◾जीवन मंत्र :- उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.
2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.
3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.
5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.
6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.
7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर ...
१) सूर्यप्रकाश
२) विश्रांती
३) व्यायाम
४) योग्य आहार
५) आत्मविश्वास
६) मित्र.......
आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!
आपण सगळे जण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधिच ठरलेला आहे हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या.🙏🙏.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
khup chan massage
उत्तर द्याहटवा