबा महिन्यांतून एक-दोन आठवडे रहायला लागले... मला जरा अडचणच व्हायला लागली... कारण मनाली त्यांना बेडरूममध्ये झोपायचा आग्रहच करू लागली... 

तिचं आणि माझं आता जरा वाजायलाच लागलं... माझ्या आई-बाबांची अडचण होत असेल तर मी ही नाही रहाणार या घरात... मी जाईन माहेरी माझ्या... या मुलाला सांभाळा मग तुम्हीच... तुमची आईही रहातेच ना या घरात... तिला द्याल का असं हाकलून...?? तिच्या या बोलण्यावर मी निरुत्तर झालो... माझं फक्त एक नवरा म्हणून इतकचं म्हणणं होत की ते बाहेर हॉलमध्ये झोपतील... पण तिच्या रागाचा पारा खूप चढला होता त्यामुळे मी जरा शांत बसणं मान्य केलं... तिच्या आई-बाबांनी आमचा हा बेडरूममध्ये होणारा संवाद ऐकला... तसं ते आम्ही काही ऐकलचं नाही या आविर्भावात निघून गेले... सासू जरा माझी समंजस होती म्हणून तिने परिस्थिती समजून घेतली आणि त्यातून मार्ग काढला... मनालीने तिच्या आईला फोन केला तरीही आज हे काम आहे, उद्या ते काम आहे... असं म्हणत इथे न येण्याची कारण ती मनालीला देत होती आणि मनालीच्या बाबांनाही कशात ना कशात गुंतवून ठेवत होती... पण मनालीचे बाबा तरीही कधी कधी तिचं न ऐकता इकडे येण्यासाठी कारणं शोधतचं होते... पण ते नसताना आता जरा निवांत क्षण आम्हांला मिळायला लागले होते... त्यामुळे मनालीची कळी खूलली होती... सगळ्या गोष्टीसाठी आमच्याकडे मोलकरीण बाई होतीचं... मनाली परत कामावर रुजू झाली... त्यामुळे मनालीच्या आईला छोट्या वरदला सांभाळायला थोड्या दिवसांसाठी आम्ही बोलावलं... आईला जाऊन आता सहा-सात महिने झाले होते... पण एक आनंदाची वार्ता होती की आई आज सुलभा मावशीला बरी करूनच परतणार होती... मी ही खूष झालो होतो ही बातमी ऐकल्यावर... तश्शी आईच्या हातात जादूच होती ती एखाद्याला बर करूनच रहायची... मला तर तळहाताच्या फोडाप्रमाणे तिने जपलं होतं... हो जपलं होतं... 

आई आल्यावर मनूचा रंग परत वेगळा दिसायला लागला... भांड्याला भांड लागणं परत सुरूचं झालं... दोन-तीन वर्ष निघून गेले... आणि आता मनालीने दुसरी गुड न्युज दिली आणि थोड्या काळासाठी का होईना पण घरात आनंद तरी पसरला... दुसराही मुलगाच... यावेळेला मुलगी हवी होती पण तरीही सगळे आनंदीच होते... कोणीही आलं तरी स्वागत जबरदस्तचं होणार होतं बाळाचं... दोन्ही मुलांच करता करता आज बारा वर्षांचा झाला होता आमचा छोटा दर्शन... त्यातचं मनालीची आईही हे जग सोडून गेली... त्यामुळे तिच्या बाबांना आता आमचं घर जिव्हाळ्याच वाटत होतचं... माझी आईही आता सत्तरी गाठायला आली होती... त्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी तशा तिच्या चालूच झाल्या होत्या... पण त्यातचं तिला विसराळूपणाची सवय पण झाली... त्यामुळे मनालीची चिडचिड तर अजूनच व्हायला लागली... वयोमानानुसार बदलत जाणाऱ्या आईच्या शरीराची मी ही थट्टा करायला लागलो... तिच्यावर लक्ष ठेवायला बाई ठेवण्याचा विचार माझा चालूच होता तोच आपला इतका खर्च होतोय आता आजारी माणसाचं करायला बायका खूप पैसे घेतात... तुम्ही कशाला घालवताय इतके पैसे...??? मला मनालीचं पटलं... आणि मी काही काळासाठी आंधळा, मुका आणि बहिरा झालो... 

आईला युरीनरी इन्फेक्शनही व्हायला लागलं आणि तरीही मी जरा थोडसं दुर्लक्षचं केलं... तस्सं एका पुस्तकात वाचून बार्लीचा डब्बा, तिची औषध तिच्या हातात सोपवली... हे घे आता, आणि याच पाणी करून पी नाहीतर आपल्या कामवालीला सांग... मी तिची अशी हिडीस-फिडीस करत केलेली विचारपूसही तिला प्रेमाची आणि मोलाची वाटली... तिचे दात एकामागून एक पडायला लागले... त्यामुळे तिचं खाणही कमी व्हायला लागलं... त्यातच मनालीने माझी स्तुती करायला सुरुवात केली की मी कसं सगळं आईचं बघतो... तिच्यासाठी कामला बाई ठेवण्याचाही विचार करतो... सगळी औषध वेळेवर आणून देतो... त्यामुळे मी जरा हुरळूनच गेलो... मी आल्यावर माझा फोन, मनाली आणि मुलांच्यात रममाण व्हायला लागलो... आई मात्र आता माझ्यासाठी शोभेची बाहुली बनत चालली होती काहीही न बोलणारी... तिला होणारा त्रास बघून आता आम्ही तिला घराबाहेर नेण्याच पण टाळायला लागलो... आम्ही फिरायला गेल्यावर तिच्यासाठी शेजारच्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्यावर तिला आम्ही सोपवून माझ्या मेव्हण्यांसोबत, सासर्यांसोबत फिरतचं होतो... तिची शू आणि शी करून माखणार शरीर, तिची ओलावणारी साडी आणि कधी कधी तर तिचा गरम वाफा काढणारा देह... मला दिसतं होतं सगळं पण मला ते बघायचचं नव्हतं... तिला बराच वेळ खितपत ठेवणाऱ्या त्या कामवालीवर सोपवून मी तर दुर्लक्षचं करायला लागलो... इतकी वर्ष न बोललेली ती मला अखेर म्हणाली, मला साईबाबांच्या दर्शनाला घेऊन जाशील...??? पण मी कामाच कारण पुढे केलं... आणि तिला तिच्या देवापासून भेटण्यालाही तोडलं... 

मनाली तर वैतागलीच होती तिच्या या अशा विधी करण्यामुळे... मला तर बाई सहनचं होत नाही हा वास असं म्हणत नाकावर हात ठेवून बेडरूममध्येच पळून जायची... मी शेवटी डॉक्टरांना दाखवलं... त्यांना जरा खाण-पिणं नीट द्या आणि मानसिक आधार द्या... त्यांची काळजी घ्या का लगेच बऱ्या होतील त्या, डॉक्टर म्हणाले... पण मी घराचा प्रधानमंत्री होतो ना... मला खूप काम होती... तिच्यावर पैसे उधळण्यापेक्षा मला कमवणं जरूरीच होतं... मला माझा संसार होता... तिच्यासाठी मी का म्हणून सहन करू...??? तिचं आता वय झालं होतं ना... मनालीने शेवटी मला वृद्धाश्रमाचा पर्याय सुचवला... मलाही पटलं ते... रोज घरात येणारा घाणेरडा वास मलाही नकोच होता... पण कळलं नव्हतं मला की "मी ही लहानपणी खूप शी करायचो पण म्हणून तिने मला पाजणं सोडलं नाही...!" माझ्यासाठी तिने स्वतःचं दुध आटवलं नाही... मी रात्री तिच्यासमोर वृद्धाश्रमाचा पर्याय ठेवला... ती काहीच बोलली नाही... सकाळी उठल्यावर तिने तिचा श्वास मात्र बंद केला होता... मी आनंदाने तिचा भरपूर पदार्थ ठेवून तेरावा साजरा केला... खूप मान मिळाला मला... मी कामाच्या व्यापात हळूहळू विसरूनही गेलो तिला... अशीच चार-पाच वर्ष निघून गेली...

आणि अचानकचं मनालीच्या बाबांना पक्षघाताचा झटका आला... मनालीच्या तर पायाखालची जमिनचं सरकली... त्यांच्यासाठी मनालीने फिजिओथेरपी सुरू केली... महागातल्या महाग डॉक्टरकडे तिने त्यांचे रिपोर्ट दाखवायला सुरुवात केली... मनालीच्या भावांनी यातून काढता पायच घेतला... आणि त्यातचं मनालीच्या बाबांच्या सर्व क्रिया आता जागेवरचं व्हायला लागल्या... मला आश्चर्यच वाटायला लागलं होतं मनालीच आता... कारण मला न सहन होणारा वास मनालीला कसा सहन होत होता आता...?? ते पण आमची बेडरूम तिने त्यांच्यासाठीच दिली होती... आज सहा महिने झाले होते... मनालीच्या बाबांच करताना मनालीची दमछाकही होत नव्हती... तिच्या भावांनी जेव्हा तिला त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा पर्याय सुचवला तश्शी ती त्यांच्यावर डाफरलीच... माझे बाबा मला जड नाही झालेत पोसायला...??? मी पोसू शकते त्यांना कारण त्यांनी मला लहानाचं मोठ केलयं... मला वाढवताना रक्ताच पाणी केलयं त्यांनी... त्यांना बर करण्यासाठी त्यांच्यासाठी कित्तीही पैसे मोजू शकते मी... आणि आता त्यांच्या अशा वयात मी त्यांना अशी वाऱ्यावर सोडून देऊ...??? तिची ही वाक्य ऐकून माझे हात-पायचं गळायला लागले... एक मुलगी म्हणून ती तिच्या परीक्षेत पास झाली होती पण माझं कायं...??? तिच्या या बोलण्याने माझे डोळे उघडले होते पण मी कोणाचे तरी डोळे कायमचे मिटवलेले होते याची सलं मात्र खातचं राहात होती माझ्या मनात... मला कळतचं नव्हतं... आईच वय झालं होतं... का मनालीच्या बाबांच... का माझ्याच विचारांच का खुद्द माझं...

~ पौर्णिमा मनोरे


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट