◾कविता :- बेधुंद आसमंत...
♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾
🙏विषय :- बेधुंद आसमंत 🙏
🎋दिनांक:- ०३ जून २०२१ 🎋
♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾
बेधुंद आसमंत
आज अवचित....
नयनांच्या आभाळी
मेघ दाटून आले....
दोन थेंब आसवांचे
ओंजळीत सांडले....
ना वादळ ना वारा
नाहीच मोरपिसारा
असाकसा नकळत
बेधुंद आसमंत झाला
जाणले क्षणभराने
आज भेट घेतली....
माझी माझ्याच मनाने
केली विचारपूस जरा
सांग कशी आहेस...?
मी म्हटले मस्तच रे...
खरे कसे सांगणार ना...?
इतक्या आस्थेने विचारणे
मनाने मनालाच.....
खरे बोलले तर उगाचच
वाईट वाटेल ना त्याला.....
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
दुपारच्या प्रहरी
आकाशी मेघ
दाटून आले
गच्छ निळ्या
नभानी बहरले
नाही वारा
नाही धारा
गच्छ आसमंत
थोड्या वेळाने
बेधुंद आसमंत
गडगडले वीजेने
चमचमले आसमंत
दणाणून गेली धरणी
आसमंतात भरले
टपोरे मोती
टपटप आले धरनी
सुगंध दरवळला
दाहीदिशा तून
बेधुंद आसमंत
धरीत्री आकाश
निरभ्र शांतता
धो,धो पाऊस
उन्हाळी पाऊस
बेधुंद आसमंत
सौ कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
👉🏼बेधुंद आसमंत..
बेधुंद कोरोना
आसमंत झाला
जगणे मुश्किल
करुनी राहिला..!!१!!
डॉक्टर पोलीस
शासन यंत्रणा
थकून गेलीत
जाईना कोरोना..!!२!!
देव अवतरले
वाचवाया सारे
सगळ्या रुपात
रस्त्यात पहारे..!!३!!
लावता बातम्या
बेधुंद प्रसार
ऐकता कोरोना
डोक्यात विचार..!!४!!
गेलीत आपली
जवळची नाती
इच्छा असूनही
भेट नाही अंती..!!५!!
कलियुग सारे
भ्रष्टाचार झाला
तरीही मानव
नाही सुधारला...!!६!!
माफ कर देवा
मानव कृतीला
बेधुंद वागण्या
निसर्ग कोपला..!!७!!
सौ.माधुरी शेवाळे,पाटील
जिल्हा- नाशिक
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
तू...
बेधुंद आसमंत माझा
निळाईत लपेटून घेणारा
चिरकाल प्रेमाची छाया
डोईवर कायम देणारा
तू...
विस्कटलेल्या मनास
मायेची हळुवार फुंकर
प्रसन्नतेचा मुलामा देत
प्रवास करतोस सुकर
तू...
आठवांची बेचैन दुपार
कातरवेळ हुरहूर लावणारी
हास्याची सुमधुर,सुरेल तान
आठवांच्या गर्तेत भावणारी
तू...
निरव ,दवभारला पळ
शिरशिरी अंगा आणणारा
धुक्याच्या गर्द मिठीत
अंतरीच्या खुणा जाणणारा
तू...
हवाहवासा वाटणारा पाऊस
चैतन्याचं बीज पेरणारा
मृदगंधाच्या सुवासासम
श्वासासवे रेंगाळणारा...
सौ छाया जावळे
वाई,सातारा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
वैशाख वणव्यात होरपळली
वसुंधरा
पाहुनी तिची तगमग कासावीस आसमंत झाला.
होऊन बेधुंद आसमंत नभाशी जाऊन वदला
काळ्या मेघांना घेऊन भूवरी बरसला
धो धो कोसळणाऱ्या धारांनी धरा झाली शांत
बहरून आले अंकूर तिच्या कुशीत
हिरवळीने गर्दीचे धरा कळ्या- फुलांनी बहरली
रानीवनी ही सारी पिके शहारली..
मोत्यांची शेते फुलली शेतकरी प्रफुल्लित
पाहून आनंद धरेचा पुन्हा बेधुंद आसमंत....
सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
सदस्य मराठीचे शिलेदार समूह..
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
सोड हे नैराश्य विसरून विरह
खुले दे आता सखे मनी वसंत
निसर्गाचे सौंदर्य पहा सभोवार
खुणावतोय तुला बेधुंद आसमंत
पहाटेची पाखरांची किलबिल
अन तृणांवरील दवबिंदूचे सडे
फुलण्यास उत्सुक त्या कलिका
सौंदर्य पाहण्या उघड मनाची कवाडे
बघ श्रावणातील रिमझिम पाऊस
साथीला कसा बेभान वारा
चिंबचिंब जातो अंग भिजवून
सर्वांगावर आणतो क्षणात शहारा
समर्पणाची आस असलेला प्राजक्त
अल्प आयुष्य या फुलांचे सारे
सभोवती सुवासिक बेधुंद आसमंत
जरी किती कडेकोट प्रभातीचे पहारे
सखे आयुष्याच्या वाटेवरती
दिसती सुखदुःखाचे असंख्य घाट
विसरून साऱ्या कटू आठवणी
फुलूदे पुन्हा आयुष्यात सुंदर पहाट....
फुलूदे पुन्हा आयुष्यात सुंदर पहाट....
सौ अनुराधा भुरे,नांदेड
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
पहिल्या पावसाची सर
अलगद आली भूवरी
थंडस्पर्शाने लाजली धरणी
जणू नवी नवेली नवरी
ग्रिश्माचा ताप शमवूनी
धरतीला आली तरतरी
सृष्टी सारी न्हाऊन निघाली
फेकुनी उष्म्याचां पदर डोईवरी
चोहीकडे वाहू लागला
सुखद थंडगार वारा
पाने फुले आनंदून गेली
झाला बेधुंद आसमंत सारा
पशु पक्षी उडू लागले
मिटवूनी त्यांची क्षुधा
शेतकरी कुटुंबाची मात्र
उडाली तिरपत त्रेधा
सुखद गारवा अनुभवताना
नभी हरवून गेले इंद्रधनु
सूर्यकिरणांच्या मदतीने
डोकावूं लागले आकाशातून
नभांगणात इंद्रधनुची
रंग उधळत अवतरली कमान
बेधुंद सारा आसमंत करून
पहिल्या पावसाने केली कमाल
पहिल्या पावसाने केली कमाल.....
मिलन डोरले मोहिरे पुणे
@सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत .....
आज बेधुंद आसमंत झाला सारा
कृष्णकाळ्या ढगातून वाहतो वारा
आकाशी दामिनीच्या चमकती आभा
गडगडाट करू लागले ढग उंचनभा
बेधुंद होऊन वृक्षाशी खेळे मुजोरवारा
थंडगार वाहतो वारा ना मिळे कुठे थारा
मातीचा सुटला सुगंध नशेत आसमंत सारा
थेंब पडता पावसाचा अंगावरी येतो शहारा
मन होऊन बेंधुद छेडित जाते ह्रदयाचे तार
चातका प्रमाणे थेंब चक्क्षती मन कित्येकवार
जलमय होते वसुंधरा खळखळ वाहतो झरा
सरिता वाहते दुथडी भरून भेटण्या जाई सागरा
आज बेधुंद आसमंत सारा गीत गाई मंजुळ वारा
सुखमय होऊन सर्व सृष्टीआनंदाचा वाहतो झरा
विजय शिर्के , औ. बाद .
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह .
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
सखे,
आज मनांगणी,
पुन्हा श्रावण बहरलाय....,
बेधुंद आसमंत,
साथ तुझी,
ग्रीष्माचा ताप हरलाय...!
प्रेमाचा वर्षाव,
श्रावणधारांमध्ये,
चिंब चिंब भिजवतोय....,
उमललेल्या,
बेधुंद फुलांचा,
गजरा तुजसाठी सजवतोय...!
प्रेम,
अडीच अक्षरी शब्दच,
बेधुंद आसमंती गुंजतोय....,
प्रीत फुलोरा,
तुझा-माझा, जन्मोजन्मीचा,
ह्या जन्मीही फुलतोय...!!!
ह्या जन्मीही फुलतोय...!!!
श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी,
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
अबोल होती पहाट
शांत निरागस थाट
सोनेरी सोन किरणांनी
रंगवली रंगीत तिची वाट
आम्रतरुवर बैसून
कोकीळ गाणे गाई
चिमण्यांचा कानी
चिवचिवाट ऐकू येई
झुळझुळ वाही वारा
स्पर्श होई तना
बेधुंद आसमंत सारा
आनंद देई मना
सोनकिरण स्पर्शाने
पाकळी पाकळी फुले
सुमनांच्या परिमळाने
चराचर बहरुन खुले
प्रकाशाची पखरण करीत
शांत शितल नभात
रंगाची उधळण करीत
उगवली गोड सुप्रभात
सौ.मनिषा दिपक सामनेरकर
पालघर
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
आजचा वळीवाने कमाल केली.
मनातली मळभ धुवून गेली
अंतरंगातील त्या डोहाची
मेघांनीच सफाई केली.
सरीवर सरी कोसळताना
न्हाऊनी गेले तन ,मन
स्वच्छ ,सुंदर झाली अवनी.
बरसताना श्रावन लहरी
गोड मधुर तो गंध मृदेचा
हवाहवासा वाटे सदा.
गर्द हिरव्या गालिचांचा
मेघांच्या स्वागतास सडा.
उत्कंठता ती धरणीची
पाहून होई अधीर पहा
बेधुंद आसमंत हा .
बरसे सत्वर त्या जलधारा.
सौ सुवर्णा महावीर ठोंबरे. इंदापूर पुणे.
© सदस्या मराठीचे शिलेदार समुह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
बापाच्या फाटक्या धोतराला
मायनं बारा ठिगळ जोडली
पटक्याचा लोंबतो पदर
खमेशाची बाहीच फाटली....
शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन
उभ आयुष्य मातीतच पेरलं
राबराब पाटलाच्या शेतात
घडीभर बसता नाही आलं ....
ऊसाच्या पाचटाची झोपडी
रातभर पावसाने गळाली
पळसाच्या पानांचा व्हरका
टाकून मरण यातना कळाली....
झोपडीला नसे दार फक्त झोपाटा
उजेड नसे पाचवीला पुंजला
घासलेटावरची असून चिमणी
रातभर काळा धुर लागे नाकाला...
कसबस दुपारी खायची भाकर
काळ्याभोर भिजलेल्या दाण्यांची
चिंचा ,बोर, रानमेवा खाऊन
अठराविश्व पोटाची खळगी भरण्याची...
चिल्यापिल्यांचा करुन आटापिटा
जीव आटविला लेकरात
जमीन,आकाश करुन एक
मायबाप बेधुंद आसमंत...
शिवाजी नामपल्ले
अहमदपूर जि.लातूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
आज डबडबल्या नयनी
झालाय बेधुंद आसमंत
बळीराजा घेतोय आशेने
सुखावल्या अश्रूंनी उसंत
आभाळ गंधाळून येता
अंगात उठलंय वादळ
मातीचा सुगंध घेण्यास
तन हे डोलतंय प्रांजळ
शृंगार सृष्टीने रंगविला
नवरसात भिजुनी जसा
परिमळ दरवळला मंद
मधास चाखे भुंगा तसा
वा-याची हळुवार झुळूक
हृदय स्पर्शून घाली भुरळ
बेधुंद आसमंत मोहवितो
सजणीला घेताच जवळ
आनंद साजरा करूया
पावसाच्या थेंबासरशी
संसारी हिरवळीत सखे
मज आलिंगनात भरशी
राजमन
(राजेश नागुलवार)
चंद्रपूर
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह.
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
चांदण्या रातीला
बेधुंद आसमंत
राजा,राणी आपण
घेऊ जराशी उसंत
आयुष्याचे गुपित
त्यावर करू विचार
संस्कार करता मुलावर
कसा चुकला आचार
बेधुंद आसमंतला
जडला भेदाभेदीचा आजार
आपलीच सावली
करू लागली वेगळा विहार
मुले घडविताना
पडलो आपण कमी
प्रेमळ सहवासाच
ठरला ग जुलमी
विचार मनी येतो
का दिले बेधुंद आसमंत
म्हातारपणात आई बाप
का नाही मुलांना पसंत
बदलत्या परिस्थितीत
बदलतात चालीरीती
तरी आशीर्वाद देण्याची
पाळू आपण रितीभाती
अजय रामटेके,वर्धा
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
मोकळे बेधुंद आसमंत
गार गार वारा हा मतीमंद
रोमा रोमात उसळे आनंद
मन माझे तुझा मध्ये बेधुंद
बोले काहीं आंतरंग
चल चल भिजु चिंब चिंब
नको चोरुस तु अंग अंग
चल पाहु प्रेमात सप्तरंग
लव लावतो वृक्ष महावृक्ष
भिर भिरतोय वारा
हळुवार स्पर्श होता
येतासे अंगास शहारा
नको करू विलंब ज्यादा
चल जाऊ संग संग आदा
घेवू भरारी उंचच उंच
तोडून सारे बंधचं बंध.'
रंजित तिडके
मखमलाबाद,नाशिक
सदस्य मराठीचे शिलेदार समुह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
बेधुंद आसमंत
साद घालितो मज
प्रीतीच्या आठवसंरीत
भिजले मन आज
ओल्या सांजवेळी
बरसल्या सरी
प्रीतीचे भाव प्रिया
उतरले अंतरी
नयनचक्षू बावरे
तुझ्याचसाठी झुरती
मनाचे रेशीमधागे
तुझ्याशीच जुळती
शिरव्याचे जलबिंदू
जणू गालावर खळी
रोमरोमांचित काया
खुलली पुष्प पाकळी
ओलेचिंब माती
मृदृगंध उधळते
गारव्यात तृणपाती
हर्षित लहरते
मंतरलेली सांज
बेधुंद आसमंत
काळजात प्रीतीचा
फुलला वसंत
सौ.आशा कोवे गेडाम
वणी जि यवतमाळ
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
आग ओकतोय पुष्कर
वाहती घामाच्या धारा
ऊन सावलीचा खेळ
अवचित सुटला वारा
दिसती जरा रविकिरणे
मेघ दाटले काळी
सोनसळी लावलेली
इंद्रधनूची सुंदर साडी
चैत्राच्या पालवीने
धरा आली बहरूणी
हिरव्या कंच शेल्यावर
खेळ खेळी फुलराणी
बघुनी अवनीचा साज
झाला बेधुंद आसमंत
बरसले टपोरे थेंब
शहारला अंग अंग
उधळण मृदूगंधांची
दशदिशा मोहीत झाल्या
बेधुंद आसमंता सवे
कृष्ण सख्या बावरल्या
सौ रुपाली म्हस्के मलोडे गडचिरोली
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
तप्त धरती प्रतिक्षेत
मेघराजाच्या कुशीत
येता सरीवर सरी
चौफेर सुगंधीत
मृदगंधित सजीव
सुखःद हर क्षण
मोहवी मनास
सृष्टीचा कण कण
वाहे वारा गारगार
डोले पानं न पानं
झाडे हळूवार गाती
मोहक संगीताची तान
गडगडाट ढगांचा
विजराणी थाटात
वेड लावी जीवास
बेधुंद आसमंत ..
बेधुंद आसमंत...
सौ. संगिता बनसोड मुनेश्वर
यवतमाळ
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
वेगात बरसे धारा
शब्दही करती ओले
प्रितीच्या पाऊलखुणा
मिटवून सखे गेले
पण तू स्मरते मनी
त्या जुन्या ग आठवणी
येवू दे वादळवारा
तू ये पाऊसी भिजूनी
येवू दे ग वार्यासंगे
तुझ्या वेणीचा सुगंध
पावसात होऊ ओले
नाचू होऊन बेधुंद
उठे थंडीचे शहारे
हा *बेधुंद आसमंत*
रोमांचित माझे अंग
अनुभवू तुझे संग
डॉक्टर संजय भा.पाचभाई
नागपुर
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
वेध लागे धरणीला
अवचित त्याचे आता
येईल लवकरच
करेल सुकर वाटा
मेघ येतील भरून
गगनी असे तोऱ्याने
वाराही वाहील मग
आपल्याच आनंदाने
रिमझिम पाऊस तो
कधी मुसळधार तो
अवनी होईल तृप्त
भुगंध चोहीकडे तो
प्राणि पक्षी ती निवांत
पक्षी घरट्यात शांत
पानोपानी सळसळ
तो बेधुंद आसमंत
सौ.शशी मदनकर, ब्रम्हपुरी
सदस्या-मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
बेधुंद आसमंत
बेधुंद आसमंत आजच्या दिनी
धायमोकलून रडला हो तेव्हा
संघर्षयोद्धा बीडचा वाघ अंत
क्रूर नियतीने केला होता जेव्हा...!!
लोकनेता गोरगरीब कैवारी
ऊसतोड मजुरांचा जणू प्राण
मुंडे साहेब ते भगवानभक्त
संस्कार मूल्यांचीच अमूल्य खाण..!!२!!
सोसले जरी परिस्थिती चटके
जपला अखंड मनी स्वाभिमान
प्रश्न सोडविण्यासाठी वंचितांचे
तुडविले चिखलमय ते रान..!!३!!
राजकारणाचा वारसा नसून
स्वकर्तृत्वाने विजय मिळविला
बहुजनांचा कैवारी गोपीनाथ
कामगारांसाठी तो तळमळला...!!४!!
दसरा मेळावा भगवानगड
देशात सर्वत्र परिचित झाला
सोने लुटले ऊर्जादायी ज्ञानाचे
नतमस्तक मी पावन स्मृतीला...!!५!!
✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड
कवयित्री/लेखिका/हायकूकार
सदस्या-मराठीचे शिलेदार समूह
🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️🦚🌧️
♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
🙏सहप्रशासक/संकलक/परीक्षक🙏
✍ संग्राम कुमठेकर
📱 ९६८९५२९३९४
ता.अहमदपूर,जि.लातूर
©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा