◾कविता : भाकीत एक गुपित ...
➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖
‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'काव्य लेखन'.‼
➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖
मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम
➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖
➿💞➿💞➿💞➿💞➿💞➿
🙏विषय :- भाकीत एक गुपित🙏
🍃दिनांक :- १८ /०१ /२०२१🍃
➿💞➿💞➿💞➿💞➿💞➿
अपयशाने कधी न खचावे
कामाशिवाय कधी न पचावे
नित्य यशाचे गुपित सुचावे
पोवाडे कीर्तीचे उस्फुर्त रचावे
जिद्द चिकाटी कष्टास स्वीकारावे
फुकाचे मिळेल त्यास नाकारावे
दिव्य त्या स्वप्नास साकारावे
व्यक्तिमत्व आपुले आकारावे
मनी नेहमी उत्साह भरावे
सत्कार्य नीती हाती धरावे
दुःख सागरातून सहज तरावे
मरावे परी कीर्ती रुपी उरावे
ध्येय आपुले निश्चित करावे
दिन-रात ध्येयास त्या स्मरावे
मिळवण्या मग कष्टांत झुरावे
शेवटी भाकीत एक गुपित ठरावे
पौळ विनायक शेषराव
पालम,परभणी
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜
भाकीत एक गुपित असे
काळाच्या कुपित दडलेले
याचे अज्ञात अगम्य रूप
भल्या भल्यांना नडलेले.... //
ग्रहतार्यांच्या रेषेत म्हणे
अवस्था याची गुंफलेली
अचूक अंदाज बांधण्यास
ज्योतिष शास्त्रे गुंतलेली... //
जग प्रसिद्ध नाॅस्ट्रॅडेमस.
खगोलशास्त्रीय भाकीतकार
नाना तर्क आकडे मोडीचे
येथे सांगून गेले चमत्कार.. //
मात्र काळाच्या कसोटीवर
कांही उतरले काही घसरले
तरीही ज्योतिष कलाविद्येचे
भाव कायमचेच वधारलेले... //
अशा भाकीताचे गहन गूढ
उलगडावे तितके थोडे
मात्र कांही अल्पबुद्धी मूढ
येथे खुशाल दामटती घोडे... //
घडेल घटीत ते स्विकारावे
जगताना जीवनपटावर
तळहाताच्या रेषेपेक्षाही
भरोसा असावा मनगटावर... //
विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜
मनामध्ये एक आणि
गुपीत एक काय म्हणावे...?
हे कळतच नाही...
मनातल्या कानाकोपऱ्यात
कोण बघतयं हे
मनीचं सांगावं कुणास, बोलावं कुणास..?
काय भाकीत काय गुपीत...?
मन हे गुंतले धाग्याने झाला गुंता
कितीही तोडावे तुटत नाही
का ही माया दडवुनी ठेवली कुणी
पसरविले मोहमाया प्रपंच मायेची
सावली आशीर्वाद घ्यावा तुझा आई
घ्यावी तूच दिलेली संस्काराची शिदोरी
बांधून उशासी ठेव म्हणुनी काय गुंतले
हे धागे भाकीत एक गुपीत....?
आज सगळ्या मुलांवर प्रेम करणारी
का तुझा भारोभारसारखाच तोल
करावयास लागले आई तू जन्म दिला
गं हिशोब नाही ठेवला....
एक सांज उपाशी झोपली..
कधी तुझ्या जीवास एकही काटा नाही बोचला
जळत ठेवले सारे तुझ्या मनातल्या मनात
दिसते तसे नसतं खरोखर...
काय भाकीत एक गुपीत...?
का जगतेस आई.....
फक्त धनदौलत पैसा का नाही बांधूनी ठेवला
आज पैशाची पुंजी नाही म्हणून
तुझे वजन हलके का झाले गं...?
शरीराने खंगली विचारांनी हैराण झाली
तूच तुझा विचार करूनी माझे कसे होणार
याच विचारांचे तुझ्या पाठीवर ओझें तू ठेवले
उतरविले भाकीत एक गुपीत एक
जिव्हाळ्याचे नाते रक्ताचे नाते दुधाचे
माझं म्हणणारी नाही आले गं धावून
उडत गेल्या पैशाचा वारा धावत आले गं
चोचीने टिपायला दाणे....
तुझ्या भेटीची आस लागली
कधी पाहू ह्या नयनडोळ्यांनी तुज
तुझ्या पानावल्या डोळ्यांनी...
नको वाट पाहु जिथे माणसांची माणुसकी नाही
लावतील खोटी माया तुजवर हे लेकरे
भाकीत एक गुपीत सांगते तुज आई...
सौ. नंदा कामडी चंद्रपूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜
योजली योजना मनात वर्तविले भाकीत शिक्षकाने
सांगितले मुलांना गुपित
ते घर करून बसले मनात
सोपविले काम शिक्षकाने
शाळेतील मुलामुलींना
मे महिन्यात सुट्टी असते
दिले काम खाली हातांना
ऐप्रिल मे महिन्यात असतो
आंब्याचा जोरदार कहर
घेतात माझा रस पानाचा
घेतात आनंद भरपूर
हे कळलं ऐका मुलीला
तिने सांगितले गुपित सर्वांना
करा जमा कोया सख्यानो
बहर आणि आंब्यांना
लावू मातीत कोया आंब्यांच्या
करू झाड तयार,,,
ते लवी डोंगर मैथ्यवर
मिळतील आंबे भरपूर
सांगू लागली सर्वांना
काढू आपण शाळेची ट्रीप
जावू आपण डोंगर माथ्यावर
घेऊ माझा सर्व मिळून
असं होणार नाही आजवर
हे वर्तविले भाकीत ऐक गुपित
दाबून ठेवले होते मनात
नाही सांगितले आजवर पण मुलांनी घेतली मजा मनभर
तो होता ऐक चमत्कार
आंबे लागले डोंगरावर
गोड आंबे मिळाले सर्वांना असे घडले नव्हते आजवर
हे झाले भाकीत सत्य
दाखविले करून सत्कृत्य
आनंद त्यांचा गगनात मावेना
झाले पूर्ण भाकीत ऐक गुपित
केवल चंद शहारे
सौदड़. गोंदिया
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜
चंद्र, शशी, रवी,ग्रहतारे
वाहणारे वारेअन् शनीचे फेरे
राहु केतु,अन् गरुचे स्थान
मिळेल अपमान की,मानाचे पान
कफ्फलक होईलवा धन बरसात..
सांगणे ठरते भाकीत एक गुपीत।
कर्मकांड, गंडेदोरे,सारे थोतांड
भुवरीचे कुडमुडे हलवी ब्रम्हांड
अंगारे,धुपारे,व्रत ते करुन
उपासतापास मौन धरून
पूर्ण होते का मनीचे इच्छित..
सांगणे ठरते भाकित एक गुपीत।
लग्न कधी होईल,कधी होईल मूल
सांगणारे भेटले की पडते भूल
बाजूला ठेवला जातो मग विवेक
ऐकून घेतली जाते फेकाफेक
गरीब असो की असो श्रीमंत..
खरेच वाटते भाकीत एक गुपीत।
नसतो असा कोणी भविष्यकार
आयुष्याचा तुझ्या तूच शिल्पकार
द्रुढनिश्चय, शिक्षण आणि चालरीत
भविष्य दडले या त्रयीच्या कुपीत
सत्य समजुन घ्यावे शुद्धीत.
बाकी मगआहेभाकित एकगुपीत.
सौ.संगीता पांढरे
इंदापूर, पुणे
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜✋🦜
भाकीत एक गुपित सांगणारे
पहात असतील ना स्वतःचं भविष्य
बदलता येत नाही का त्यांना
स्वतःचं फरफटत जाणारं आयुष्य..
पाऊस येणार हे कळल्यावर
करायला हवी ना आधी शाकारणी
वेळीच गाठला प्लंबर एखादा तर
टिपकणार नाही ना पापणी..
आभाळ फाटणार की नभ रूसणार
कधी अदमास नसतो लागत
निसर्ग आहे असा मनमौजी
चकवतो भाकीत मर्जीने वागत..
कुणासाठी खरं, कुणासाठी थोतांड
त्याच्याकडं आपण गंमत म्हणून पहावं
काहीही लपलेलं असो भविष्यात
आपण मात्र सज्ज होऊन रहावं..
स्वाती मराडे, पुणे
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह
➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖
🙏मुख्य परीक्षक/संकलक/ सहप्रशासक🙏
✍सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर
तुकूम, जि.चंद्रपूर
©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह
• मुख्य प्रकाशक व आयोजक •
• श्री .राहुल पाटील ,नागपूर
☎ +917385363088
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा