◼️ कविता :- निरंतर माळेतून एक मोती | yashacha mantra
निरंतर माळेतून
एक मोती गळतो आहे..
तारखांच्या जिन्यातून
डिसेंबर पळतो आहे ..
काही चेहरे वजा अन्
बर्याच आठवणी जमा..
वयाचा पक्षी
आभाळी दूर उडतो आहे ..
हलकी हलकी उन्हे
अन् आक्रसलेल्या रात्री..
गेलेल्या क्षणांवर
पडदा हळूहळू पडतो आहे..
मातीचा देह
मातीत मिळण्यापूर्वी..
हर मुद्द्यावर
इतका का आडतो आहे..
अनुभवण्या पूर्वीच
सुटून जात आहे आयुष्य..
एक एक क्षण जणू
ढग बनून उडतो आहे..
तारखांच्या जिन्यातून
डिसेंबर पळतो आहे ..
*माणसं भेटत गेली,मला आवडली*
*आणि मी ती जोडत गेलो !!*
*चला...*
*या वर्षाचा हा अखेरचा आठवडा*
*माझ्याकडून काही चुक झाली असल्यास*
*क्षमस्व ! 🙏🏻*
*आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल*
*खुप सारे धन्यवाद..!!*
*तुमच्या या मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या...*
*नव्या वर्षात नव्या उमेदीने*
*पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...*
➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुह मध्ये सहभागी व्हा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा