◾ गझल :- विदयदगंगा...
कळ्यांनी डंख सोसावे,किती अन् का कुणासाठी?
फुलांनी दुःख भोगावे,किती अन् का कुणासाठी?
जरी आहेच लिहलेली,व्यथा माझ्या कपाळावर
विषाचे घोट मी प्यावे,किती अन् का कुणासाठी?
जगाला सांगतो आहे,तशी मी वाजवी दुःखे
मुखवटे रोज बदलावे,किती अन् का कुणासाठी?
किती अंधारली आहे,मनाच्या आतली दुनिया
उराशी दीप लावावे,किती अन् का कुणासाठी?
बुडाल्या आसवांमध्ये,सुखाच्या कागदी होड्या
मनाचे पान फाडावे,किती अन् का कुणासाठी।
वयाचा एक टप्पा अन् ,ऋतू गंधीत देहावर
तिने डोळ्यांत लाजावे,किती अन् का कुणासाठी?
खुप सुंदर रचना सर
उत्तर द्याहटवा