◼️ कविता :- सूर पापणीचे ... |✍️मराठीचे शिलेदार कविता समुह
--{ ‼ 'मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ }--
🙏विषय :- सूर पापणीचे 🙏
🎋दिनांक:- ८ जानेवारी २०२१🎋
♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾
आठवांचे थवे रेंगाळती
मनआभाळी पुन्हा पुन्हा
सूर पापणीचे देती साथ
नि स्मरतो गतकाल जुना
हे कवडसे भिरभिरती
उमटते अलबेली नक्षी
सतावती क्षण सोनेरी
साखरस्वप्नातले पक्षी
दिन ढळुनी सांज धुमसते
तप्त आठवांचा निखारा
ओलेत्या पापणीचे शिंपण
तरी फुलतो स्मृतिपिसारा
थेंब सरींचे झेलत राहते
श्रावण हा खुलवत नाही
जगण्याच्या प्रश्नास हसुनी
मी खुळे उत्तर देऊ पाही
जगते आहे रे तुझ्याविना
आयुष्या ना सूर ना ताल
अंतरीच्या वेदनांनी भरूनी
व्यतीत आज,उद्या नि काल
सौ छाया जावळे
वाई,सातारा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
सागराला आंत नाहि
आठवणीना उसंत नाहि..
वेदनाच्या ओझ्यात आता
सुर पापणीचे गात नाही ...
सागराला हि नदि मिळाली
गलबते त्यात फिरून आली...
आठवणीची पहाट झाली
सुर पापणीचे वाहून गेली ...
विरहात तुझ्या मन माझ
आठवणीत गुंतून पडल ...
राहिली ना इच्छा जगण्याची
जिवन श्वासात अडकून पडल ...
सुरपापणीचे आठवाच्या
रोज तारा छेडत राहाती ...
गित तुझ्या विरहाचे
रोज आसवाचे गात राहती ..
तुझ्या आठवणीत सर्व ऋतू
आता दूर निघून गेले ..
ग्रिष्माच्या वणव्यात माझे
आश्रू देखील सुकून गेले ...
विजय शिर्के , औ. बाद .
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह.
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
(एक गझलसदृश्य रचना)
सूर पापणीचे जेंव्हा जुळाया लागले
प्रेम तुझे माझ्यावरचे कळाया लागले!
नव्हता कुणाचाही जागेपणी पहारा
प्रेम सारे प्रकाशातच फळाया लागले!
कधी होई इंतजार असह्य मनात
अश्रू पापण्यांतूनी बघ ढळाया लागले!
प्रेम तुझे माझे मजेत चाललेले
पाहूनी काहीजण उगी जळाया लागले!
होता लग्न,झालो मग्न,संसारात
स्वप्न गोजीऱ्या फुलांचे मनी फुलाया लागले!
श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी,
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
गूज कळता धरेच्या जणू अंतरीचे
रिते होती जलाचे ते घडे अंबरीचे.. //
वर्षता घनधारा मन तृप्त होई धरेचे
हर्ष उठे अंतरंगी मग नाना तर्हेचे.. //
स्पर्श तुझेही असे दुःख निरवी तनाचे
सुख सोहळे कसे वर्णावे त्या मनाचे.. //
वलय मजभोवती तुझ्या घट्ट मिठीचे
बिलगूनी लुटू दे चांदणे मग ओठीचे.. //
चिंब आसवात माझे सूर पापणीचे
दूर होवू नये तू दान दे या मागणीचे.. //
आता नको गळा फास विरह वेदनाचे
श्वास गंधाळूनी रे गीत गावू मिलनाचे.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
सुर पापण्यांच्या डोळ्यांनी
तुला गुज वर्तवावे
अन् भारलेल्या क्षणात
कधी ओंजळ भरुन
तुला गंध फूल द्यावे
चिंब असवात भरूनी
लाख स्पर्शगंध घ्यावे
कधी पदर होऊन
अंग लपेटून जावे
लाख मोलाचे ऐवज
उरी पापण्यात साठवावे
कधी तूफान होऊन
रान फिरवून घ्यावे
बेभान सुख सोहळा
धुंद चांदणं पेरावे
कधी ओढाळ होऊन
घन आषाढ बनावं
चिंब चिंब बरसून
गीत ओलीतीचे गावे
सौ कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर, सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
सूर पापणीचे कर्ण मधूर
मन गाभारी स्पर्शून जाई
संगीतमय वलय भोवती
कल्पनांच्या दुनियेत नेई
लाजताना झुकते जेंव्हा
खुलतो असा मुख चंद्रमा
गोड गालावर सौंदर्यांची
पसरते अनोखी लालीमा
कधी आश्चर्य कधी भीती
प्रसंगानुरूप जपते नजर
सन्मानाने सांभाळते ती
सुसंस्कारांचा रेशमी पदर
कधी शांत निवांत जागी
पापणीआड भासे श्वास
आठवं पाखरू भिरभिरे
अन् जिंदगीच वाटे खास
गहिवरता काळीज इवले
वाहे डोळ्यांतून नीर असे
करूनी हलका भार सारा
देई स्वतःलाच धीर जसे
अलवारपणे मिटता सांगे
'मी आहे ना' चे आश्वासन
साखर निजेत फिरवी दूर
मोरपंखी स्वप्न सिंहासन
बंदिस्त रहस्यच उलगडते
लुकलुकती पापण कडा
हृदयांगणी शिंपडे हळूच
जाणिवांचा चांदण सडा
मीता नानवटकर नागपूर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
पलक झपक झुकते
टिंम टिंम करुन हलते...१
करते संरक्षण डोळ्यांचे
वाटे कधी अभिमानाचे...२
तिचे काळे काळे केस
घालती सौंदर्यात भर बेस...३
करा थोडे संस्कार तिच्यावर
घालून काजव हळूवार...४
चुंबिता माथा प्रेमाने जरा
तोच झुकाव त्याचा खरा...५
जीवनात असावे अलगद असे
सूर त्यांचे त्यालाच गवसे...६
खुळते कळी गालावर छान
नयनबाणी तिरकी चाल मानूमान...७
©️✍️..
मा.kvकल्याण राऊतसर
मराठवाडाप्रदेश लातूर
©️मराठीचे शिलेदार समुह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
तू छेडलीस माझ्या
जीवनाची तार
आकंठ प्रेमात बुडाले
विसरुनी अस्तित्व पार
भरल्या डोळ्यात माझ्या
सूर पापणीचे
कळलेच नाही कधी
तुला भाव अंतरीचे
हृदय झाले माझे
प्रेमात बंदिवान
तुझ्या आठवणीत
हरपले देहभान
नजरानजर होताच
कळले गुज मनीचे
गुलाबाच्या पाकळीत
लपलेल्या प्रितीचे
मिलन डोरले/मोहिरे पुणे
@सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
कसे का नकळत....
अश्रूंचे दोन थेंब गळाले
सूर पापणीचे मात्र....
ना कधी कुणा कळाले
झंकारल्या ह्रदयाच्या तारा
कानी शीळ घालत गेला
रानीचा अवखळ वारा....
दूर दूर मी तया का....
उगाचच शोधत राहिले....?
झुळुकेच्या आशेने मात्र
स्वतःस हरवतच राहिले
सूर पापणीचे मात्र......
ना कधी कुणा कळाले
आता एकच निर्धार मनाचा
सूरही माझे...तालही माझेच
शब्दांशी खेळण्या नव्याने....
लेखणीशी सूत जुळवत राहिले
सूर पापणीचे माझ्या...
मलाच कळाले...मलाच कळाले
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
राऊळाचा रंग आभाळी लागला
नभ कळसाला थेंब देऊ लागला
खपल्यांवर नुकतेच स्वप्न सजले
चैतन्य दिवसाचे भिजुनी निजले
जरा कुठे सावरला जिव तळाशी
झेलणार आता अबिराच्या राशी
दिशांचे सोंग न्याहळी पहाडावरी
सुर पापणीत ह्या आसवांच्या सरी
जाते आशेच्या पोकळीत साधना
कशी काय करावी इश्वरी प्रार्थना
सौ वर्षा जमधडे VSJ(नाशिक)
मराठीचे शिलेदार समुह सदस्य
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
सूर पापणीचे लवताच
मनाच्या आतले भाव
ओठांवर येतात अन्
बोलून जातात...
सूर पापणीचे लवताच
मन आठवणीत रमतं
चित्त होत सून्न अन्
मन नभी जातं...
सूर पापणीचे लवताच
मन प्रेमळ होत
शब्दानं कोमल अन्
रकतहून भडक होत...
सूर पापणीचे लवताच
मन घायाळ होत
बर्फाहून थंड अन्
आगीहून गरम होतं...
सूर पापणीचे लवताच
रेखटल्या जरी रेषा
तरी साकर तू होतो
संकटाच्या वेळी धीर तू देतो...
कु.पूजा नंदागवळी
मु .मालकनपुर जिल्हा गोंदिया
मराठीचे शिलेदार समूह सदस्या
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
सूर पापणीचे
सप्तसुरांतील
गीत आनंदाचे
गवसले मला !!
सरगमसंगे
बोलू ते लागले
गाण्यात रंगले
बिलगले मला !!
सा रे ग म प ध
नी सा सप्तसूर
मनी उमटले
सूर पापणीचे !!
गवसावे नित्य
सूर आनंदाचे
बरसावे गीत
जीवनात माझ्या!!
✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे) म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
निशब्द मी तुही निशब्द
ऐकत होतो सूर पापणीचे
होती ती पहिलीच भेट
क्षण होते किती हर्षाचे।
वाचता वाचता नजर
गुंतत गेलो एकमेकात
जुळून आली मन दोन
वाढल प्रेम क्षणभरात।
सूर पापणीचे जादूभरी
ह्यदयात पोहचले थेट
राहावेना आता वेड मन
रोज व्हावी वाटे तुझी भेट।
अनोळखी नात वाटे हवं
वाढत जाई ओढ मनीची
हवा वाटे एकांतवास
नको गर्दी आता कुणाची।
मिठीत येता अलगद तुझ्या
सूर पापणीचे गुंजले कानी
शिंपण घातलस तू प्रितीच
धुंद होऊन गाऊ जीवन गाणी।
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
टिपणी देऊन जातात
पापणीचे ताल सूर
कळत नकळत देऊन
जात काळजात हुरहूर
स्पर्श भासे तनी
ओढ लागे मनी
वाट पाहण्यास
टक लावे पापणी
राग ,लोभ ,द्वेष ,मत्सर
दर्शविते पापणी
सुख, दुःख, विरह ,प्रेम
ह्यात भिजते पापणी
वर्षानुवर्षे एकमेकांच्या
दूर राहून प्रेम करी पापण्या
भेट होण्यास तरस्ती
फडफडणार्या पापण्या
गाता सूर पापणीचे
वेदना जाते झाकुनी
आनंदाच्या स्वर्गात
नाच करी मनोमनी
मनीषा ब्राम्हणकर
अर्जुनी/मोरगाव, गोंदिया
मराठीचे शिलेदार समूह
🎼💖🎼👁🗨😢👁🗨🎼💖🎼
♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏
✏सौ.कल्पना शाह
डोंबिवली,जि.ठाणे
©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा