संयम व सहनशील स्वभावाचे गुपित...
संयम व सहनशील स्वभावाचे गुपित...
----------------------------------------
आयुष्याच्या व्यवहारात यशस्वी होण्यासाठी मनात संयमाचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे; तसेच आयुष्याच्या प्रवाहात सहनशक्ती फार महत्वाची भूमिका निभावते, संयमाचे उदाहरण द्यायचे झाले तर "चातक" नावाचा पक्षी आठवा; आपली तहान भागवण्यासाठी पाण्याचा एखादा थेंब मिळेल या उदात्त आशेने तासनतास चोच उघडून आकाशाकडे पाहत पर्जन्याची वाट पाहण्यातील संयम सर्वोत्तम असावा. आपल्यातून देवाची मूर्ती साकारणार या आशेने कित्येक घणाचे घाव सोसणाऱ्या काळ्या पाषाणाच्या सहनशक्ती सारखे दुसरे उदात्त उदाहरण नसावे.
माणसात दोन्हीची कमतरता दिसते; अल्पशा निराशेने, कुणाच्या नकाराने, अपेक्षाभंग झाल्याने, क्षणिक अपयशाने, संयम-सहनशक्तीची फारकत घेऊन असा वागत असतो की "निगरगट्ट" शब्दानेही माघार घेऊन तह करावा. कित्येकदा सहनशक्तीचा उद्रेक इतका भयानक असतो की नात्यांची शृंखला तुटण्याचे संकेत मिळून जातात. साधारणपणे समांतर चालणाऱ्या संयम व सहनशक्तीची यथोचित सांगड घातली तर आयुष्य समृद्ध होऊन जाईल. संयमाची मैत्री करायचीय तर "नकार" व अपयश स्वीकारण्याची "सहनशक्ती" अंगी भिनायला हवी. 🙏
______________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा