◾कविता :- महात्मा गांधी
'महात्मा गांधी'
सत्य अन् अंहिसेचे
होते ते पुजारी,
पत्करली नाही कधी
त्यांनी कुणाची लाचारी,
होते आहे मात्र आजही
तत्वांची त्यांच्या परीक्षा,
विसरला नाही अजूनही माणूस
त्यांनी दिलेली विचारांची दिक्षा,
होणार नाही आज
त्यांच्यासम कुणीही महान संत,
नव्हताच त्यांच्या सहनशिलतेला
कधीही कोणत्या गोष्टीचा अंत,
मात्र, पसरतोय आज
वारयासारखा भ्रष्टाचार
होणार कसा त्यांचा
आज जगाला साक्षात्कार,
वाईट पाहू नका,
वाईट ऐकू नका,
वाईट बोलू नका,
हि त्यांची शिकवण,
देईल त्यांची कायम आठवण.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
संपर्क-९२७१५३९२१६.
______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा